Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध अपडेट्स, वाचा क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates: वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात...More
वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दि.०४ एप्रिल रोजी वाशी येथे जनता दरबाराचे आयोजन
ठाणे,दि.03(जिमाका):- वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या शुक्रवार, दि.०४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी आपली निवेदने लेखी स्वरूपात तीन प्रतीत सादर करायची आहेत. नागरिक आपले नाव नोंदणी करून आपल्या समस्या किंवा अडचणीचा निपटारा करू शकणार आहेत.
यापूर्वी झालेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. दि.०४ एप्रिल रोजी होणाऱ्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडून त्यांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
रायगड महाड ब्रेकिंग
महाड एमआयडीसीतील बंद कंपनीला भीषण आग,,,
सुदैवाने जीवित हानी टळली
घटनास्थळी पोलीस प्रशासन व अग्निशामक दल दाखल...
महाड MIDC मधील नरीमन पॉईंट लिमिटेड फ्लोट नंबर L ३६६७ या कंपनीला आग
आगीत कंपनीचे मोठे नुकसान
आगीच्या धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण
अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत
परभणी मानवत सह झरी,जलालपूर,मांडवा,साडेगाव आदी ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस
आज सायंकाळच्या सुमारास परभणी मानवत तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालाय परभणी तालुक्यातील झरी मांडवा जलालपूर साडेगाव या गावांसह आदी वादळी वाऱ्यासह जवळपास १ तास जोरदार पाऊस झालाय यामुळे आंब्यासह इतर फळपीक आणि काढून ठेवलेली ज्वारी, हरभरा, गव्हाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
आमदार अतुल भातखळकर यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामांची आमदार अतुल भातखळकर यांनी केली पाहणी
पालिकेच्या पी/उत्तर विभाग साईबाबा मंदिर, दिंडोशी पोलिस स्टेशन पासून ते डायाभाई पटेल मार्ग, राधा कुंज क्रॉस रोड, पोद्दार सर्कल, शिवाजी चौक पर्यंत केली पाहणी
तर आर/दक्षिण विभागातील दादा सावे मार्ग, छीताभाई पटेल मार्ग,मालाड आकुर्ली क्रॉस रोड, अनिता नगर पर्यंतच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी
वारंवार सूचना देऊनही रस्त्यांची कामं कालबद्द पद्धतीने होत नसल्याने आमदार भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब
पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची कामं तातडीने पूर्ण करण्याचे आमदार भातकर यांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश
पीक विम्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पीक विमा कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 2023 आणि 2024 या दोन वर्षाचा पीक विमा अद्याप ही शेतकऱ्यांना मिळाला नाहीये. जवळपास 900 कोटी रुपये पिका विमा थकीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. या बाबत अनेकवेळा निवेदन आणि आंदोलन करून ही पीक विमा कार्यालयाकडून उडवाउडवीचे उत्तर दिले जातं आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी पीक विमा कार्यालयातील व्यवस्थापकाच्या दालना समोर ठिय्या केला. जो पर्यंत पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय.
गारपीटी सह जोरदार पावसाची हजेरी...अवकाळी चा कहर... जोरदार वारा विजेचा गडगडाट तुफान पाऊस आणि गारपीट... भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा फील... अर्धा तास तुफान पाऊस
लातूर शहर आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग... गारपीटी ही झाली... वातावरणात वाढला गारवा
मागील तीन दिवसापासून लातूर जिल्ह्यात प्रचंड उपाडा जाणवत होता. तीन दिवसांपूर्वी लातूर शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सुद्धा वातावरणात उकाड वाढला होता. आज सकाळपासूनच वातावरण बदललं होतं.. थंड हवा सुरु होती.. काही वेळापूर्वी लातूरमध्ये जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली... ढगाचा गडगडात आणि सोसाट्याचा वारा सुरू असतानाच अवकाळी पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. या पावसातच गारपीटही सुरू होती.. थंड वारा आणि सुरू असलेला गारपिटीसह पाऊस यामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. काढणीला आलेली पिकांना या पावसाने फटका बसला आहे... लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पावसाने हजेरी लावल्याची माहिती आहे. या पावसामुळे या भागातील केशर आंब्याच्या बागांना मोठा फटका बसला आहे.
