Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर..
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News Latest LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
WashimUposhan News : रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीसाठी आमरण उपोषण
Washim Hunger Strike : वाशिमच्या मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याच्या मागणी करीता काल पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले.
१) मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची भ्रष्टाचार, निमयबाह्य कामे आणि अनियमितता करणाऱ्या सहाय्यक कार्यक्रम फौजदारी गुन्ही दाखल करणे.
२) मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामपंचायतीने सन २०२०-२०२१ मध्ये दिलेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहीरीचे प्रस्ताव मंजुरी न देता पंचायत समितीमध्ये प्रलंबीत ठेवणाऱ्या APO आणि प्रभारी गटविकास अधिकारी यांनी २०२३ पर्यंत २०२०-२०२१ च्या प्रस्तावित सिंचन विहीरीना आर्थिक देवान-घेवान करुन दिलेल्या निम्यबाह्य मंजुरीची चौकशी करुन दोषीवर कारवाई करणे
३) सन २०२३-२०२४ मध्ये शेतकऱ्यांच्या मंगरुळपीर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत कडून प्राप्त झालेल्या सिंचन विहीरीच्या प्रस्तावना त्वरीत मंजुरी द्यावी.
या मागण्या घेऊन उपोषण सुरु करण्यात आले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
























