Gulabrao Patil : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हीच राष्ट्रवादी आहे. त्यामुळं अजित पवार जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं. लग्न व्हायचं असेल तर तिथी ची गरज असते. तो तिथी लवकरच येणार असल्याचं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. ते जळगावमध्ये (Jalgaon) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गुण जुळवावे लागतील, नंतरच ते काम करावं लागेल
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार हे युतीत येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, अजित पवारांसोबत बरेच आमदार असून कोणतेही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते. मात्र त्यासाठी अजून कुळ बघावं लागेल. गुण जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावं लागेल असे सूचक वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे. गुलाबराव पाटल्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
अंजली दमानिया यांचा दावा
मंत्रालयात कामानिमित्त गेले होते, त्यावेळी तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत तेही लवकरच… बघू…आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची असं ट्वीट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं.त्यामुळं येत्या काही दिवसांत खरंच असे काही होणार आहे का? यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. मागील चार दिवसांपूर्वी देखील दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. किळसवाणी राजकारण..मी पुन्हा येईन असे या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या.
अजित पवार असं काही करणार नाहीत : नाना पटोले
अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं. यावर बोलताना पटोले म्हणाले की, अजित पवार असं काही करणार नाहीत हा आमचा आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. भाजपविरोधी जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. ही वैचारीक लढाई असल्याचे पटोले म्हणाले. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती अंगावर काटा आणणारी आहे. आज देश धोक्यात आला आहे. देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचे पटोले म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसने खूप कष्ट सहन केलं आहे. जनतेच्या कोर्टात भाजप नापास झाली असल्याचे नाना पटोले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: