Nashik Politics : नाशिकच्या (Nashik) राजकारणात आणखी एक ट्विस्ट आला असून मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे चिरंजीव अविष्कार भुसे (Avishkar Bhuse) यांचा भावी खासदार असा उल्लेख केलेले पोस्टर नाशिकमध्ये दिसून आले आहेत. अविष्कार भुसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टर बाजी करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगली. मात्र दादा भुसे यांनी या विषयावर पडदा टाकला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील शिंदे गटाचे (Shinde Sena) राजकारण चांगलेच चर्चेत आहे. शिंदे गटाचे तीन शिलेदार असलेले आमदार सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये 'का रे दुरावा' पाहायला मिळत असताना आता भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरने या दुराव्यात आणखी भर टाकली आहे. मात्र दादा भुसे यांनी सर्व पोस्टर काढून टाकण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वाद होण्याआधीच भुसे यांनी विषय संपवला आहे. त्यामुळे एका दिवसात भावी खासदार म्हणून लावण्यात आलेले पोस्टर हटविण्यात आल्याचे समजते. 


नाशिकमध्ये शिंदे गटाच्या तीन नेत्यांमध्ये नाराजी, विसंवाद आणि कुरघोडीचे राजकारण सुरू असताना या बँनरबाजीने आणखी भर पडल्याचे दिसून आले. पालकमंत्री भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झळकणाऱ्या होर्डिंगची शहरासह जिल्ह्यात चर्चा आहे. जिल्हाभरामध्ये भावी खासदार अशा आशयाचे होर्डिंग लागलेले आहेत. कपाळी टिळा लावून अविष्कार असल्याने दिल्ली आगमनाची डरकाळी फोडली आहे आणि दिल्ली गाठणारच अशा आशयाचे हे होर्डिंग त्रिमूर्ती चौकात उभारण्यात आले आहेत.मात्र दादा भुसे यांनी यावर स्पष्टीकरण देतांना म्हणाले कि, एखादा फ्लेक्स चुकून कोणी लावला असेल तर ते मला मान्य नाही आणि निदर्शनास आल्यानंतर तो काढण्याची सूचना ताबडतोब केलेली आहे, त्यामुळे गैरसमज होण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले. 


फ्लेक्स चुकून लावला असेल, ते मान्य नाही... 
सध्या नाशिकमध्ये हेमंत गोडसे, दिंडोरी मधून भाजपाच्या भारती पवार, धुळ्यामध्ये सुभाष भामरे हे तिघेजण खासदार आहेत. हे तीनही खासदार सत्ताधारी पक्षाचे असल्याने दादा भुसे यांच्या चिरंजीवांना नेमकं कोणत्या मतदारसंघातुन लोकसभेची उमेदवारी मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे. नाशिक शहरात नाशिक हेमंत गोडसे यांची ही दुसऱ्या टर्म साठी देखील ते इच्छुक स्वरूपाची मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यामुळे अविष्कार दादासाहेब भुसे हे नेमके कुठून उमेदवारी करणार हा प्रश्न निमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र यावर खुद्द दादा भुसे यांनी स्पष्टीकरण देऊन विषय संपविला आहे.