Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील इतर महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates: मायनॉरिटी डेमॉक्रॅटिक पार्टीच्या फहीम खानच्या चिथावणीमुळे हिंसा भडकल्याचा आरोप करण्यात आला आहे. फहीम खानचा एक व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत आहे. अटकेतील आरोपींमध्ये फहीमचाही समावेश असल्याची...More
औसा शहरात बसला ट्रकची धडक... भाजी विक्रेत्याचा मृत्यू... घटना सीसीटीव्ही... ट्रक चालक फरार... लातूर जिल्ह्यातील घटना.. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित..
लातूर जिल्ह्यातील औसा शहरात धक्कादायक घटना घडली आहे... हाश्मी चौकात बसला ट्रकने जोरदार धडक दिली.. बस औसा बस स्थानका कडे वळत असताना हा अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने वळणाऱ्या बसला धडक दिली.. बस पलटी होऊ शकत होती मात्र वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बस वाचली... मात्र सिग्नल वर भाजी विक्रेता होता तो या अपघातात अडकला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. भर चौकातच झालेल्या या अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मोठ्या संख्येने लोक जमत असल्याचे पाहून ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळून गेला.. घटनेची माहिती मिळताच औसा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास पोलीस करत आहेत.
सदरील घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. मागील काही दिवसात लातूर जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या प्रमाणात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
फ्लॅश:-अंधेरी एमआयडीसी न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीचा आगी मध्ये अग्निशामन दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत...
इमारतीच्या भिंत अग्निशमन दलाचे जवानांवर कोसळल्यामुळे हे तीन जवान जखमी झाले.
तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात आली आहे.
सध्या फायर कूलिंगचे सुरू आहे.
आग कशामुळे लागली या संदर्भात अग्निशमन दलाचे जवान आणि एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहे.
अबू आझमी ऑन चवदार तळे सत्याग्रह दीन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच नाव कोणीच मिटवू शकत नाही
त्यांनी दलीत समाजासाठी काम केलं...या तळ्यातील पाणी त्यांना कोणी देत नव्हते ते काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी करून दाखवलं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान यामुळेच मला इथे राहण्याची मुभा आहे
आपल्या राज्यात जे सरकार बसले आहे ते वेगवेगळ्या स्वरूपातील आहे .
आपल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात बोलणाऱ्या बाबत कोणतीच कारवाई होत नाही .. परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता काही बोलला तर लगेच कारवाई सुरू होते .....
मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जयजयकार करत आलोय
कोणत्याही महापुरुषाबद्दल जो कोणी वाईट वक्तव्य करेल त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे
आपल्या समाजात माणसे बघून जाती बघून फैसला न देता माणूस म्हणून त्याला न्याय देणे गरजेचे आहे .
आपल्या राज्यात लोकांना भटकविण्यासाठी असे प्रकरण समोर आणले जात आहेत
ऑन दिशा सालियान प्रकरण
या प्रकरणात कोणीही दोषी असेल त्याला शिक्षा मिळावी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधान प्रमाणे आरोपीला शिक्षा दिली पाहिजे
सत्तेत असलेला मंत्री किंवा कॉमन मॅन असेल तरी या प्रकरणात कोणाचीही हयगय करता कामा नये.
BYTE - अबू आझमी समाजवादी पार्टी अध्यक्ष
शिर्डी
साईबाबांना 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा सुवर्ण हार अर्पण...
पुणे येथील साईभक्त राजेंद्र मुरलीधर गरूडकर आणि गरुडकर परिवाराकडून साईचरणी सुवर्ण हाराचे दान....
साई मूर्तीला परिधान करण्यात आला आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हार...
पुणे येथील साई भक्ताकडून 55 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या हाराची साईबाबांना देणगी...
साई संस्थानकडून दानशूर साईभक्तांचा सत्कार..
अपडेट
छत्तीसगडच्या चकमकीत 30 नक्षलवादी ठार
आतापर्यंत 30 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले
विजापूर- दंतेवाडाच्या चकमकीत 26 तर कांकेर - नारायणपूरच्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार
आताही सर्चिंग ऑपरेशन सुरू असून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य सापडले आहे
फ्लॅश:- अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीमध्ये दुपारी दोनच्या सुमारास आग लागली...
घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाचा 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल होत तब्बल दोन ते अडीच तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.
G+2 असा स्ट्रक्चर असलेली ही इमारत आहे.
इमारतीच्या टेरेसवर आग लागली होती, यानंतर दुसरा मजला,पहिला मजला आणि ग्राउंड लेव्हलपर्यंत ही आग पोहोचली आहे...
रबर आणि प्लास्टिकचा गोदाम असल्यामुळे ही आग मोठी झाली.
इमारतीच्या भिंत कोसळल्यामुळे अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले.
सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर अग्निशमन दलाचा जवानांकडून सुरू आहे...
