Maharashtra Shiv Sena MLA Latest Updates : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना आज भल्या पहाटे सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं हे सर्व आमदार गुवाहाटीला रवाना झाले. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही.
स्वत: एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत 'शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत.' असं म्हटलं. मात्र एकनाथ शिंदे यांनी सोबत 40 आमदार असं म्हणत असले तरी त्यात अपक्ष आणि इतरांना धरण्यात दोन तृतीअंशच्या नियमानुसार अर्थ नाही. शिवसेनेतील किती आमदार आहेत हे महत्वाचं असणार आहे. कारण पुढची सारी गणिते, चित्र, शक्यता या त्यावरच अवलंबून आहेत.
आकड्यांबाबत बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, शिवसेनेचे 33 आमदार आणि 3 अपक्ष असे एकूण 36 आमदार एकत्र आहेत.
तर हाच आकडा सांगताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी वेगळा सांगितला आहे. शिरसाट यांनी सांगितलं की, आम्ही सर्वजण सोबत आहोत. शिवसेनेचे 35 आमदार आणि 5 अपक्ष असे एकूण 40 आमदार सोबत आहेत. दुपारपर्यंत 46 च्या पुढे जाईल. त्यात शिवसेनेचे 40 आमदार असतील, असाही दावा त्यांनी केला आहे. आपापल्या इच्छेनं आणि एकदिलानं आपण इकडे आलो असल्याचं बच्चू कडू आणि शिरसाट यांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय; सामनातून हल्लाबोल
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात; कोण आहेत CR पाटील?