सोलापूर ब्रेकिंग-
सोलापुरात मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
सकाळपासून सोलापुरात आज ढगाळ वातावरण असल्याने उकाडा ही जाणवत होता
मात्र सोलापूर जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन पावसाची जोरदार सुरुवात झालीय
सोलापूर - अक्कलकोट महामार्गांवरील वळसंग, कर्जळा इत्यादी भागात पावसाची सुरूय जोरदार बॅटिंग
तर सोलापूर शहरात देखील विजाचा कडकडाट सुरु असून रिमझिम पावसाला सुरुवात झाली
खासदार सुनील तटकरे:
आम्ही वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला
मुस्लिम समाजामध्ये विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले गेले
राष्ट्रपतींच्या सहीनंतर विधेयकाची अंमलबजावणी होईल...
मुस्लिम समाजाला न्याय देणारे हे विधेयक आहे, समामाच्या प्रगतीसाठी हे विधेयक
भूमिका मांडली नाही=
आम्ही पाठिंबा दिला, समर्थन केलं, बोलल्याने समर्थन आहे हे सिद्ध
इतर पक्षांची भूमिका, कोंडी कुणाची झाली याबाबत मी बोलणार नाही....
विधेयक धार्मिक नाही, वक्फ बाबत वास्तविकता समोर येण्यासाठी हे विधेयक
पुण्यातील पदाधिकारी बलात्कार प्रकरण = माहिती घेऊन याबाबत बोलेन
शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास जगासमोर आहे...
खासदार सुनील तटकरे:
आम्ही वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला
मुस्लिम समाजामध्ये विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले गेले
राष्ट्रपतींच्या सहीनंतर विधेयकाची अंमलबजावणी होईल...
मुस्लिम समाजाला न्याय देणारे हे विधेयक आहे, समामाच्या प्रगतीसाठी हे विधेयक
भूमिका मांडली नाही=
आम्ही पाठिंबा दिला, समर्थन केलं, बोलल्याने समर्थन आहे हे सिद्ध
इतर पक्षांची भूमिका, कोंडी कुणाची झाली याबाबत मी बोलणार नाही....
विधेयक धार्मिक नाही, वक्फ बाबत वास्तविकता समोर येण्यासाठी हे विधेयक
पुण्यातील पदाधिकारी बलात्कार प्रकरण = माहिती घेऊन याबाबत बोलेन
शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास जगासमोर आहे...
अँकर:-
आडगाव, निफाड आणि संभाजीनगर या रस्त्यांसाठी केलेल्या बांधकामाच्या नुकसान भरपाई पोटी मिळणार्या मोबदला रकमेपैकी १२ कोटी ६१ लाख ६८ हजार रुपये बनावट दस्ताऐवजाव्दारे लंपास करणार्या मुख्य आरोपीस नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने राजस्थानमध्ये अटक केली आहे. शकुर अहमद जमालुद्दीन सैय्यद असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून इमोर्टल इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करुन पंकज ठाकूर यांच्या कंपनीची आर्थिक फसवणुक करण्यात आली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात २१ जानेवारी २०२५ मध्ये फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यानुसार नाशिक गुंडा विरोधी पथकाने दोन दिवस सापळा रचून आरोपी शकुर अहमद जमालुद्दीन सैय्यद यास फत्तेपूर रोड, अली नगर, सिकर परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर पथकाने पुढील कारवाईसाठी त्यास नाशिकमध्ये आणून नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
भंडाऱ्याच्या साकोलीत घडली घटना
Anchor : वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात जनावरं बांधायच्या गोठ्यावरून गेलेल्या विजांच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला. यात शॉर्टसर्किट झाल्यानं त्याची ठिणगी भास्कर लांजेवार यांच्या गोठ्यावर पडली आणि गोठ्याला आग लागल्यानं तिथं बांधलेली १० म्हशी होरपळल्यात. या घटनेत ३ म्हशी गंभीर जखमी झाल्यात. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली शहरातील सिव्हील वॉर्डात घडली. प्रशासनाने याचं सर्वेक्षण करून पशुपालकाला तातडीनं आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे
हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले यावर शिक्कामोर्तब झाले आहे
वक्फ बोर्डाला केलेला विरोध, बाळासाहेबांचे विचार अजूनही आहेत त्यांची मान खाली गेलीय
उबाठासाठी कालचा दिवस दुर्दैवी
वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाला विरोध नाही आणि दुसरीकडे भाजपच्या ढोंगीपण्ला विरोध बोलतात