रामदास आठवले ऑन औरंगजेब कबर प्रकरण
औरंगजेब हा अत्यंत क्रूर आणि खतरनाक माणूस होता
औरंगजेबाने आपल्या देशात येऊन अनेक लढाया जिंकल्या मात्र त्या आपल्यातीलच काही फितूर यांच्यामुळेच जिंकल्याचा रामदास आठवले यांच वक्तव्य
परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी त्यांचा ताकदीने विरोध केला...
म्हणूनच औरंगजेब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची त्याने हत्या केली.
औरंगजेब हा आपल्या देशाचा विरोधक..म्हणून कोणत्याही मुस्लिम नागरिकाने औरंगजेब याच्याशी नाते जोडण्याचा प्रयत्न करू नये...
औरंगजेब हा आपल्या देशाचा विरोधक आणि आपल्या देशावर आक्रमण करण्यासाठी आला होता
मात्र अशा औरंगजेबाला आणि मोघलांना गाढण्याच काम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलं
हा इतिहास 400 वर्षापूर्वीचा आहे ...म्हणून औरंगजेब याला आता गाडलेलं आहे.आणि म्हणून हे अस्तित्व असायला काही हरकत नाही
छत्रपती संभाजी महाराज यांचं मोठ स्मारक संमेश्वर मध्ये उभारण्याचा सरकार विचाराधीन आहे
औरंगजेब वरून सुरू असलेला वाद आता मिटविणे गरजेचे आहे
ऑन नागपूर हिंसाचार प्रकरण
नागपूर मध्ये जो प्रकार सुरू आहे तो अत्यंत चुकीचा आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत चौकशी करत आहेत
या हिंसाचारात जे कठोर दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळणे गरजेचे आहे
सुरू असलेला हिंसाचार आणि आंदोलनं आता थांबवणे गरजेचे आहे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे वारसदार आहोत त्यामुळे तुमच्या विचाराला कुठे डाग लागणार नाही अस वागणे गरजेचे आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत अनेक मावळे मुस्लिम सुद्धा होते
त्यामुळे आपण मुसलमानां विरोधात लढणं हे बरोबर नाही
मुस्लिमांनी सुद्धा औरंगजेबाशी आपले संबंध जुळवू नये
आपला महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जाता आले पाहिजे.
औरंगजेबाची कबर हटवा ही मागणी आता मागे घ्यावी..आणि मुस्लिमांनी सुद्धा हे आंदोलन आपल्या विरोधात आहे अस मानू नये
राज्यात सुरू असलेल आंदोलन हे औरंगजेबाच्या विरोधात आहे.
महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकसंघ पनाने पुढे जाणे आवश्यक आहे.
Byte - रामदास आठवले केंद्रीय मंत्री
धाराशिव: ब्रेकींग
धाराशिव च्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे हिंदु संघटनाकडुन रास्ता रोको आंदोलन
उमरगा - लातुर महामार्गावर नारंगवाडी पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन
औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे वाद पेटल्याची माहिती - हिंदु संघटना आक्रमक
आरोपीला तात्काळ अटक करण्याची हिंदु संघटनांची मागणी - आंदोलकांनी रस्तावर टायर जावुन केला निषेध
आंदोलनस्थळी उमरगा पोलिस घटनास्थळी दाखल-गोंधळाची परिस्थिती
भरत गोगावले पहिले मंत्री पदासाठी आग्रही होते आता पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत
Anchor - केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्री रामदास आठवले हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. माणगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला त्यांनी चवदार तळ्यावर जाण्याआधी भेट दिली. यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाबाबत भाष्य करत. रायगडचा पालकमंत्री पद हे आमच्या आरपीआय पक्षाला मिळावं अशी आशा व्यक्त केली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. तर एकीकडे सुनील तटकरे यांचा रायगडच्या पालकमंत्री पदावरून मंत्री अदिती तटकरे यांना हे पद मिळण्यासाठी आग्रह सुरू असल्यामुळे हा वाद सुरू आहे.मात्र आता हा वाद सुटत नसेल तर हे पालकमंत्री पद आम्हाला मिळाव अशी मिश्किल स्वरुपातील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
Breaking news
दुहेरी खुनातील आरोपीना अटक होत नाही तोच नाशिक मधील आणखी एक राड्याचा व्हिडीओ समोर आलाय
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटले व्यावसायिकांना टोळक्याने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस
हॉटेल समोरील पान टपरी चालकांकदून वस्तू खरेदी करून पैसे न दिल्यानं जाब विचारला असता टोळक्याने मारहाण केल्याची पोलिसांत फिर्याद दाखल
मागील भांडणाची कुरपात काढून मारहाण केल्याचा पोलिसांना संशय
शहरात सुरू असणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण
पोलीसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याची नाशिककरांची मागणी
गेल्या तीन महिन्यांत नाशिकमधे आठ ते दहा खुनाच्या घटना घडल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे
अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात इमारतीत आग
घटनास्थळी 15 ते 20 अग्निशमन दलाचा गाड्या पोहचले आहेत
तब्बल दोन तासापासून आग विझवायचा प्रयत्न युद्ध पातळीवर केली जात आहे
या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहे
बीड जिल्ह्यामधल्या दादागिरीचा त्रास केवळ बीड जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही...तर संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा त्रास झाला आहे... याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोडीसाठी बीड जिल्ह्यातून टोळ्या जात असतात... मात्र गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये ट्रक मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे... संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने फसवणूक झालेले अडीच हजार गुन्हे दाखल आहेत.... त्यापैकी 90% गुन्हे हे बीड जिल्ह्यातील मुकादमांवर दाखल आहेत... ट्रकच्या मालकाने दिलेले ॲडव्हान्स पैसे आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करणे , बांधून ठेवणे, महिलांना समोर करून अत्याचाराचे खोटे गुन्हे दाखल करणे अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आहेत.... त्यामुळे जीवाच्या भीतीने पैसे परत मागण्यासाठी कोणताही ट्रक मालक बीडच्या वाटेला जात नाही... अनेक ट्रक मालकांनी ट्रक विकून हा व्यवसाय बंद केला...
