Maharashtra Rain Alert: राज्यभरात क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातीलबहुतांशजिल्ह्यात पावसाच्यासरीकोसळतअसूनआगामीकाळातपावसाचा जोर (Maharashtra Rain Alert) पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोकण आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गुरुवारी (ता. 13) पावसाचा अंदाज (Weather Forecast) वर्तविला आहे. तरदुसरीकडेमुंबईच्या (Mumbai Rain) पश्चिम उपनगरात सकाळपासूनचमध्यमते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 13, 14 आणि 15 ऑगस्ट या तीन दिवसांत महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यातआली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेसंभाव्यपावसाचाइशारालक्ष्यातघेतायोग्यतीखबरदारीघेण्याचेआवाहन प्रशासनाकडूनकरण्यातआलेआहे.
Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनचमध्यमते मुसळधार स्वरूपाचापावसाच्यासरी
मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनचमध्यमते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, विलेपार्ले या सर्व परिसरात मुसळधार पावसाच्यासरी बरसत आहेत.
असाच जोरदार पाऊस काही वेळ सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात सखल भागत पाणी भरायला सुरुवात होणार आहे. पश्चिम उपनगरात गोरेगाव, मालाड, कांदिवली या परिसरात पावसाच्या जोर जास्त आहे. मुंबईत सकाळपासून सुरू असलेला अधून मधून जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचेबघायलामिळालेआहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीहून वांद्रेकडे जाणारा साउथ रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माणझालीआहे.
Western Express Highway Traffic: पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूककोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
पश्चिम द्रुतगती महामार्गावर मालाड,गोरेगाव, जोगेश्वरी,अंधेरी, विलेपार्ले या सर्व परिसरात रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गोरेगाव आरे कॉलनी परिसरात सुद्धा गाड्यांचा लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. गोरेगाव आरे कॉलनी ते मरोळ नाका आणि पवईकडे जाणारा मुख्य रस्त्यावर आरे कॉलनी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झालीआहे. खरंतर सकाळची वेळ आहे. मोठ्या संख्यामध्ये चाकरमानी कामावर जाण्यासाठी खाजगी गाड्या घेऊन निघाले आहेत. अशा मध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गची या वाहतूक कोंडीचा मोठा फटका त्यांना बसत आहे. मालाड ते विलेपार्ले अर्धा तासाच्या प्रवास आहे. मात्र या वाहतूक कोंडीमुळे एक ते दीड तासांमध्ये वाहन चालकांना करावा लागत आहे. तर दुसरी बाजू पश्चिम द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडी काढण्याचे प्रयत्न देखील वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे
Vidarbha Rain: विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड, पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा परिणाम खरिपाच्या पिकावर
अशातच, विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पावसाचा बॅकलॉग वाढला आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा परिणाम खरिपाच्या पिकावर होण्याची भीती आतावर्तवलीजातआहे. सध्या पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झालीआहे. जुलैच्या शेवटच्या दिवसात दमदार पावसाने दिलासा दिल्यानंतर ऑगस्टपासून पुन्हा मान्सून गायब झाला आहे. जुलैअखेर झालेल्या पावसाने विदर्भातील तूट काही प्रमाणांत भरून निघाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने दांडी मारल्याने परिस्थिती पुन्हा चिंताजनक असल्याचे चित्रआहे.
Vidarbha Rain : विदर्भाची एकूण पर्जन्यमान तूट 13 टक्क्यांवर
मिळालेल्यामाहितीनुसार, 1 जुन ते 12 ऑगस्ट दरम्यान नागपूर जिल्ह्यात 483 मीमी पावसाची नोंद झाली असून सरासरी 610.6 मीमीच्या तुलनेत तब्बल 21 टक्के तूट आहे. विदर्भाची एकूण पर्जन्यमान तूट 13 टक्क्यांवर पोहचली. यामध्ये केवळ गोंदिया, बुलढाणा जिल्ह्याची स्थिती सध्या समाधानकारक आहे. अमरावतीमध्ये सर्वाधिक 26 टक्के तूट आहे. चंद्रपूर मध्ये 22 टक्के तूट, अकोल्यात 20 टक्के तूट, गडचिरोलीत 18 टक्के तूट तर वाशीममध्ये 10 टक्के पाऊस कमी झाला आहे. बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा 10 टक्के पाऊस अधिक झालाय. तर यवतमाळमध्ये सरासरीच्या जवळपास पावसाची नोंद झालीआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