मात्र, त्यांचा गोंधळलेली परिस्थिती पाहायला मिळाली
शिवसेनेची आजची भूमिका आणि भाजपची भूमिका तीच आहे
देशभक्त मुस्लीम यांना पाठिंबा देशविरोधांना विरोध
हीच भूमिका आम्ही दाखवली
राहुल गांधीची सावली मिळाल्याने उबाठाला वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे
आता पायाखालची वाळू सरकलीआहे
आजची पत्रकार परिषद स्वतः ची अब्रू काढून घेणायासारखं आहे
कांग्रेसच्या १२३ जागा डिनोटिफायन केल्या गेल्या आणि घशात घातल्या गेल्या
अशा मुठभर लोकांना चाप बसेल
आता महिलांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल
मुस्लीम लोकांनी देखील स्वागत केलंय
लांगूलचालन आहे असं म्हणाले, नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे
गौंधळलेल्या परिस्थिती नेतृत्व गेलं की पक्ष इतिहासात जात असतो
हे घर का ना घाट का अशी परिस्थिती झाली आहे
ओवेसी जे बोलले तेच उद्धव ठाकरे बोलले
उद्धव ठाकरे कन्फ्युज आहेत
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणारे
अपमान केला तरी मांडीला मांडी लावून बसत आहेत
विरोधात कांग्रेस बोलेल तेव्हा उबाठा बोलणार नाही
अबु आझमी आणि ओवेसी यांची भाषा ते बोलायला लागले आहेत
याची उत्तर जनता घेतल्याशिवाय राहणार नाही
31 मार्च पर्यंत पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल अस आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं होत. मात्र कंपनी म्हणते सरकारने त्यांच्या हिश्याचे पैसे भरले नाहीत. त्यामुळे पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देऊ शकत नाही. खरीप, रब्बीचा हंगाम संपला तरी शेतकर्यांना पिक विम्याची रक्कम मिळत नाही ही दुर्देवी बाब आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये जर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत तर मुंबईतील कार्पोरेट कंपन्याच्या कार्यालयामध्ये घुसून पैसा वसूल केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे..
ACB छापेमारी मध्ये अटक केलेल्या ससून मधील अधिकाऱ्यांच्या घरावर ACB कडून छापेमारी
ACB च्या छापे मारीत दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरात मोठं घबाड
छापेमरित जयंत चौधरी याच्या घरून 39 लाख रुपयांची मालमत्ता जप्त
तर सुरेश बनवले याच्या घरून ACB ने जप्त केली १ कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त
सुरेश बनवले आणि जयंत चौधरी यांना १ लाख रुपयांची लाच घेताना काल ACB ने केलं अटक
दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरावर आज सकाळी करण्यात आली होती छापेमारी
दोन्ही आरोपींना करण्यात येणार कोर्टात हजर..
दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी रात्री या दोघांच्याही घराची झडती घेण्यात आली.. या झडतीतून सुरेश बोनवळे यांच्या घरातून तब्बल
एक कोटी 35 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.. यामध्ये रोख रक्कम, दागिने, गाड्या आणि मालमत्ताचा समावेश आहे.. तर दुसरा लाचखोर अधिकारी जयंत चौधरी याच्या घरातून ३९ लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे..
काही महिन्यांपूर्वी याच ससून रुग्णालयातून कुख्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील पळून गेला होता.. तेव्हा पुणे पोलिस आणि ससून रुग्णालय प्रशासनावर आरोप झाले होते..याशिवाय पुण्यातील गाजलेल्या पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने याच ससून रुग्णालयात बदलण्यात आले होते. यानंतर आता इथल्या अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याप्रकरणी पुन्हा एकदा बी. जे. मेडिकल कॉलेज चर्चेत आलं आहे...
जालना -
अंजली दमानिया यांची मनोज जारंगे पाटील यांच्याशी भेट; धनंजय देशमुख देखील उपस्थित.
अँकर:
मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भेट घेतलीय, दमानिया हे आज जालना दौऱ्यावर असून त्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन म्हणून जरांगे यांची भेट घेतली तर पूर्वी या ठिकाणी, मॅच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित होते, या भेटीत मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर चर्चा झाल्याची माहितीये.