नागपूरच्या तणावग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समिती नेमून ज्येष्ठ नेत्यांवर सोपवली जबाबदारी
ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची समिती नागपूरात जाऊन दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करणार व शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार
समितीत ज्येष्ठ नेते गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आ. साजिद पठाण यांचा समावेश असून
नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील समन्वयक आहेत.
गडचिरोली : येथील रहिवासी असलेला आदित्य तीतिरमारे याची अंडर-१९ राष्ट्रीय क्रिकेट अकादमी एलिट कॅम्पसाठी निवड झाली आहे. अंडर-१९ संघात विदर्भाचे प्रतिनिधित्व करताना त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे ही निवड झाली. आदित्यला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या स्वाक्षरीचे पत्र ईमेलद्वारे प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी एलिट कॅम्पसाठी निवड झाल्याबद्दल मी खूप आनंदी आणि सन्मानित आहे. माझ्यासाठी शिकण्याची आणि माझा खेळ सुधारण्याची ही एक उत्तम संधी आहे, असे आदित्यने म्हटले आहे.
रामदास आठवले ऑन दिशा सालियान मृत्यू प्रकरण
दिशा सालियान हिचा मृत्यू हा अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली आहे
त्यामुळे या प्रकरणात उध्दव ठाकरे यांचं सरकार असताना चर्चा झाली होती.आणि म्हणून आदित्य ठाकरे यांचा या मध्ये समावेश आहे की नाही याबाबत मला माहिती नाही
किंवा आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात टार्गेट करण्याची कोणतीच भूमिका आमची नाही
परंतु दिशा सालियान हिच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवर या प्रकरणातील चौकशी होणे गरजेचे आहे.
या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा समावेश असेल असे मला अजिबात वाटत नाही.
यासंदर्भातील चौकशी ही निःपक्षपाती पनाने होणे गरजेचे आहे. शिवाय आदित्य ठाकरे यांना यामध्ये टार्गेट करू नये
ग्राहकांना न सांगता वीज मीटर बदलल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवणार
Anchor:- न सांगता वीज मीटर बदलणे ,वाढीव वीज बिल ग्राहकांना आकारणे अशा विविध तांत्रिक बाबी बाबत मनसे जाब विचारण्या करिता मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व कार्यकर्ते ठाण्यातील वागळे इस्टेट येथे असणाऱ्या एमएसईबी कार्यालयात धडकले होते यावेळी अधिकाऱ्यांची भेट घेत मनसेने येणाऱ्या काळात बळजबरीने वीज मीटर जर ठाण्यात कोणत्याही ठिकाणी लावणार असल्यास नागरिकांना याची पूर्वसचना देण्यात यावी व नागरिकांन मध्ये याबाबतची जनजागृती करावी असे सुचवले कोणत्याही नागरिकाला विश्वासात न घेता वीज मीटर बसवले तर मनसे स्टाईलने आम्ही भूमिका घेऊ असे यावेळी मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले आहेत...
थकीत कर भरा अन्यथा घरासमोर बँड वाजवून कर मागल्या जाणार
कर वसुलीसाठी वसमत नगर परिषदेची अनोखी शक्कल
अँकर
सध्या मार्च महिना सुरू आहे आर्थिक वर्ष संपत असल्याने थकीत कर वसूल करण्यासाठी पालिका वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात अशाच पद्धतीने वसमत नगरपालिकेने सुद्धा एक आगळीवेगळी शक्कल लढवली आहे ज्या घराचा किंवा दुकानचा कर थकीत आहे त्या नागरिकांना पालिकेच्या वतीने थकीत कराची मागणी केली जात आहे कर देण्यास टाळाटाळ केल्यास पालिकेच्या वतीने त्या दुकान समोर चक्क बँड बाजा वाजवून थकीत कर भरण्याचा आव्हान केलं जात आहे वसमत नगरपालिकेचे एकूण पाच कोटी 23 लाख रुपये थकीत आहेत स्थानिकांना नोटीस देऊ नये कर भरल्या जात नसल्याने पालिकेने ही नवी युक्ती शोधल्याने नागरिकांनी आता कर भरायला सुरुवात केली आहे काल एका दिवसामध्ये नगरपालिकेने तीन लाख रुपयांची कर वसुली केल्यास सुद्धा माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे
धाराशिव जिल्ह्यातील शेळका धानोरा येथील अल्पभूधारक शेतकरी अरविंद शेवाळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. सरकार दरबारी शेतकरी आत्महत्येची नोंद झाली. मदतीसाठी पात्र शेतकरी यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र आत्महत्येला दहा महिने उलटले तरी अजूनही मयत अरविंद शेवाळे यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नाही. अरविंद शेवाळे यांच्या पत्नीचे कोरोनामध्ये निधन झालं. त्यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन मुलं असून, मुलांचे शिक्षण, मुलीचं लग्न कस करावं हा प्रश्न त्यांच्या आज्जी आजोबा समोर आहेत. मयत शेतकरी अरविंद शेवाळे यांच्या आई आणि मुलांच्या आजी असलेल्या गंगुबाई शेवाळे यांनी ही वेदना बोलून दाखवली. आई वडील नसल्याने दोन्ही मुलं पोरकी झालेत.
