मुंबई : देशातील काही भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे तर काही भागात कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार 1 जूनपासून आत्तापर्यंत देशात सरासरीच्या 94 टक्के पाऊस झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 96 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या आठवड्यात राज्यातून मान्सून माघारी परतण्यास सुरुवात होणार आहे.  केरळसह (Kerala) महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
 
राज्यात फक्त कोकणात समाधानकारक पाऊस झाला आहे. कोकणात सरासरीच्या 110  टक्के, मध्य महाराष्ट्रात 87 टक्के, मराठवाड्यात 87 टक्के आणि विदर्भात 97 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या आठवड्यात राज्यातून मान्सून माघारी परतण्यास सुरुवात होणार  आहे.  पुढील दोन ते तीन दिवसात देशाच्या पश्चिम-मध्य भागातून मान्सून परतण्यास सुरूवात होईल.


मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पावसाची मोठी तूट


 महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा मोठी तूट पाहायला मिळाली. सांगलीत 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या फक्त 56 टक्के पावसाची नोंद झाली तर  ४४ टक्के तूट निर्माण झाली आहे.  साताऱ्यात देखील सरासरीच्या 62 टक्के पावसाची नोंद, सोलापुरात 69 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे.  बीडमध्ये सरासरीच्या 77 टक्के पावसाची नोंद, संभाजीनगरात 87 टक्के, धाराशिवमध्ये सरासरीच्या 71 टक्के पावसाची नोंद, जालन्यात सरासरीच्या फक्त 67 टक्के पाऊस, हिंगोलीत सरासरीच्या 76 टक्के पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील दोन जिल्ह्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. अकोल्यात सरासरीच्या 75 टक्के पाऊस तर अमरावती जिल्ह्यात 73 टक्के पावसाची नोंद झाली.


मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात


नैऋत्य मोसमी पाऊसही माघार परतण्यास सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. राजस्थानमधून नैऋत्य मान्सून माघारी फिरला आहे. वायव्य आणि लगतच्या पश्चिम भारतातील आणखी काही भागांतून पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. 29 सप्टेंबरपासून पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  नैऋत्य मान्सून सामान्यपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, त्यानंतर 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. साधारणपणे 17 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरु असतो.


हे ही वाचा :                                             


Monsoon Update : हवामान विभागाची मोठी घोषणा, मान्सूनचं अखेर टाटा, बाय-बाय!