एक्स्प्लोर

Maharashtra per capita income : दरडोई उत्पन्नात मराठवाड्यातील सर्वाधिक जिल्हे पिछाडीवर; राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून मोठी माहिती समोर

Maharashtra per capita income : दरडोई उत्पन्नात मराठवाड्यातील सर्वाधिक जिल्हे पिछाडीवर; राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून मोठी माहिती समोर

Maharashtra per capita income : विधिमंडळात सादर झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील 34 जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील सर्वाधिक जिल्हे हे खालच्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न 2 लाख 78 हजार 681 रुपये आहे, तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न हे 1 लाख 88 हजार 892 रुपये आहे. राज्यात एकूण 36 जिल्हे असले तरी आर्थिक पाहणी अहवालात मुंबई शहर आणि उपनगर हा एकच जिल्हा गृहीत धरण्यात आला आहे, तर ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांचे एकत्र दरडोई उत्पन्न दाखविण्यात आले आहे.

अहवालातील आकडेवारीनुसार राज्यातील 12 जिल्हे हे देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली आहेत. यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. 34 जिल्ह्यांमध्ये नांदेड-25 क्रमांकावर, जालना-26, बीड 27, परभणी 28 आणि हिंगोली 30 क्रमांकावर आहे, तर देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली असलेल्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे, तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचेही सरासरी दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरीच्या खाली आहे, तर देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली असलेल्या जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही.

महाराष्ट्राच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त दरडोई उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, ठाणे (पालघरसह), पुणे, नागपूर, रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई नंबर वनवर, तर नंदुरबार सर्वांत शेवटी आहे.

१) सर्वांत जास्त दरडोई उत्पन्न ४,५५,७६७ हे मुंबईचे आहे, तर त्याखालोखाल ठाणे (पालघर मिळून) ३,९०,७२६, तिसऱ्या क्रमांकावर पुणे ३,७४,२५७ रुपये, तर चौथ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा ३,२२,९२७ रुपये आहे.

१) सर्वांत शेवटी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचा क्रमांक असून, तेथील दरडोई उत्पन्न दीड लाखाच्या घरात आहे. तर दरडोई उत्पन्नाच्या क्रमवारीत गडचिरोली हा आदिवासी जिल्हा बुलढाणा आणि वाशिमच्या वर आहे.

जिल्हे आणि दरडोई उत्पन्न

राज्याच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेले जिल्हे

१) मुंबई - ४,५५,७६७

२) ठाणे - ३,९०,७२६

३) पुणे - ३,७४,२५७

४) नागपूर - ३,२२,९२७

५) रायगड - ३,१५,६८१

६) कोल्हापूर - २,८२,२९७

७) सिंधुदुर्ग - २,७९,०८०

देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेले जिल्हे :

८) सांगली - २,५८,५५७

९) सोलापूर - २,५३,०८८

१०) नाशिक - २,४९,०००

११) रत्नागिरी - २,४५,४२१

१२) सातारा - २,४१,३६९

१३) छत्रपती संभाजीनगर - २,३५,६७७

१४) अहिल्यानगर - २,३०,८१९

१५) वर्धा - २,२५,६९१

१६) चंद्रपूर - २,२१,८४६

१७) अकोला - १,९७,३३४

१८) भंडारा - १,९३,४१८

१९) लातूर - १,९३,१५२

२०) अमरावती - १,९१,४०१

२१) धाराशिव - १,९०,३८३

२२) धुळे - १,८९,३८४

देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असलेले जिल्हे :

२३) गोंदिया - १,८३,४१४

२४) जळगाव - १,८२,६९६

२५) नांदेड - १,८१,०१३

२६) जालना - १,७८,३२९

२७) बीड - १,७७,२४०

२८) परभणी - १,७५,७५८

२९) यवतमाळ - १,६०,०८८

३०) हिंगोली - १,४७,३३३

३१) गडचिरोली - १,४०,८६०

३२) बुलढाणा - १,३७,२३५

३३) वाशिम - १,३४,७५४

३४) नंदुरबार - १,२९,१४६

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Solapur Politics : विधानसभेच्या झटक्यातून सावरण्यापूर्वीच बबनदादा शिंदेंच्या पुत्राला आणखी एक मोठा धक्का

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chitra Wagh: त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
PSU Banks Share : सार्वजनिक बँकांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, बँक निफ्टीत तेजी सुरु, कारण समोर, तज्ज्ञ म्हणतात...
सार्वजनिक बँकांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, बँक निफ्टीत तेजी सुरु, कारण समोर, तज्ज्ञ म्हणतात...
Ratnagiri News: ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
Sanjay Raut: हाडाचा शिवसैनिक... बाळासाहेबांसाठी दुर्धर आजारपण बाजूला सारुन संजय राऊत घराबाहेर पडले
हाडाचा शिवसैनिक... बाळासाहेबांसाठी दुर्धर आजारपण बाजूला सारुन संजय राऊत घराबाहेर पडले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut at Shivaji Park : तोंडाला मास्क लावून बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संजय राऊत शिवाजीपार्कात
Mumbai CNG Cut: मुंबईत CNG गॅसचा तुटवडा, रिक्षा-कॅब वाहतूक ठप्प होण्याची शक्यता
Uddhav Thackeray on Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन
Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chitra Wagh: त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
PSU Banks Share : सार्वजनिक बँकांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, बँक निफ्टीत तेजी सुरु, कारण समोर, तज्ज्ञ म्हणतात...
सार्वजनिक बँकांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, बँक निफ्टीत तेजी सुरु, कारण समोर, तज्ज्ञ म्हणतात...
Ratnagiri News: ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
Sanjay Raut: हाडाचा शिवसैनिक... बाळासाहेबांसाठी दुर्धर आजारपण बाजूला सारुन संजय राऊत घराबाहेर पडले
हाडाचा शिवसैनिक... बाळासाहेबांसाठी दुर्धर आजारपण बाजूला सारुन संजय राऊत घराबाहेर पडले
बाईकवरुन जाताना गळ्यावर धारदार मांजा फिरला, मांसाचा लगदा बाहेर आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्याचा गळा कापला
बाईकवरुन जाताना गळ्यावर धारदार मांजा फिरला, मांसाचा लगदा बाहेर आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्याचा गळा कापला
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना भेटला, पंतप्रधान कार्यालयाचा सचिव असल्याचं सांगितलं, पण पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन्...
लग्नात देवेंद्र फडणवीसांच्यासमोर स्वत:चा सत्कार करुन घेतला, तितक्यात पोलिसांना संशय आला अन्...
Ind vs Sa 1st Test : टीम इंडियावरच 'तो' डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा, सौरव गांगुली संतापला, म्हणाला...
टीम इंडियावरच 'तो' डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा, सौरव गांगुली संतापला, म्हणाला...
IND vs PAK Asia Cup Rising Stars: कॅच पकडूनही नॉट-आउट दिले, सगळे अंपायरच्या अंगावर धावले, नको नको ते बोलले; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधीही न पाहिलेला राडा!
कॅच पकडूनही नॉट-आउट दिले, सगळे अंपायरच्या अंगावर धावले, नको नको ते बोलले; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधीही न पाहिलेला राडा!
Embed widget