यावेळी , अंजली दमानिया यांनी मनोज जारंगे पाटील यांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केल्याचे समजते.
वाशिम शहरात कर्कश्य आवाज करणाऱ्या १७ बुलेट गाड्यांवर कारवाईचा बडगा... शहर वाहतूक पोलिसांची कारवाई
वाशिममध्ये कर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात वाढला होता. यावर आता वाशिम शहर वाहतुकच्या पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केलंय. आज वाशिम शहरात विशेष मोहीम राबवत कर्कश आवाज करणाऱ्या १७ गाड्यांवर कारवाईचा बडगा उगारत यागाड्यांचे सायलेन्सर काढण्यात आले आहेत. यानंतर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती शहर वाहतूकचे प्रमुख जाधव यांनी ही माहिती दिली.
बीड ब्रेकिंग...
शिकारीचे साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्याला वन विभागाने घेतले ताब्यात
शिरूर न्यायालयात केला अर्ज
वन विभागाकडून सतीश भोसलेची होणार चौकशी
वनविभागाच्या जागेत सतीश भोसलेने उभारले होते अनधिकृत बांधकाम
सतीश भोसलेला वनविभाग शिरूरच्या न्यायालयात करणार हजर
सोलापूर ब्रेकिंग :
- सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती
- सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती
- राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे
- पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रेक्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले.
- साधारणपणे 11 वाजून 22 मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती
दरम्यान या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही
———-
संजय कुमार एमईआरसीचे सध्या अध्यक्ष
आनंद लिमये आणि सुरेंद्र बियाणी सदस्य आहेत
संजय कुमार हे महाविकास आघाडीच्या काळात मुख्य सचिव ह्या पदावर होते
मुख्य सचिव पदावरुन निवृत्त झाल्यानंतर संजय कुमार यांची ८ मार्च २०२१ रोजी एमईआरसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
सर्वसामान्यांना आणि छोट्या ग्राहकांना सर्वप्रथम दिलासा देण्यासाठी वीज दर कपात करण्यासाठी याचिका आयोगाकडे केल्याचं महावितरणचं म्हणणं
महावितरणकडून टप्प्याटप्प्याने वीज दर कपात पुढील ५ वर्षात सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा
मात्र, आयोगाकडून निर्णय देत महावितरण नफ्यात असल्याचं दाखवत उद्योजकांना देखील खुश करण्याचा प्रयत्न करत निर्णय
ज्यात, पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळावी यासाठी वीज दर कपात
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी 3 TMC पाणी सोडण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र व्यवहार..
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात बामणोली, तापोळा परिसर हा जल पर्यटनावर अवलंबून असून सध्या या भागात कोयना बॅक वॉटर मधील शिवसागर जलाशयाची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. मागील महिनाभरात कोयना धरणातून 17 टीएमसी पाण्याचा विसर्ग वीज निर्मिती आणि शेतीसाठी पायथागृहातून करण्यात आला आहे. यामध्येच 3 टीएमसी पाण्याचा विसर्ग कर्नाटकला करण्यात यावा अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आले आहे.महाराष्ट्र मध्ये दुष्काळाची चाहूल लागत आहे यातच महाराष्ट्रातील मुख्य धरण म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणाची पाणी पातळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच खालावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकला पाणी सोडू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सध्या या धरणात 54.93 टीएमसी इतका पाणीसाठा असून मागणीनुसार पुढील महिनाभरात पाण्यामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
सध्या राज्यात ज्या पद्धतीने महिलांकडून क्रूर हत्तीचे प्रकार समोर येऊ लागले आहेत ते पाहता पुरुषांना न्याय व अधिकार देण्यासाठी पुरुष हक्क आयोगाची ही स्थापना करण्याची गरज वाटू लागल्याचे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सांगितले. पुरुष आणि महिला दोघांनाही समान न्याय असला तरी पूर्वी महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी महिला आयोगाची स्थापना झाली होती. मात्र अलीकडे महिला ज्या पद्धतीने वागत आहेत ते पाहता पुरुषांकडून होत असलेल्या पुरुष हक्क आयोगाचीही निर्मिती करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. नुसत्या समुपदेशनाने भागणार नसून महिलांनाही आपण काय वागतो याची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले. पुरुष हक्क आयोग स्थापन झाल्यास पुरुषांनाही न्याय व अधिकार मिळतील असा दावा त्यांनी केला आहे. महिलांच्या प्रश्नावर वाघिणीसारख्या लढणाऱ्या तृप्ती देसाई या अलीकडच्या काळात महिलांकडून होत असलेल्या हत्येमुळे हातबल झाल्याचे दिसत असून आता त्या पुरुषांच्या हक्कासाठी सरसावल्या आहेत.
