Maharashtra Rain : राज्यभरातगेल्याकाहीदिवसापासून धुवाधार पावसाच्या (Maharashtra Rain) सरीबरसातआहे. अशातच मुंबईसहउपनगरातमात्रमुसळधार पावसाचा रौद्रावतार बघायलामिळालाआहे. मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 6 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तरराज्यातअनेकभागातदुर्घटनाहोऊनजीवितहानीसहजनजीवनअक्षरशःविस्कळीतझालेआहे. अशातचआज (6 जुलै) देखील पावसाचाकहरकायमराहणारअसूनहवामानविभागाने (IMD) राज्यातीलअनेकजिल्ह्यांनाखबरदारीचाइशारादिलाआहे. तसेचसंभाव्यधोकालक्ष्यातघेतायोग्यतीकाळजीघेण्याचेआवाहन प्रशासनाकडूनकरण्यातआलेआहे. (Maharashtra Rain Alert)

Continues below advertisement

Maharashtra Rain Alert: मुंबईसहराज्यभरातकुठे-कुठेपावसाचाअलर्ट

मुंबईप्रमाणेचकोकणातदेखीलमुसळधारपावसाचाकहरबघायलामिळतआहे. अशातचप्रादेशिकहवामानविभागानेआज पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधालर ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. परिणामी, कोकण विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव कायम राहणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.  पुणे शहरासाठी पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तसेच पुणे आणि सातारा घाटामाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून रेड अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.  तसेच घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Continues below advertisement

Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार; वाहनांच्या गतीवर परिणाम 

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात जोरदार पावसामुळे वाहनांच्या गतीवर परिणाम झाला आहे. आज सोमवार असल्याने आठवड्याचा पहिलाच कार्यालयीन दिवस आहे. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची माहिती तपासून पुरेसा वेळ हाताशी ठेवावा, तसेच अत्यावश्यक काम असल्यासच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

Rain News: नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर जलमय; कमरेभर पाण्यातून चाकरमान्यांची वाटचाल, होर्डिंग कोसळले

नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरात मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमरेभर पाणी साचल्याने चाकरमानी जीव धोक्यात घालून रेल्वे स्थानकाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. दरम्यान, परिसरातील एक भलेमोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, होर्डिंग कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

नेहमी सकाळच्या वेळी रिक्षांची वर्दळ आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांनी गजबजलेला असणारा नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर आज पावसाच्या पाण्याखाली गेला असून सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जलसाच्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Raigad Rain : रायगडमध्ये रात्रभर पावसाचा कहर, सर्वच नद्या धोका पातळीबाहेर

दुसरीकडे, रायगडमध्ये रात्रभर पावसाचा कहर पाहायला मिळालाआहे. जिल्ह्यातील सर्वत्र नदीकाठच्या गावांना धोका निर्माणझालाअसून अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, उल्हास नद्यांची पाणी पातळीत मोठी वाढ झालीआहे. तरजवळजवळ सर्वच नद्या धोका पातळीबाहेर आहे. खोपोली, महाड, कर्जत, रोहा, नागोठणे, पेण पोलादपूर शहरात पुराचे पाणी कायम आहे. परिणामीरायगड जिल्ह्यात मोठी आपत्ती ओढवलीआहे. अनेक भागात पावसाचे पाणी शिरल्याने घरांचे मोठे नुकसान झालेआहे. तर काही भागात दरडी कोसळल्याने अनेक मार्ग बंद झालेआहेत.

Gadchiroli Rain : गडचिरोलीच्या मरागडमधील गुंडेनूर नाल्याच्या पुरामुळे सात गावांचा संपर्क तुटला

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील गुंडेनूर नाल्याला आलेल्या पुरामुळे तब्बल सात गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला. विशेष म्हणजे या नाल्यावर पुलाचे काम सुरू असले, तरी ते मुद्दत संपूनही काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. पुरामुळे गुंडेनूर, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामनमर्का आणि परिसरातील इतर गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांतील नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तसेच आजारी रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर ओसरल्याशिवाय मार्ग खुला होत नसल्याने अनेकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे, तर काही जण जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असताना, पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण झाला असता तर सात गावांतील नागरिकांना या संकटाचा सामना करावा लागला नसता, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या