सोलापूर ब्रेकिंग
---
निधी अभावी अपूर्ण राहिलेल्या वसतीगृहाचा वापर नशा, जुगार आणि अश्लील कृत्यासाठ... सोलापुरातील धक्कादायक प्रकार
सोलापुरात आयटीआयमध्ये शिकणाऱ्या 50 विद्यार्थिनींसाठी 2011 साली बांधण्यात येतं होते वसतिगृह
सुमारे 50 लाख रुपये खर्च करून या वसतिगृहचे काम सुरु करण्यात आले मात्र निधी अभावी ही इमारत पूर्ण होऊ शकली नाही
16 वर्षांपासून पडीक असलेल्या या इमारतीमध्ये सध्या वापरलेल्या निरोधांच्या पाकिटाचा खच पडलाय तर दारुच्या बाटल्या, नशेची साहित्य देखील इथं पडलेली आहेत
सोलापुरातील हरिभाई देवकरण शाळेच्या पाठीमागील बाजूला असलेल्या तीन एकर परिसरात या वसतिगृहाची इमारत आहे
जवळपास तीन मोठ्या शाळा या ठिकाणी असून दिवसभर विद्यार्थ्यांची रेलचेल इथं असते
अशा ठिकाणी जर पडीक इमारतीचा असा वापर होणार असेल तर भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही
त्यामुळेच शासनाने याची तात्काळ दखल घेत कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाबर यांनी केलीय
या बंद अवस्थेत असलेल्या इमारतीमध्ये नेमकं चालतंय काय
वाशिम
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्याची भूजल पातळी खालावली आहे ...खालावलेली भूजल पातळी भरून निघावी आणि पावसाचं पडणार पाणी जमिनीत कसे जिरवता येईल या करिता मोठ्या प्रमाणावर गाव खेड्यात जलतारा योजना राबविण्यात येतंय ...मात्र,त्या करिता त्या भागातील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक उपस्थित असनं महत्वाचं असत...मात्र त्याला बगल।देत कृषी विभागाच्यावतीने येत्या 22 ते 23 मार्च दरम्यान दोन दिवस धान्य महोत्सवाच आयोजन केले..असून त्या करिता कृषि सहाय्यकाना धान्य पैकींग करण्यात साठी कामात गुंतवुण ठेवल्याचे जलतारा प्रकल्पावर परिणाम होण्याची शक्यता आहे..त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी काही राजकीय पक्षा कडून करण्यात आली...
युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर संतप्त महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला
बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली होती. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या पालकांना युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. एक महिना उलटला असता तरी यात हलगर्जीपणा होत असल्याने संतप्त झालेल्या आईने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती पोलिसांकडून घेतली जात असून पुढील प्रक्रिया केली जाते आहे.
Flash
यावर्षी मध्य रेल्वे चालवणार 332 उन्हाळी विशेष गाड्या
नागपूरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एकूण 98 गाड्या
कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी अप आणि डाऊन मिळून 36 गाड्या
तर कलबुर्गी साठी एकूण 180 एक्सप्रेस सोडण्यात येणार
सी एस एम टी नागपूर अप आणि डाऊन 50 ट्रेन्स
पुणे नागपूर अप आणि डाऊन मिळून 48 गाड्या
सी एस एम टी करमाळी 18 तर एल टी टी करमाळी 18 गाड्या
एल टी टी त्रिवेंद्रम 18 गाड्या
दौंड आणि कलबुर्गी दरम्यान अप आणि डाऊन एकूण 180 गाड्या
1 एप्रिल पासून या उन्हाळी विशेष गाड्यांची सुरुवात होणार,
तर उत्तर भारतात जाणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्या थोड्याच दिवसात जाहीर होणार
नंदनवन आणि कपिल नगर या दोन पोलीस स्टेशन हद्दीमधील संचारबंदी पूर्णता उठविण्यात आली आहे..तर काही पोलीस स्टेशन अंतर्गत नागरिकांचं जनजीवन सुरळीत राहण्यासाठी दोन तास शिथीलता देण्यात आलेली आहे.. आणि गणेशपेठ, कोतवाली ,तहसील पोलीस स्टेशन भागात संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम असणार..