सध्या राज्यातील महिला अनेक कर्तुत्वाची कामे करीत असल्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिलाच विराजमान व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या राज्यात भाजपचे पाच वर्ष सरकार राहणार असून जर मुख्यमंत्री बदलाची वेळ आल्यास भाजपने महिलांना संधी द्यावी असे त्यांनी सांगितले. याबाबत पंकजा मुंडे या आक्रमक चेहरा असून त्यांना मुख्यमंत्री केल्यास आमची काहीच हरकत असणार नसल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.
सध्या राज्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून वाढलेली गुन्हेगारी संतोष देशमुख यांच्यासारखी प्रकरणे पाहता महाराष्ट्र गुन्हेगारीमुक्त करावे आणि यासाठी राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी असे साकडे विठ्ठलाला घातल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले
सध्या राज्यात ज्या पद्धतीने महिलांकडून क्रूर हत्तीचे प्रकार समोर येऊ लागले आहेत ते पाहता पुरुषांना न्याय व अधिकार देण्यासाठी पुरुष हक्क आयोगाची ही स्थापना करण्याची गरज वाटू लागल्याचे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सांगितले. पुरुष आणि महिला दोघांनाही समान न्याय असला तरी पूर्वी महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी महिला आयोगाची स्थापना झाली होती. मात्र अलीकडे महिला ज्या पद्धतीने वागत आहेत ते पाहता पुरुषांकडून होत असलेल्या पुरुष हक्क आयोगाचीही निर्मिती करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. नुसत्या समुपदेशनाने भागणार नसून महिलांनाही आपण काय वागतो याची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले. पुरुष हक्क आयोग स्थापन झाल्यास पुरुषांनाही न्याय व अधिकार मिळतील असा दावा त्यांनी केला आहे. महिलांच्या प्रश्नावर वाघिणीसारख्या लढणाऱ्या तृप्ती देसाई या अलीकडच्या काळात महिलांकडून होत असलेल्या हत्येमुळे हातबल झाल्याचे दिसत असून आता त्या पुरुषांच्या हक्कासाठी सरसावल्या आहेत.
सध्या राज्यातील महिला अनेक कर्तुत्वाची कामे करीत असल्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिलाच विराजमान व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या राज्यात भाजपचे पाच वर्ष सरकार राहणार असून जर मुख्यमंत्री बदलाची वेळ आल्यास भाजपने महिलांना संधी द्यावी असे त्यांनी सांगितले. याबाबत पंकजा मुंडे या आक्रमक चेहरा असून त्यांना मुख्यमंत्री केल्यास आमची काहीच हरकत असणार नसल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.
सध्या राज्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून वाढलेली गुन्हेगारी संतोष देशमुख यांच्यासारखी प्रकरणे पाहता महाराष्ट्र गुन्हेगारीमुक्त करावे आणि यासाठी राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी असे साकडे विठ्ठलाला घातल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले
नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये दुपारी अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला..
मागील तीन दिवसांपासून नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.. काल पहाटे आणि रात्री नागपुरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता..
आज सकाळपासून शहरांतील अनेक भागांमध्ये मध्ये मध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या... दुपारी मात्र काळे ढग दाटून आले आणि अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे...
मात्र अवेळी आलेल्या या पावसामुळे आपापल्या कामांवर छत्री आणि रेनकोट शिवाय निघालेल्या नागपूरकरांना अनेक त्रासांना सामोरे जावं लागलं...
शिवाय काही प्रमाणात शेतात असलेल्या उन्हाळी पिक आणि भाजीपाल्याचा नुकसान ही या पावसामुळे होण्याची शक्यता आहे...
