Jitendra Awhad On BJP : 'भारत जोडो'यात्रेत (Bharat Jodo Yatra)  काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापत आहे. हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (BJP Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या विरोधात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधत ट्विट केले आहे, त्यात ते म्हणतात, शिवाजी महाराजांवर भाजपकडून असे वक्तव्य करणारा ठार वेडाच असू शकतो. नेमकं प्रकरण काय?


 






भाजपच्या 'या' वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वातावरण तापले


भाजपच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वातावरण तापले आहे. विशेषतः महाराष्ट्रातील लोकांची छत्रपती शिवाजी महाराजांवर नितांत श्रद्धा आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्रिवेदी म्हणाले की, त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


 


शिवाजी महाराजांवर भाजपकडून आक्षेपार्ह वक्तव्य
एका खासगी वृत्तवाहिनीने राहुल गांधींच्या सावरकरांच्या वक्तव्यावर वादविवाद आयोजित केला होता. या चर्चेत भाजपचे प्रवक्ते म्हणून सुधांशू त्रिवेदी उपस्थित होते. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रेही लिहिली होती. या विधानानंतर राहुल गांधींना घेरण्याऐवजी भाजपवर रोष व्यक्त केला जात आहे. याआधी राहुल गांधी यांनी सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती तसेच इंग्रजांकडून पेन्शन घेत असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Bharat Jodo : आज 'भारत जोडो'चा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस, असे असतील कार्यक्रम