दररोज रिव्ह्यू चालू राहील. शांतता आणि लोकांची मुव्हमेंट पाहून पुढील निर्णय घेणार..
एकूण 91 आरोपी ताब्यात यापैकी 11 अल्पवयीन आरोपी आहेत ...
जे जखमी होते ते आता चांगले आहेत.. आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे..
बांगलादेश कनेक्शन आहे का..? याबद्दल आम्ही तपास करत आहोत.. ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या सगळ्या गोष्टीचा तपास झाल्यानंतरच याबद्दल सांगता येईल...
फइम खान याची सगळी हिस्टरी तपासली जात आहे..
नागपूर हा शांत शहर आहे.. त्यामध्ये सगळ्या समाजाचे पुढे असणारे सण यात कोणी कायदा हातात घेतल्यास आमची कारवाई सुरू राहील..
On pm दौरा सुरक्षा
पंतप्रधान कुठेही जातात तिथे त्या अनुषंगाने सेन्सिटिव्ह बंदोबस्त असतो..
On किरीट सोमय्या
समोर जे जे पुरावे येथील त्या आधारावर आमच्या पुढील गोष्टी सुरू आहेत
प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने तीन दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. आपल्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने अंतर्गत सफाई कामगारांना घरे बांधुन द्यावीत,सफाई कामगारांच्या वारसास ३० दिवसात नियुक्ती द्यावी, सफाई कामगारांच्या मुला- मुलींना मानधन तत्वावर नोकरी द्यावी आणि सेवानिवृत्त, सफाई
कामगारांना वाढीव उपदानाची व सातव्या वेतन आयोगाची रक्कम त्वरीत अदा करावी आणि महानगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांच्या ॲडव्हॉन्स मध्ये वाढ करावी, सफाई कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी साडी, गणवेश, स्वेटर, मफलर, चप्पल,उद,रामबुद, पाट्या, झाडू, गटरपावडी आदी साहित्य त्वरीत द्यावेत यासह विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले...
छत्तीसगडमध्ये चकमकीत 22 नक्षलवादी ठार
छत्तीसगडच्या गंगलूर पोलीस हद्दीतील विजापूर-दंतेवाडा सीमेवरील जंगलात तसेच कांकेर- नारायणपूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
चकमकीदरम्यान विजापूर जिल्हा राखीव (DRG) दलातील एका जवान शहीद
विजापूर-दंतेवाडाच्या चकमकीत 18 तर कांकेर- नारायणपूरच्या चकमकीत 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले
मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे
येथे अजून चकमक आणि शोध मोहीम सुरू असल्याची माहिती विजापूर पोलिसांनी दिली आहे.
इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी केली कारवाई
रामदास कदम on दिशा सालियन प्रकरण....
आदित्य ठाकरे यांच्या दिशा सालियन प्रकरणात संबंध असल्याचे नारायण राणे सुरवातीपासूनच बोलत होते....पण दुर्दैवाने ते पुरावे देऊ शकले नाहीत.
शिवसेना प्रमुखांच्या नातू वर बलात्काराचा आरोप होणे ही गंभीर बाब....उद्धव आणि आदित्यला थोडीशी लाज असती तर देश सोडून गेले.
पोलिसांना हाताशी धरून उध्दव ठाकरेंनी पुरावे नष्ट केले आहेत का याची चौकशी व्हायला हवी - रामदास कदम
मुलाला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंना फोन केल्याच्या चर्चा असल्याबाबत देखील रामदास कदम यांचा गौप्यस्फोट...
ज्या मुलींच्या संरक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली त्यांचा मुलगा आणि नातू यांच्यावर जर असे आरोप होत असतील तर ही बाबत अत्यंत गंभीर - रामदास कदम
दिशा सालियन च्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे...त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला तर याचा खोलवर तपास होईल....रामदास कदम.
संजय शिरसाट ऑन शिवसेना शिंदे गट ठाकरेंचा वचपा काढण्यासाठी दिशा सालियान प्रकरण उकरून काढताय का?
आम्ही अशातले लोक नाही आहोत
आम्हाला वचपा काढणे किंवा कोणाचा जाऊन अतिक्रमण तोडणे...किंवा जेवताना कोणालातरी जेवत्या ताटावरून नारायण राणे यांच्या सारख्यांना उठविणे असे आमचे धंदे नाहीत..... उद्धव ठाकरे यांना टोला
दिशा सालियान यांच्या वडिलांनी पाच वर्षानंतर त्यांच्या मनातील आणि पोटातील जे काही होत ते आता दबाव झुगारून त्यांनी सर्व हकीकत समोर आणली आहे .
