नवी दिल्ली महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray) आणि शिवसेना शिंदे (Eknath shinde) गट शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? यावरुन आमनेसामने आहेत. शिवसेना (Shivsena) कुणाची यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटात सुरु असलेल्या न्यायलयीन सुनावणीचा आज  दुसरा टप्पा सुरू होणार आहे.हे. या सुनावणीदरम्यान न्यायालयात काय घडू शकतं याबाबत सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे Ujjwal Nikam) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळण्याची शक्यता आहे असं सिद्धर्थ शिंदे म्हणाले.


आजच्या सुनावणीत कोर्टाचा कल समजणार


सिद्धार्थ शिंदे म्हणाले,  सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दोन सलग सुनावण्या आहेत.  पहिली पक्ष आणि चिन्हांसंदर्भात याचिका आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी सोबतच विधानसभा अध्यक्षांविरोधातील याचिकेचीही सुनावणी होणार आहे.  16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत उशीर होत असल्यानं ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्षांविरोधात याचिका आहे. आज सविस्तर सुनावणी होण्यची शक्यता कमी आहे.  परंतु आजच्या सुनावणीत कोर्टाचा कल समजणार आहे. आजच्या सुनावणीनंतर कोर्टाची पुढील सुनावणी कधी होणार हे आजच्या सुनावणीत  पुढील सुनवाणी कधी होणार या संदर्भात माहिती मिळणार आहे. परंतु आज पक्ष आणि चिन्ह अजूनही शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. तो निवडणूक आयोगाचा निर्णय होता. त्या निर्णयाविरोधात याचिका दाखल झाली आहे. निवडणूक आयोगाचा शिवसेनेबाबत जो निर्णय आहे तो घटनेच्या आधारे आहे का ते तपासले जाईल आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल. मात्र तो निर्णय काय असेल हे आताच सांगता येणं कठीण आहे.


सुप्रीम कोर्ट काय करते? याची उत्सुकता महाराष्ट्राला


जेव्हापासून महाराष्ट्रात सत्तांतर झाले त्या दिवसापासून संपूर्ण राज्याची नजर ही सुप्रीम कोर्टाच्या घडामोडींकडे असते. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी अजूनही पुढचा भाग बाकी आहे. कारण विधानसभा अध्यक्षांकडे सुप्रीम कोर्टाने काही अधिकार सोपावले आहेत. त्यानंतर सुप्रीम कोर्ट काय करते? याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. विधानसभा अध्यक्ष सुनावणीला उशीर करतात त्यासंदर्भात ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे.  विधानसभा  अध्यक्षांनी सुनावणीला सुरुवात केली आहे. एक दिवस देखील पार पडला आहे. याविषयी कोर्ट अध्यक्षांच्या कामकाजाविषयी काय टिप्पण्णी करते हे महत्त्वाचे आहे. 


हे ही वाचा : 


Ujjwal Nikam : ठाकरे की शिंदे, सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाच्या बाजूने? उज्ज्वल निकम यांनी सविस्तर सांगितलं!