नांदेड : आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांनी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबवल, यात 65 जीवघेणी शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तसेच दोनशे गुन्हेगारांची घरझडती घेत त्यांची चौकशी करण्यात आलीय. नांदेड शहराच्या हद्दीत असलेल्या सहाही पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आलीय. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलीय.
धुळे : शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका यासह फळबागांचे देखील नुकसान झाले असून साक्री तालुक्यात याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्यास सुरुवात केली असून साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई येण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग विमानतळावरून अखेर दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा विमान प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. फ्लाय 91 या कंपनीची सिंधुदुर्ग पुणे ही विमान सेवा सुरू झाली आहे. या विमानात १० प्रवाशांनी पुणे ते सिंधुदुर्ग प्रवास केला. तर सिंधुदुर्ग ते पुणे असा ६ प्रवासी घेऊन विमान पुणे येथे निघाले. आठवड्यातून पाच दिवस शुक्रवार आणि सोमवार वगळता ही विमान सेवा सुरू राहणार आहे. विमान सेवा बंद असल्याने सत्ताधारी आणि ठाकरे सेना यांच्यात राजकारण रंगले होते. आरोप प्रत्यारोप झाले होते.
राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यानंतर सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक
बँकेतील व्यवहार पूर्णपणे मराठीमध्ये करण्याची मनसेची भूमिका
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिल्यानंतर आज सोलापुरातील बँकामध्ये मनसेचे आंदोलन
व्यवस्थापकना भेटून मनसे कार्यकर्त्यांनी निवेदन देत व्यवहार मराठीत करण्याची केली मागणी
जर यापूढे मराठी भाषेला दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न झाल्यास खळखट्याक करणार
सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्यांची भूमिका
ठाण्यात मनसेची बँकांवर धडक सुरूच
एसबीआय बँकेनंतर ठाण्यात मनसे पोहोचली कर्नाटक बँकेत..
दोन दिवसांपूर्वीच ठाण्यातील एसबीआय बँकेला मराठीमध्ये कारभार हाताळावा याकरिता दिले होते निवेदन..
त्यानंतर आता मनसैनिक ठाण्यातील वर्तकनगर येथे कर्नाटका बँकेच्या शाखेत पोहोचले आहेत..
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बीडमधील कंनकालेश्वर मंदिराची बारा एकर जमीन व बोर्डाच्या ताब्यात असल्याचं सांगितलं आणि पुन्हा एकदा जमिनीचा हे प्रकरण चर्चेत आलं. बीड मधील सर्वे नंबर 91, 92 आणि 1 हे मंदिरच्या जमिनीचे सर्वे नंबर असल्याची माहिती समोर आलीय. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या अनेक जागा आहेत मात्र या जागा त्यांच्या मालकीच्या आहेत की अतिक्रमित आहेत याची ठोस माहिती उपलब्ध होत नाही.
लाखांदूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालून एका इसमासह काही शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅंग्युलाइज करून जेरबंद करण्यात आलं. लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथील एका शेतकऱ्याचा दोन दिवसापूर्वी या वाघानं बळी घेतला होता. तर, काही शेतकऱ्यांची जनावर फस्त केली होती. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नाना पटोले यांच्यासह परिसरातील नागरिकांनी लावून धरली होती. मागील दोन दिवसांपासून नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि भंडारा वन विभागाच्या पीआरटी पथकानं या वाघाला जेरबंद करण्याकरिता परिसर पालथा घातला होता. मध्यरात्रीच्या सुमारास खैरीपट परिसरातच या वाघाला ट्रँग्यूलाइज करून ताब्यात घेतलं असून त्याला आता नागपूरच्या गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालयात सोडण्यात आलं आहे.
वाशिम : जिल्ह्यातील मंगरुळपीर पंचायत समितीच्या नव्याने बांधलेल्या इमारतीला अवघ्या काही महिन्यांतच तडे गेल्याने बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दर्जाहीन कामामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.भविष्यात मोठी दुर्घटना होण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करून दोषी अभीयंत्यावर कारवाईची मागणी होतेय.