माझ्या मुलीचा खून झाला आहे तिने आत्महत्या केलेली नाही
त्यांनी आता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.. माजी महापौर यांनी आमच्यावर दबावतंत्र वापरलं होत अस सुधा दिशा चे वडील यांनी सांगितलेले आहे
आम्ही नजरकैदेत होतो म्हणून आम्हाला याबाबत जास्त काही बोलता आलं नाही
आम्हाला आता त्यांच्या राजकारणाशी काही देणं घेण नाही..
मात्र... एखाद्याचा जीव जात असेल तर या गोष्टीला जे जबाबदार आहेत आणि ते जर मोकाट फिरत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
आणि निश्चित यामध्ये हायकोर्ट दिलासा देईल आणि यावर कारवाई केली जाईल
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण
'प्रशांत कोरटकर याने पुरावा नष्ट केल्याचं कलम ऍड करा'
सावंत यांच्या वकिलांची पोलिसांकडे मागणी
Anchor - महापुरुषांची बदनामी करून इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज ही फेटाळला आहे. या प्रकरणांमध्ये प्रशांत कोरटकर याने मोबाईल मधील डेटा डिलीट करून तो जुना राजवाडा पोलिसांकडे जमा केला आहे. या गुन्ह्यातील पुरावा नष्ट केल्याचं BNS 241 कलम प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात ऍड करावं या मागणीचे निवेदन इंद्रजीत सावंत यांचे वकील हेमा काटकर आणि शिवप्रेमींनी दिल आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी हे निवेदन स्वीकारून या गुन्हा मध्ये हे कलम ऍड करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिला आहे. यावेळी स्वतः इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत हे जुना राजवाडा पोलिसांना उपस्थित होते. तसंच इंद्रजीत सावंत यांनी पोलीस तपासाबाबत असमाधान असल्याच म्हटलं आहे.
फ्लॅश:- मुंबईच्या अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात महाकाली रोडवर न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट कंपनी मध्ये मोठे आग लागली आहे.
दुपारी सव्वादोन च्या सुमारास इमारतीच्या टेरेसवर ही मोठी आग लागली आहे,
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा चार गाड्या आणि एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत...
इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची माहिती मिळत आहे त्यांना अग्निशमन दलाचा जवानांकडून बाहेर काढण्याचे प्रयत्न केला जात आहे...
नागपूर : सोमवारी रात्री हिंसक घटना घडल्याने महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासला आहे. दगडफेक आणि जाळपोळीची घटना अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा काही शक्ती प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील शांतता व सामाजिक सौहार्द टिकवणे गरजेचे आहे. नागपूर शहरात झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत माजी प्रांताध्यक्ष गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आ. साजिद पठाण हे या समितीचे सदस्य असून नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील समन्वय आहेत. काँग्रेसची ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करेल व शांतता प्रस्थापीत करण्यासाठी प्रयत्न करेल अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
प्रशांत कोरटकरने मोबाईल मधील डाटा डिलीट केला
त्यामुळे त्याच्यावर पुरावा नष्ट केल्याचं कलम लावा
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यासह शिवप्रेमींची मागणी
पुरावा नष्ट केल्याचं कलम वाढवण्याच्या मागणीसाठी इंद्रजित सावंत यांच्यासह शिवप्रेमी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात
जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेणार भेट
प्रशांत कोरटकरचा जामीन फेटाळताना कोरटकरने मोबाईल डाटा डिलीट केल्याचं न्यायालयाने नोंदवला आहे निरीक्षण
बारामती : वाहतूक पोलिसांनी आता फटाका बुलेटवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक शाखेने फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकानांवरच कारवाई करत 16 फटाका सायलेंसर जप्त केलेत. बारामती वाहतूक पोलिसांनी महिनाभरापासून मोठ्या आवाजाच्या सायलेंसरवर कारवाईचा धडाका लावला आहे. मागील काही दिवसांपूर्वीही 12 बुलेटच्या फटाका सायलेंसरवर कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही काही विक्रेत्यांनी मोठ्या आवाजाच्या सायलेंसरची विक्री सुरूच ठेवली होती. काही दुकानांमधून बुलेट चालक हे फटाका सायलेंसर बसवून घेतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. याअनुषंगाने पोलीसांनी बारामती शहरातील मोठ्या आवाजाचे सायलेन्सर विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी केली. या तपासणीत 16 सायलेंसर जप्त करण्यात आले. बुलेट फटाका सायलेंसरवर कारवाईची मोहीम सुरू केल्यापासून आजतागायत एकून 51 सायलेंसर जप्त करण्यात आले आहेत.
