Sanjay Raut : महाराष्ट्रात (Maharashtra) सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत. शेतकरी लाँग मार्च घेऊन मुंबईत धडकत आहेत, याच अर्थ महाराष्ट्र खदखदतोय असं वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. जनतेच्या मनातील सरकार आम्ही सत्तेवर आणलं असे म्हणत होते. पण जनतेच्या मनातील सरकार असते तर जनता रस्त्यावर उतरली नसती असा टोलाही राऊतांनी लगावला. हे सरकार शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विरोधातील असल्याचे राऊत म्हणाले. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


सामंतांनी केलेल्या आरोपाचं काय झालं? राऊतांचा सवाल


सुभाष देसाईंनी (Subhash Desai) निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्याचा मुलगा भूषण देसाईंचा (Bhushan Desai) शिवसेनेशी काही संबंध नसल्याचे सुभाष देसाईंनी सांगितल्याचे राऊत म्हणाले. शिंदे गट कधी बाप पळवतात तर कधी मुलं पळवतात असा टोला राऊतांनी लगावला. ही त्यांची मेगाभरती कुचकामी आहे. शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी भूषण देसाई यांच्या संदर्भात काही आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असंही त्यांनी सांगितले होते. सामंतांनी केलेल्या आरोपाचं काय झालं? असा सवालही राऊतांनी केला. सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. आदर्श नेते असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्या चिरंजीवांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला काही फरक पडणार नाही. कारण ते कधी शिवसेनेत नव्हते असेही राऊत म्हणाले.


महाराष्ट्रात महिलांची बदनामी होता कामा नये


शिंदे गटात कोणी प्रवेश केल्याने शिवसेनेच्या वाढीवर, विस्तारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. एकदा आम्ही संघर्षाला उतरल्यावर सगळ्या संकटांना सामोरं जाऊ असेही राऊत म्हणाले. शितल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी अनेक जणांना केली जात आहे. यासंदर्भात देखील राऊतांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी राऊत म्हणाले की, अटक करणं अत्यंत चुकीचं आहे. हा कायद्याचा गैरवापर असल्याचे राऊत म्हणाले. तो व्हिडीओ खरी की खोटा याचा आधी शोध घ्यावा असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात महिलांची बदनामी, शोषण होता कामा नये या मताचे आम्ही आहोत. महिलांबाबत सभ्यपणे शब्द वापरले पाहिजेत. सगळ्यांनीच महिलांचा सन्मान केला पाहिजे असे राऊत म्हणाले. 


राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव


देशाच्या संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव सुरु आहे. त्याच्याविरोधात राहुल गांधी बोलले. देशात रोज लोकशाहीची हत्या होत आहे. याबाबत राहुल गांधी बरोबर बोलल्याचे राऊत म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut : लोकसभा-विधानसभा एकत्रित लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय, भाजपला जागा दाखवणार: संजय राऊत