अकोला : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. अकोल्यातल्या तेल्हारा आणि अकोट तालुक्यातल्या अवकाळी पावसाने झोडपले. अकोट तालुक्यातल्या एदलापूर शेत शिवारात सफरचंद शेतीला मोठा फटका बसला आहे. नवनीत चांडक यांच्या सफरचंद शेतीला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. अक्षरशः झाडाला लागलेले सफरचंद वाऱ्यामुळे गळून पडले. या आधीही अकोल्यातल्या मुर्तीजापुर बार्शीटाकळी आणि बाळापूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्या पाठोपाठ आता तेल्हारा आणि अकोट तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पुन्हा बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय. दरम्यान, तेल्हारा तालुक्यातल्या हिंगणी, दानापूर, तळेगाव बाजारसह आदी गावांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. शेतात तोडणी करून कापणीसाठी ठेवलेल्या कांदा पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे..
जळगावच्या अमळनेर तालुक्यात सात्री गावात भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून आगीत पाच घरे पूर्णपणे खाक झाली आहे
सात्री येथे गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली काही वेळातच आग पसरली..त्यात अचानक घरांनी पेट घेतला
यात एका घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले
या भीषण आगीत पाच घरे पूर्णपणे खाक झाल्याची माहिती..
आज नियंत्रणात आणण्यासाठी पारोळा ,चोपडा ,धरणगाव येथून देखील अग्निशमन बंब मागवण्यात आले आहेत
*ग्रामस्थ आपल्या परीने आग विझवण्यासाठी मिळेल त्या साधनानी आटोकाट प्रयत्न केला मात्र यश आले नाही
नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलं
- नागपूरातील कळमना APMC मार्केटमध्ये हजारो पोते धान्य भिजलं
- दोन दिवसांपासून पावसाचा अंदाज असताना उघडाव्यावर हजारो पोती धान्य का ठेवले?
- शेतकऱ्यांसोबतंच व्यापाऱ्यांच्या हजारो पोती धान्याची नासाडी
अमेरिकेला पुन्हा एकदा शक्तिशाली राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा बुधवारी (2 मार्च) रात्री उशिरा केली. त्यानुसार भारतावर 26 टक्के आयात शुल्क (Trump announces 26% tariffs on India) लादण्यात येणार आहे. अमेरिकेचा प्रमुख प्रतिस्पर्धी देश असलेल्या चीनवर 34 टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. अमेरिकेच्या या दणक्याचा फटका जगभरातील देशांना बसू शकतो.
बेकायदेशीर रित्या भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशीना जालन्यातील भोकरदन फौजदारी न्यायालयाने एका वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलीय, शिक्षा पूर्ण झाल्या नंतर आरोपींना त्यांना मायदेशी पाठवले जाणार आहे.
सकाळपासून ढगाळ वातावरण असतानाचं मेघगर्जनेसह भंडाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं जिल्ह्यात विजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. हा पाऊस उन्हाळी भात पिकासह बागायती शेतकऱ्यांनाही लाभदायक ठरणारा आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची काही अंशी उकाड्यापासून सुटका झाली आहे.
गुन्हा दाखल करण्याची भिती घालून एका ट्रेडिंग व्यावसायिकाकडून २ लाखाची लाच घेताना पलूस येथील पोलीस उपनिरिक्षकास रंगेहात पकडण्यात आले. सांगली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलीय. महेश बाळासाहेब गायकवाड असे संशयित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचा फोरेक्स ट्रेडिंगचा देखील व्यवसाय आहे. दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्यावर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरिक्षक महेश गायकवाड याने तक्रारदार यांना दि. ४ जानेवारी २०२५ रोजी पलूस येथून ताब्यात घेतले होते. त्याला अटकेची भिती दाखवून त्यांच्याकडे १० लाखाची मागणी केली. तसेच त्याच दिवशी तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेतले. यावेळी गायकवाड याने अटकपूर्व जामीन करुन घ्या असे सांगून तक्रारदारांना सोडून दिले. उच्च न्यायालयातून तक्रारदार यांना जामिन मंजूर झाला. त्यानंतर तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून उर्वरित ८ लाखाची मागणी करण्यात आली. दि. २५ मार्च रोजी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलवून शिल्लक राहिलेल्या पैशाची व्यवस्था कर अन्यथा तुझी चारचाकी जप्त करेन तसेच ट्रेडिंग अनुषंगाने सुरु असलेल्या चौकशीत तुझ्यावर आणखी एक गुन्हा दाखल करेन अशी भिती तक्रारदार यांना घातली. दि. २ एप्रिल रोजी पलूस पोलीस ठाणे परिसरात लाचलुचपत प्रतिबंक विभागाने सापळा लावला. यावेळी तक्रारीची पडताळणी केली असता गायकवाड याने तडजोडीअंती २ लाखाची तक्रारदार यांच्याकडे मागणी करुन २ लाख रुपये स्विकारताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उमेश पाटील, हवालदार रामहरी वाघमोडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई
मुंबईतून ७ पिस्तुल आणि २१ जिवंत काडतूसासह ५ जणांना पोलिसांनी केली अटक
आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय
विकाश ठाकूर उर्फ विक्की, सुमितकुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेककुमार गुप्ता अशी या अटक आरोपींची नावे आहेत
सुमितकुमार विरोधात अनेक गोळीबार आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद तर विकाश ठाकूर विरोधात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती
आरोपी हरियाणा, बिहार आणि राजस्थान मधील आल्याची पोलिस सूत्रांची माहिती
अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजली जाणारी कोयना धरणाची पाणी पातळी खालावली आहे.कोयना जलाशया हा 105 टी एम सी पाणीसाठ्याचे धरण असून यामध्ये सध्या 50 ते 55 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.जवळपास 80 ते 90 किलोमीटर परिसरात या कोयना जलाशयाचा विस्तार झाला आहे.