कडेगाव येथील माळीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात प्रांजली राहुल माळी या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. कुत्र्याच्या हल्ल्यात प्रांजली ही मागील आठवड्यात गंभीर जखमी झाली होती. वडील राहुल व नातेवाइकांनी तिला सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. कडेगावातील माळीनगर येथे प्रांजली हिचे वडील राहुल माळी हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. मागील आठवड्यात प्रांजली ही तिच्या मोठ्या बहिणीसह शेजारी असलेल्या मैत्रिणीच्या घरी खेळण्यासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रांजली हिच्या मानेला व गळ्याला चावा घेतला. त्यामुळे प्रांजली ही जमिनीवर कोसळली. तर मुलीचा आरडाओरडा ऐकून शेतात काम करीत असलेले प्रांजली हिचे वडील राहुल हे धावत आले; परंतु तोपर्यंत प्रांजली ही गंभीर जखमी झाली होती. वडील राहुल व नातेवाइकांनी तिला सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
- नागपूर हिंसाचार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र
- पत्रातून या घटनेचा सूत्रधार असल्याचा संशय आहे त्या फहिम खान ची चौकशी करण्याची मागणी
- फहिम खान याचे मालेगाव येथील राजकीय आणि सामाजिक संघटनांशी संबंध असल्याचा दावा
- निवडणुकीच्या काळातील मालेगाव येथे 22 कोटी रुपयांचा फंडिंग घोटाळा उघडकीस आला असून त्याची चौकशी ईडी करत आहे
- फहिम खान च्या बांगलादेश कनेक्शन चीही चौकशी करण्याची किरीट सोमय्या यांची नागपूर पोलीस आयुक्तांना विनंती
मित्राने केलेली चेष्टा बेतली तरुणाच्या जीवावर
मित्राने चेष्टेने पाण्यात ढकललेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील घटना
तानाजी बाजारी असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव
तानाजी याला पाण्यात ढकलणाऱ्या रोहित सुतारवर गुन्हा दाखल
गरीब घरातील तानाजीचा बुडून मृत्यू झाल्याने गारगोटी परिसरात हळहळ
सतीश भोसले उर्फ खोक्या याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिरूर न्यायालयात झाली सुनावणी
खोक्याचा पुढील 14 दिवसांचा मुक्काम असणार न्यायालयीन कोठडीत
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला बॅटने मारहाण तसेच शिरूर येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्या प्रकरणी भोसले अटकेत
सात दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज खोक्याला शिरूर न्यायालयात केले होते हजर
सातारा : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावर प्रस्तावित मुनावळे जलपर्यटन प्रकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा महत्वकांक्षी प्रकल्प समजला जातो. मात्र या जल पर्यटनासाठी प्रकल्पातील विविध परवानग्या मिळाल्या नसल्यामुळे हा प्रकल्प अडचणीत आला आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे. अन्यथा 2 एप्रिल रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हिंजेवाडी दुर्घटनेनंतर यंत्रणा सतर्क, लवकरच बस ओनर्सची बैठक
काल हिंजवडी मध्ये खाजगी बस जळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला
यामुळे खाजगी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे
त्यामुळे पुणे आरटीओ कडून सर्व बस ओनरशी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती समोर
पुण्यातून दररोज किमान 1000 खाजगी बसची ये - जा
वाहनांची फिटनेस तपासणी, इन्शुरन्स अशा अत्यावश्यक गोष्टींची पूर्तता करूनच गाडी मार्गावर सोडणे आवश्यक
उन्हाळ्यात आगीच्या घटना कशा रोखता येतील याबाबत सुद्धा बैठकीत चर्चा होणार
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ठ ३२ गावांसाठी पुढील आठवड्यात होणार बैठक
कर, पाणी यासह अन्य विषयांवर हे अधिवेशन संपण्यापूर्वी मंत्रालयात पुण्यातील आमदार आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेणार
पालिकेत समाविष्ट झालेली ३२ ग्रामंपंचायती महापालिकेत विसर्जित करून पुणे शहाराचा विस्तार करण्यात आला
त्यामुळे या गावांचा महसुली कर ग्रामपंचायत ऐवजी महापिलेकत जमा होत आहे
३२ गावांतून कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेला मिळत आहे. मात्र त्या तुलनेत या गावांमध्ये ना रस्ते, ना ड्रेनेज, ना शुध्द पाणीपुरवठा असा आरोप कृती समिती कडून अनेक वेळा करण्यात आला आहे
येत्या बैठकीत सर्व विषयांबद्दल चर्चा होणार
बिल गेट्स घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
आज सकाळी १०.३० वाजता सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी होणार भेट
काल न्यूझीलंड पंतप्रधानांसोबत फडणवीसांनी केली होती चर्चा
आजा बिल गेट्स यांसोबत फडणवीसांची भेट
महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी होणार खलबते
अधिवेशनाच्या संदर्भात आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत होणार महत्वाचा निर्णय
अधिवेशन आहे त्या वेळेत घ्यायचं की आधीच संपवायचं या संदर्भात होणार निर्णय
मोठ्या प्रमाणात कामकाज बाकी राहिल्यामुळे २६ फेब्रुवारी पर्यंत अधिवेशन सुरु राहण्याची शक्यता
कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार नसून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय
आज सायंकाळी ६ वाजता विधान भवनात होणार मंत्रीमंडळ बैठक
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक जिल्ह्याचा हेलिकॉप्टर ने दौरा करून कांदा लागवडीची पहाणी करून खातरजमा करावी
राज्यात मुबलक कांदा आहे त्यामुळे 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी
-
कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे, येत्या काळात उन्हाळी कांदाची आवक वाढणार असल्यानं कांद्याचे भाव आणखी कोसळण्याची शक्यता आहे
कांद्याच्या भावातील घसरण थांबविण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे
- * राज्यात मुबलक कांदा आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हेलिकॉप्टरने पाहणी करा
- हेलिकॉप्टर ने पाहणी करून मुबलक कांदा असल्याचे खात्री करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करून घ्यावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मागणी
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. धडगाव तालुक्यातील एकूण 15 ते 20 किलोमीटर पर्यंत डोंगरांवर आग पसरली आहे. गेल्या 3 दिवसांपासून डोंगरांवर आग भडकत असल्याची माहिती आहे. पर्वताला लागलेल्या आगीत अनेक जंगली प्राणी होरपळून मेल्याची माहिती आहे. डोंगराला लागलेल्या भीषण आगीत वनसंपत्ती जळून खाक होत आहे. डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांच्या पाढे आणि वस्त्या असल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. डोंगराला लागलेला आगीचा कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वनविभागाचा माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. झाडापासून कोळसा मिळावा यासाठी आग जाणून बुजून लावली गेली असल्याची माहिती आहे.
