एक्स्प्लोर

Nashik News : नाशिककर! लहान मुलांना जपा, शहरात डोळ्यांची साथ पसरतेय, अशी आहेत लक्षणे? काय काळजी घ्यावी? 

Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) शाळा सुरू होऊन अवघे काही दिवस उलटले असताना लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे.

Nashik News : सध्या पावसाचे दिवस असून या दिवसात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. मात्र तरीदेखील अनेक जंतूंचा प्रार्दूभाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. अशातच नाशिकमध्ये (Nashik) लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. अनेक शाळांमधील मुलांना याची बाधा झाल्याने शाळेतील संख्या रोडावल्याचे चित्र आहे.

नाशिक शहरात पावसाची रिपरिप (Nashik Rain) सुरू असून शाळा सुरू होऊन अवघे काही दिवस उलटले आहेत. त्यातच लहान मुलांमध्ये डोळे येण्याची (Eye Infection) साथ पसरत आहे. यामुळे पालकांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात असून शाळांमधूनही अशा मुलांना सुटी दिली जात आहे. पावसाळ्यात (Rainy) अनेक साथीचे आजार उद्भवतात. थंडी, ताप, खोकला, तसेच सर्दी, डोकेदुखी या आजाराने नाशिककर त्रस्त झाले असून रुग्णालयात अशा रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते. फॅमिली डॉक्टर्सकडे अशा रुग्णांची मोठी रांगच लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये सध्या डोळे येण्याची साथ सुरु झाल्याचे आढळून येत आहे. जिल्हा रुग्णालयात डोळे तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील वाढली असून, डोळे येण्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. अनेक विद्यार्थी डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले असल्याने शाळांमधील उपस्थितीवर परिणाम जाणवू लागला आहे. शाळा प्रशासनाकडून अशा विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याचा सल्ला दिला जात आहे. 

दरम्यान लक्षणे आढळून येत असलेल्या पालकांनादेखील याबाबत सांगितले जात आहे. शहरातील अनेक शाळांनी डोळ्यांचा त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यास सुरुवात केली असून याचा परिणाम शाळांमधील उपस्थितीवर होत आहे, तर शालेय वाहतुकीच्या वाहनातून प्रवास करणाचा विद्यार्थ्यांची संख्या रोडावली असल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरातील नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढते. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ पसरत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. डोळे थंड पाण्याने धुवावे, कुटुबातील व्यक्तींनी रुमाल, टावेल स्वतंत्र वापरावा. सार्वजनिक ठिकाणी स्पर्श करू नये. हात स्वच्छ धुवत रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

अशी आहेत लक्षणे

दरम्यान डोळ्यांची साथ येत असताना याची लक्षणे देखील समजून घेतली पाहिजे. यात डोक्यात टोचणे खुपल्यासारखे होणे. डोळ्यांचा रंग लाल, गुलाबी होणे. जळजळ होते, तर खाज सुटते. सकाळी डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे, डोळ्यांतून सारखे पाणी वाहणे, अशी लक्षणे दिसून येतात. 

संबंधित बातमी : 

Conjunctivitis in Mumbai : मुंबईकरांनो सावधान ! मुंबईत डोळे येण्याची साथ पसरली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Ahilyanagar Crime: एक लग्न होऊनही नर्तिका दिपाली पाटीलच्या मागे लागला, पत्नी नगरपरिषदेत भाजपची उमेदवार, कोण आहे संदीप गायकवाड?
एक लग्न होऊनही नर्तिका दिपाली पाटीलच्या मागे लागला, पत्नी नगरपरिषदेत भाजपची उमेदवार, कोण आहे संदीप गायकवाड?
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
Embed widget