आज पुणे शहरातला पाणीपुरवठा बंद
अनेक भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी केला जाणार पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद
उद्या म्हणजेच शुक्रवारी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता
पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालीलप्रमाणे
पर्वती जलकेंद्र
वडगाव जलकेंद्र
भामा आसखेड जलकेंद्र
गांधी भवन टाकी परिसर
पॅन कार्ड क्लब टाकी परिसर
एनडीटी पाणीपुरवठा केंद्र
चतुर्श्रुंगी
लष्कर
वारजे
पाषाण
या सर्व परिसरातील पाणीपुरवठा असणार पूर्णतः बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. रात्री सह्याद्रीच्या पट्ट्यात वैभववाडी खोऱ्यात जोरदार पावसाने बॅटिंग केली. तर आज पहाटेपासून कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या लखलखाट आणि कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी आणि खांडवी परिसरातील शेतकऱ्यांनी नियोजित एमआयडीसीला विरोध केला आहे... शेतजमीन बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली...कर्जत- जामखेड विधानसभा क्षेत्रात होऊ घातलेल्या एमआयडीसीवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आ. रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती भाजप आमदार राम शिंदे यांच्यात चांगलाच राजकिय वाद रंगला होता...दोघांनीही वेगवेगळ्या ठिकाणी एमआयडीसी व्हावी यासाठी आग्रह धरलाय त्यात काही आता कोंभळी येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवल्याने नव्या वादात तोंड फुटलंय.
लिबाग मधील पांढरा कांदा पाठोपाठ आता इथल्या तोंडलीला देखील मोठी मागणी वाढली आहे.अलीबागच्या तोंडलीला मोठ्या प्रमाणात वाढती मागणी बाजारात मिळत असल्याने इथला शेतकरी देखील आता या तोंडलीच्या तोडणीला लागला आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळा येथे जवळजवळ 10 एकर जागेत या तोंडलीची शेती करण्यात आलीं आहे. जानेवारी ते जून असा हा तोंडलीचा शेती व्यवसाय सुरू राहतो . छोटे मोठे भाजीविक्रेते देखील ही तोंडली होलसेल भावाने घेऊन इतर बाजारपेठांमध्ये विक्रीला घेऊन जातात.शिवाय जास्त तोंडलीची निर्यात ही नवी मुंबईच्या वाशी मार्केट केली जाते. त्यामुळे इथल्या शेतकऱ्याचा जास्त माल विक्री होतो.आता मोठ्या प्रमाणात तोंडली ची तोडणी सुरू असून मोठ्या प्रमाणात खंडाळा येथे हे पिक घेतलं जातं.
अहिल्यानगर शहरासह परिसरात काल मध्यरात्री रिमझिम पावसाने हजेरी लावली...या अवकाळी पावसामुळे गहू , कांदा यासह इतर पिकांची नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे...गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभर ढगाळ वातावरण आणि उष्णतेमध्ये वाढ झाली होती...हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज देखील जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध अपडेट्स, वाचा क्लिकवर...