Maharashtra Politics Devendra Fadnavis:  आधी शिवसेना (Shiv Sena) आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडली आहे. या फुटीमागील सूत्रधार म्हणून राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाची चर्चा आहे. आज पार पडलेल्या भाजपच्या महाविजय 2024 (BJP Mahavijay) कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात पक्ष फुटीबाबत स्पष्ट वक्तव्य केले. फडणवीस यांनी पक्ष फुटण्याचे समर्थन करताना हा अधर्म नव्हे तर कूटनीती असल्याचे म्हटले. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समारोपीय भाषणात म्हटले की,  2019 ला कोण मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरले होते. ते सर्वाशी बोलून झाले होते. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. हा खंजीर भाजपाच्या पाठीत होता. उत्तमराव ते गोपीनाथ राव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते राबले त्यांच्या पाठीत होता. अपमान सहन करू बेइमानी नाही.असंख्य कार्यकर्त्यांच्या बेइमानी होती. हा धर्म आहे अधर्म आहे. कर्णाचे कवच कुंडल काढून घेतल्या शिवाय त्याला मारता येणार नाही. कृष्णाने काय काय केलं. भीष्माला हल्ला करण्यासाठी शिखंडीला समोर आणलं. अश्वथामाबाबतही 'नरो वा कुंजरोहा' ही भूमिका घ्यावी लागली. ही  कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा कूटनीती करावी लागते, असेही फडणवीस यांनी म्हटले. दोन दोन पक्ष फोडले घर फोडले असा आरोप होतो. जनाधराचा अपमान कोणी केला असा प्रश्न करताना ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येईल असे वक्तव्य ही त्यांनी केले. 


भगवान कृष्णाच्या कूटनितीची शेकडो उदाहरणे आहेत. फरक फक्त इतकाच की, धर्मावर प्रेम करणारे याला कूटनिती म्हणतात. अधर्मावर प्रेम करणारे याला बेईमानी म्हणतात...‘परित्राणाय साधूनाम’.... हे नुसते चालणार नाही, तर ‘विनाशायचं दुष्कृताम्’ हे पूर्णत्त्व आहे. नैतिक, अनैतिकतेचा प्रश्न विचारणार्‍यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे, असेही फडणवीस यांनी म्हटले. 


शिवसेनेसोबत भावनिक युती 


शिवसेनेसोबत आपली भाजपची भावनिक युती आहे. एका विचाराने एकत्र आलो आहोत. तर, राष्ट्रवादीसोबत आम्ही पॉलिटिकल मैत्री केली आहे. ही राजकीय मैत्री कदाचित दहा वर्षांनी ती सुद्धा भावनिक युती होईल असेही फडणवीस यांनी म्हटले. 


उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. काही लोक शपथा खोट्या घेतात. मला खात्री आहे, त्यांनी नक्की म्हटले असेल राजकारणासाठी अशी खोटी शपथ घ्यावी लागते. त्यांनी मनोमन पोहरादेवीची माफी मागितली असेल आणि पोहरादेवी त्यांना माफ करो असा टोला त्यांनी उद्धव यांना लगावला.  2019 ला कोण मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरले होते आणि हा निर्णय सर्वांशी बोलून झाला होता. पण त्यांनी खंजीर खुपसला. याला बेइमानीच म्हणावी लागेल. दुसरा शब्द नाही असे फडणवीस यांनी म्हटले. 


 


इतर संबंधित बातमी: