Aniket Tatkare : आमच्याविषयी वारंवार शिवसेना शिंदे गटाकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांचा आशीर्वाद घ्यायला सकाळ दुपार संध्याकाळ कोण यायचं असा टोला देखील अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) यांना लगावला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या टिकेनंतर अनिकेत तटकरे यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.
ते कितीही खालच्या पातळीवर गेले तरी आम्ही आमची पातळी सोडणार नाही. त्यांचा सुसंस्कृतपणा त्यांच्या वाणीतून दिसून येत आहे.आमच्यावर टीका करणे काही नवीन नाही तटकरे परिवाराचा गेले अनेक वर्षांचा राजकारणातला संघर्ष आहे असे अनिकेत तटकरे म्हणाले. मात्र, वेळ आल्यावर जशास तसं उत्तर आम्ही देऊ असे अनिकेत तटकरे म्हणाले. सुनील तटकरे हे बादशाह आहेत हे त्यांनी कबूल केलं आहे. तटकरे हे रायगडचे बादशाहच आहेत असेही अनिकेत तटकरे म्हणाले. आमच्यावर टीका करून पदव्या देण्यापेक्षा सुनील तटकरे यांची जी रायगड जिल्ह्यात पदवी आहे तीच आम्ही मानतो असेही ते म्हणाले.
आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे कामं केलं
महेंद्र थोरवे हे स्वतःच अपयश लपवण्यासाठी आता दुसऱ्यांवर बोट दाखवत आहेत असे म्हणत अनिकेत तटकरे यांनी भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांचा समाचार घेतला. विधानसभा निवडणूकीत आम्ही महाड आणि अलिबाग मतदारसंघात गोगावले आणि दळवी यांच्यासाठी काय काय केले. हे माझ्याकडे मुठीत झाकलेले आहे असेही ते म्हणाले. आम्ही त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं आहे असे ते म्हणाले.
दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊदे
शिंदे सेनेचे तीनही आमदार आता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आमच्या राष्ट्रवादीवर आणि तटकरे परिवारवर टीका करत आहेत असे अनिकेत तटकरे म्हणाले. सुनील तटकरे यांनी आम्हाला तिघांना पाडण्यासाठी विधानसभा निवडणूकीत प्रयत्न केले. पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात येऊन स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावं अस भरत गोगावले यांनी विधान केलं होत. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, आमची सुध्दा तुमच्या म्हणण्यानुसार कोणत्याही मंदिरात येण्याची तयारी आहे. त्यांचं चॅलेंज आम्ही स्वीकारलं आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊदे असेही ते म्हणाले.