Nashik Mercury : गेल्या दोन दिवसांपासुन नाशिककरांसह (Nashik) जिल्ह्यात हुडहुडी भरली असून आज अचानकपणे नाशिक शहराचा पारा 11 अंशावरून थेट 11 अंशापर्यंत (Mercury) घसरला. जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अवघे 8.1 अशांवर पारा येऊन थांबला आहे. मात्र दुसरीकडे थंडी वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.


नाशिक शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला असून गेल्या चार दिवसांपासून तापमाचा पारा 10.4 अंशांवर आलाय. जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अवघे 8.1 अशांवर पारा येऊन थांबला आहे. दरम्यान नोव्हेंबर संपायला आला तरी नाशिकमध्ये कडाक्‍याची थंडी (Cold) जाणवत नव्‍हती. मागील चार दिवसांमध्ये तापमानामध्ये कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले. म्हणजेच गेल्‍या काही दिवसांपासून तापमानात किरकोळ घसरण होण्यास सुरवात झाली आहे. त्‍यातच शनिवारी किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण शेकोट्या पेटत असून शहरात जिम, क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅकवर गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे जॉगिंग ट्रक फुलले असून नाशिककर सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे. 


दरम्यान नाशिक शहरातील मागील पाच तापमानाची आकडेवारी पहिली तर लक्षात येईल कि, एक एक अंशाने तापमानात घट झाली आहे. मंगळवार 15.2, बुधवार 14.4, गुरुवार 13.9, शुक्रवार 11.2 तर आज शनिवारी 10.4 इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांचा विचार करता किमान तापमानाचा पारा चढता आणि कमाल तपमानाचा पारा उतरता होता. शनिवारी किमान तपमान 10 अंश इतके नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अनुभवयास येत आहे. त्यामुळे नोंव्हेबर अखेर थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये देखील नीचांकी तापमान नोंदविले गेले. निफाड तालुका (Niphad) थंडीने गारठला असून शहरातही थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. शिवाय पहाटे बोच-या थंडीमुळे फेरफटका मारणा-यांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र होते. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात हुडहुडी 
दरम्यान मागील आठवड्यात नाशिक शहराचे किमान तापमान 15 अंशाच्या पुढे सरकले होते. त्यानंतर हळुहळु किमान तापमानाचा पारा खाली येण्यास सुरूवात झाली; मात्र अचानकपणे शनिवारी 10 अंशावर पारा येऊन ठेपला आहे. त्यामुळे सकाळपासून हवेत प्रचंड प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासूनच पारा घसरत असल्याने नाशिककरांनी स्वेटर परिधान करण्यास सुरवात केली आहे. नाशिककरांना हुडहुही भरू लागल्यामुळे जिम क्रीडांगणे, जॉगिंग पार्क, रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.