एक्स्प्लोर

Nashik News : नाशिक जिल्हा उपनिबंधक कार्यालय पुन्हा चर्चेत, जिल्हा उपनिबंधकावर इच्छुकांकडून नोटांची उधळण  

Nashik News : नाशिकरोड व्यापारी बँकेच्या इच्छुकांचे अर्ज अवैध ठरविल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर नोटा उधळून आंदोलन करण्यात आले. 

Nashik News : नाशिकरोड व्यापारी बँकेच्या (Nashik Road Commercial Bank) निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी लाच घेतल्याचा आरोप करीत गुरुवारी विरोधी पॅनलच्या इच्छुकांनी बलसाने यांच्यावर पाचशे आणि शंभरच्या नोटांची उधळण करीत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यालयामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

काही दिवसांपूर्वी दिंडोरी बाजार समितीतील (Dindori Bajar Samiti) संचालकाच्या बाजूने निर्णय देण्यासाठी तत्कालीन जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे (Satish Khare) याला 30 लाखांची लाख घेताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले होते. या घटनेने संपूर्ण राज्यात बदनाम झालेले नाशिकचे (Nashik) जिल्हा उपनिबंधक कार्यालय पुन्हा चर्चेत आले. नाशिकरोड व्यापारी बँकेच्या 54 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यानुसार सहकार पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. याच पार्श्वभूमीवर संबंधित उमेदवारांनी नाशिकच्या सहकार उपनिबंधक कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर नोटा उधळून भ्रष्टाचाराचे आरोप करत एक अनोखे आंदोलन करण्यात आले. 

देवळाली व्यापारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मंजूर झालेले 54 उमेदवारी अर्ज अचानक बाद करण्यात आले, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार विभागाकडून यात मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप विरोधी परिवर्तन पॅनलकडून करण्यात आला. सहकार विभागीय उपनिबंधक गौतम बलसाने या निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंगावर त्यांच्याच केबिनमध्ये पैसे उधळत परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी आंदोलन केले. यावेळी वीस खोके एकदम ओके, चोर हे चोर हे बलसाने चोर हे अशी घोषणाबाजीही करण्यात आली. पॅनलच्या सर्व सदस्यांना निवडणुकीतून बाद करण्यासाठी बलसाने कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकचे सहकार विभागाचे उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केली होती. यानंतर सहकार विभागातील भ्रष्टाचार हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. 

एका महिला जागेसाठी निवडणूक 

सहकार आणि परिवर्तन पॅनल यांच्यात लढत होणार होती, परंतु सहकार पॅनलच्या इच्छुकांनी नियम क्र. 40 नुसार निवडणूक प्रक्रिया राबवावी, यासाठी उच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली होती, त्यानुसार न्यायालयाने सहकारमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती देत जिल्हा उपनिबंधक यांना नियम क्र. 40 नुसार निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश दिले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी 54 इच्छुकांचे अर्ज अवैध ठरवले होते, परंतु यामध्ये एक अर्ज चुकीने अवैध ठरल्याचे सांगितले गेले. याच एका महिला जागेसाठी 11 जून रोजी निवडणूक होत आहे. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याने संतप्त झालेल्या परिवर्तन पॅनलच्या इच्छुकांनी माघारीच्या दिवशी बलसाने यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नोटांची उधळण केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget