व्हिएतनामध्ये फडकले ठाकरे बंधूंचे बॅनर, राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचं आवाहन
व्हिएतनामची राजधानी हनोई येथे मराठी बांधवांच्या वतीने एक ऐतिहासिक क्षण अनुभवण्यात आला आहे. येथील महाराष्ट्रीयन नागरिकांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संयुक्त बॅनर फडकावला आहे.

Maharashtra Politicis : व्हिएतनामची राजधानी हनोई येथे मराठी बांधवांच्या वतीने एक ऐतिहासिक क्षण अनुभवण्यात आला आहे. येथील महाराष्ट्रीयन नागरिकांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संयुक्त बॅनर फडकावला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख रोहिदास मुंडे यांनी ठाकरे बंधुंचा बॅनर फडकवून एक आगळा संदेश दिला आहे. महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी इच्छा नागरिकांनी व्यक्त केली.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून ठाकरे बंधुंनी एकत्र यावे
हा बॅनर केवळ दोन नेत्यांची छायाचित्रे नव्हती, तर ती एक भावना होती. एकतेची, बंधुभावाची आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची. व्हिएतनाममधील तसेच जगभरातील मराठी माणसांचे हे आवाहन आहे की महाराष्ट्रात दोन प्रभावशाली नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे. ज्या प्रकारे देशांतर्गत नागरिक या एकतेची अपेक्षा बाळगून आहेत, त्याचप्रमाणे परदेशातील मराठी बांधवही भावनिकरित्या आपल्या मातृभूमीशी जोडले गेले आहेत. त्यांच्या मते, आजच्या काळात महाराष्ट्राला स्पष्ट दिशा, विकासाभिमुख नेतृत्व आणि मराठी अस्मितेचा बुलंद आवाज आवश्यक आहे.जो केवळ ठाकरे बंधूंनी मिळूनच शक्य आहे. ही घटना एक उदाहरण आहे की, मराठी अस्मिता ही केवळ राज्यापुरती मर्यादित नाही, तर तिचे प्रतिबिंब आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटत आहे.
मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत
मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत असे मत देखील येथील नागरिकांनी व्यक्त केलं आहे. राजकारणात भिन्नता असली तरी महाराष्ट्रासाठी एकवाक्यता हवी. असा विश्वास या उपक्रमामागे असलेल्या स्थानिक मराठी संघटनांनी व्यक्त केला आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी घडलेल्या एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-शिवसेना युतीला ब्रेक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:


















