मुंबई : सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली. त्यामुळे सेनेत फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि याच परिस्थितीत सेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचं हत्यार उपसलं. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. पाहूयात याच पार्श्वभूमीवर दिवसभरात घडलेल्या घडामोडींचा घेतलेला हा आढावा घेतला आहे. 


सकाळी 7 वाजता -  शिवसेनेतले प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली. शिंदेचा गट काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याती माहिती 


सकाळी 7.15 -  शिंदेंच्या नाराजीची कुणकुण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली... वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलवण्याचे आदेश


सकळी 8 वाजता - 'नॉट रिचेबल' एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याची माहिती  आली. एकनाथ शिंदे यांना फोन केला असता गुजराती टोनमध्ये संदेश ऐकू येत होता.


सकाळी 9 वाजता -  शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या 25 पेक्षा जास्त गटासह सूरतमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती समोर आली.सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे 11 आमदारांसह रात्री उशिरा प्रवेश करतानाचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली.  


सकाळी 9.20 वाजता : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नाराज असताना शिवसेनेचे जवळपास 25 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. यांत बुलढाण्यातील दोन आमदारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.  मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे दोन्ही शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल असणऱ्यांची नावे समोर


सकाळी 10 वाजता : एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू झाला. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अनेक शिवसेना आमदारांना फोन करण्यात आली. आमदारांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न  सुरू झाला


सकाळी 10.30 -  25  नॉट रिचेबल आमदारांपैकी मराठवाड्याचे 6, कोकणातील 3, पश्चिम महाराष्ट्रातील 4, विदर्भातील दोन आमदारांचा समावेश असल्याची माहिती समोर


सकाळी 11.00 -  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीत पोहोचले. विधानपरिषद निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबद्दल फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा...फडणवीस यांच्या या दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण


सकाळी 11.30 -  जागतिक योग दिनानिमित्त शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट केली. योग म्हणजे संतुलित मन, सुखी निरोगी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.


सकाळी 11.45 - महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला. तर मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी दौरा आणि छगन भुजबळ यांचा नियोजित नाशिक दौरा रद्द. तर दुसरीकडे कोकणातील शिवसेना आमदार मुंबईत पोहोचले


दुपारी 12.00- राज्यातील राजकीय नाट्याबाबत शरद पवार... जयंत पाटील चर्चा... दिल्लीतून शरद पवार यांची जयंत पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली.


दुपारी 12.40 - काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा घरोबा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अमान्य होता. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा
घरोबा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अमान्य असल्याची माहिती समोर


दुपारी 1.00-  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यात चर्चा तसंच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हेसुद्धा दिल्लीला रवाना 


दुपारी 1 .15 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर, रवी फाटक  सूरतकडे रवाना... एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा  करण्यासाठी ठाकरेंचे विश्वासू सूरतला निघाले... उद्धव ठाकरेंनी आपला निरोप निकटवर्तीयांच्यामार्फत एकनाथ शिंदेंकडे पाठवला.


दुपारी 1.30 - वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक


दुपारी 1.30  - राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला... मंत्रालयात अजित पवार यांच्या दालनात बैठक


दुपारी 1.40 -  काँग्रेस मंत्री आणि आमदारांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना...  संध्याकाळी पुन्हा एकदा काँग्रेसची बैठक होणार आहे.


दुपारी 1.45 -  एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेची खलबतं.. वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे 33 नेते दाखल


दुपारी 2 - कुणाला मुख्यमंत्री करायचा हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचंही पवारांनी म्हटलंय. तसंच सरकार पडलं तर विरोधी बाकावरही बसू शकतो असंही पवारांनी स्पष्ट केलंय.


दुपारी 2.00 - शिवसेनेची 'वर्षा'वर सुरु असलेली बैठक संपली. शिवसेनेच्या 55 पैकी 18 विधानसभा आमदारांची बैठकीला उपस्थिती 


दुपारी 2.15 - भूपेंद्र यादव, मंगलप्रभात लोढांची 'ऑपरेशन'साठी निवड केल्याची माहिती समोर... सूरतमधील फार्महाऊसची भाजप नेत्यांकडून बुकिंग...


दुपारी 2.45 - एकनाथ शिंदेंही बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. शिंदेंशी बोलणे होत नाही तोवर कोणतंही वक्तव्य करणार नसल्याचे राऊतांनी म्हटलंय. तसंच मुख्यमंत्र्यांबाबत काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करता येतील असंही राऊतांनी म्हटलंय. 


दुपारी 3.00 - शिंदेंच्या बंडाळीनंतरशिवसैनिक आक्रमक... सेना भवनाबाहेर शिवसैनिक जमायला सुरुवात


दुपारी 3.15 -  गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटलांच्या  भेटीला भागवत कराड


दुपारी 3.45 -मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक सूरतमध्ये पोहोचले.. एकनाथ शिंदेंच्या जुन्या सहकाऱ्यांना 10 मि. ताटकळत ठेवलं


दुपारी 3.50 -  शिंदेंचा कोणताही  प्रस्ताव शिवसेना  स्वीकारणार नाही. शिवसेनेत प्रस्ताव देण्याची पद्धत नाही, शिवसेना नेत्यांच्या बैठकीत भूमिका, तर एकनाथ शिंदेचा डाव उधळून लावण्याचा  शिवसेनेचा प्रयत्न


साायंकाळी 4.39 - शिवसेनेचे नार्वेकर आणि फाठक सुरतच्या मेरेडियन हॉटेलमध्ये पोहोचले


 साायंकाळी 4.45 - 10 मिनिटांच्या खोळंब्यानंतर शिवसेना नेत्यांचा मेरिडियन हॉटेलमध्ये प्रवेश


सायंकाळी 5.30 -  एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांच्यातील बैठक संपली