CM Eknath Shinde : केंद्रीय निवडणूक आयोगाचा (Central Election Commission) निर्णय आमच्या बाजूनं आल्यामुळं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय, त्यामुळं ते घाबरले आहेत, बिथरले आहेत. त्यामुळं आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले. 


मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही, बोललो तर अनेकांची अडचण होईल


 उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिफ्ट दिलेला होता. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही. त्यावर काही बोलणार नाही, मला बोलायला लावू नका, मी बोललो तर अनेकांची अडचण होईल असे वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं. आम्हाला संपत्ती चा मोह नाही, कधीही नव्हता. आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


CM Eknath Shinde on MPSC : MPSC प्रश्नावर तोडगा काढतोय


एमपीएससीच्या (MPSC) प्रश्नावर आम्ही तोडगा काढतोय. आम्ही मुलांनीही बोललो आहे.  दुपारी बोलताना MPSC विषय सुरू असताना निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने निघाले आहे. सध्या निवडणूक आयोग,  कोर्ट या  गोष्टी जोरात चालू असल्यामुळं असे चुकून म्हटल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता काही लोकांना निवडणूक आयोगाची अॅलर्जी झाली आहे. त्यातून मला ट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आम्ही प्रश्न सोडवतो एमपीएससी प्रश्नावर राजकारण सुरु आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही आम्ही प्रश्न सोडवणारे आहोत असंही ते म्हणाले. 


CM Eknath Shinde on Sanjay Raut : खरी शिवसेना आमच्याकडेच


धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली आहे. निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे खरी शिवसेना आमच्याकडेच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतला दिलेली धमकी हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला स्टंट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Politics : शिवसेना अन् धनुष्यबाणाची सुनावणी 17 मार्चला, तोपर्यंत...