Chhagan Bhujbal : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी असे बोलायला नको होते, भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) उद्देश चांगला. आतापर्यत माध्यमे यात्रेकडे फिरकत नव्हते आता, राहुल गांधींच्या बोलण्यामुळे वृत्त वाहिन्या किमान यात्रेला दाखवू लागले आहेत, सावरकर यांच्याबद्दल आदर, मात्र त्यांचा राजकारणासाठी वापर होत आहे अशी टीका छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावेळी केली. 


छगन भुजबळ यांनी नाशिक (Nashik) शहरातील भुजबळ फार्मवर पत्रकार परिषद घेत आपली भूक मंडळी. यावेळी सावरकर, राहुल गांधी, राजकारण, आरक्षण आदींवर त्यांनी प्रकाश टाकला. ते यावेळी म्हणाले कि, देशात काय चालू आहे, काही समजत नाही. एकमेव आशा सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. ईडब्ल्यूएससाठी आरक्षण मर्यादा ओलांडली आहे, तर आम्हाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे, असा सवालच भुजबळांनी उपस्थित केला. या सगळ्यांबाबत सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. ईडब्ल्यूएसमध्ये देखील एससी, एसटी, ओबीसी यांचा समावेश व्हावा. ईडब्ल्यूएससाठी 10 टक्के आरक्षण देऊन तुम्हीच 50 टक्के ही मर्यादा ओलांडली आहे. हा ओबीसी आणि मराठा समाजावर अन्याय आहे, दूजाभाव म्हणत न्याय प्रशासनांवर रोष व्यक्त केला. त्याचबरोबर ओबीसी यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं पूर्ण 27 टक्के आरक्षण देण्याची मागणी असून मराठा समाजाला देखील 10 टक्के आरक्षण द्या. अगोदरचे न्यायालय होणारच नाही, एवढेच मिळेल, आत्ताच निवडणुका घ्या, अशी घाई करत होते, आता काय झालं असा सवाल भुजबळांनी सवाल न्यायपालिकेला केला आहे. 


यावेळी छगन भुजबळ राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर म्हणाले कि, सावरकर यांच्याबद्दल आदर, मात्र त्यांचा राजकारणासाठी वापर होतोय, त्यांनी कारावास भोगला, याबाबद्दल आदर आहे. सावरकरांनी नागरिकांनी उपदेशपर संदेश दिले असून गाय उपयुक्त पशु आहेत, या सावरकरांच्या शास्त्रीय विचारांचा अंगीकार करा, असेही भुजबळ म्हणाले. शिवाय राहुल गांधी यांनी असे बोलायला नको होते, बोलण्यामुळे वृत्त वाहिन्या किमान राहुल गांधी यांना दाखवू लागले आहेत, मात्र मूलभूत समस्या मांडल्या गेल्या पाहिजेत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी माध्यमांवर केली. 


तर दुसरीकडे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हटले कि, राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही. अशा गोष्टीमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असे महत्वाचे विधान केले. या विधानावर छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडी यांच्यात एक समान धागा आहे, आपापल्या ideology सांभाळत आहेतभाजपला दूर ठेवणे हा अजेंडा होता. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत, प्रत्येक जण आपलं मात मांडायला मोकळा असल्याचे भुजबळ म्हणाले.