Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?

पार्श्वभूमी
Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटकावसई-विरारमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Rain)...More
पाचोऱ्यात संततधार पावसामुळे घर कोसळले; ढिगाऱ्याखाली दबलेल्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक !
गोंड वस्तीतील घर कोसळून चिमुकली ढिगाऱ्याखाली अडकली; स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले !
प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगावला हलविल्याची प्राथमिक माहिती !
पाचोरा शहरात सततधार पावसामुळे गोंड वस्ती परिसरातील एक घर अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत घरातील एक चिमुकली ढिगाऱ्याखाली दबली गेली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत यांनी तातडीने बचावकार्य करून चिमुकलीला बाहेर काढले. चिमुकलीवर प्राथमिक उपचार पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापुरातील ऐतिहासिक शाहू मिलच्या संरक्षक भिंतीचा काही भाग पावसामुळे कोसळला
संपूर्ण भिंत कोसळण्याची भीती
गेल्या पाच दिवसापासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली भिंत
कोटीतीर्थ तलावाकडे जाणाऱ्या मुख्य संरक्षक भिंतीला निर्माण झालाय धोका
संपूर्ण संरक्षक भिंत काढून घेण्याची गरज
ऐतिहासिक वास्तू असलेल्या शाहू मिलच्या इमारतीकडे प्रशासनाचं होतंय दुर्लक्ष