भंडारा जिल्हा परिषदच्या रिन्यूव्हेशनचं काम धडाक्यात करण्यात येत आहे. अशात रयतेचे राजे शिव छत्रपती महाराज यांचा अर्धाकृती पुतळा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं अडगळीत टाकल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. जिल्हा परिषदच्या प्रत्येक विभागाचं काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या ही कक्षाचं काम करण्यात येत आहे. त्यांच्या कक्षात असलेली छत्रपती शिवरायांची अर्धाकृती पुतळा अडगळीत धुळखात पडून असल्याचा प्रकार समोर आला. याचा व्हिडिओ काढत असताना शिक्षण विभागाच्या अधीक्षकांच्या ही गंभीर बाब लक्षात येताचं त्यांनी, झालेल्या चुकीची कबुली देत शिवरायांचा पुतळा उचलून अन्यत्र नेला. सोमवारला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झालेली असतानाचं भंडारा जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातचं हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं आता शिवप्रेमीं काय भूमिका घेतात, याकडं नजरा लागल्या आहेत.
परिवहन विभागाची ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या शोरूम वर कारवाई कारवाई करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यातील एकूण 36 शोरूमवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 34 गाड्या जप्त करण्यात आल्या. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या कंपनीने एकच ट्रेड सर्टिफिकेट घेऊन महाराष्ट्रात विविध ठिकाणी ओला इलेक्ट्रिक गाड्यांचे शो रूम आणि स्टोअर कम सर्व्हिस सेंटर उभारण्यात आल्याची तक्रार परिवहन विभागाला प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री यांनी दिले होते. त्यानुसार 2 दिवस कारवाई करून ओला कंपनीच्या 34 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 39 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम कायदा 1989 च्या नियम 33 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे नेते सकाळी 11.30 वाजता राज्यपालांची भेट घेणार...
विधानपरिषदेत नियमानुसार न होणारे कामकाज यासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांची भेट घेणार आहेत
त्याचसोबत नागपूर हिंसाचार प्रकरणी देखील महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत
नोकरी गेल्याने पैशांसाठी इंजिनियर बनला चोर, टेलिकॉम टॉवरच्या साहित्य चोरीत अटक
धाराशिव मधील येडशी येथील इंडस कंपनीच्या टॉवर वरून साहित्य चोरीच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कारवाई
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून आरोपी राजेश आचार्य ला अटक, दोन लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
एका नामांकित कंपनीत असलेली इंजिनियरची नोकरी गेल्यानंतर राजेश आचार्य पैशाची चणचण भासू लागल्याने चोरीकडे वळल्याची पोलीस तपासात कबुली
गडचिरोली : जिल्ह्यात शासकीय निधीतून स्मार्ट व गुणवत्तापूर्ण कामे व्हावी यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 604 कोटी रुपये निधीच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. विकास निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा, निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही शासकीय यंत्रणेला दिल्या. यावेळी त्यांनी शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे तसेच लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून निधी वितरणाचे नियोजन करावे, असे निर्देशही जिल्हा प्रशासनाला दिले.
जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे धाराशिव जिल्ह्यातील 501 ग्रामपंचायत सदस्य व 12 सरपंच अपात्र
ग्रामपंचायत सदस्यांवर जिल्हाधिकारी यांनी केलेली आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरन पूजार यांच्याकडून ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार अपात्रतेची कारवाई
9 जुलै 2024 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांवर कारवाईचे ग्रामविकास विभागाचे आदेश
जिल्ह्यातील आठ ही तालुक्यातील 501 ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरले तर यामध्ये आरक्षित जागेवर निवडुन आलेल्या 12 सरपंचाचाही समावेश
राखीव जागेवरून निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देवुन ही दुर्लक्ष केल्याने तब्बल 4 वर्षानंतर केली कारवाई
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या कारवाईने राजकीय क्षेत्रात खळबळ
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील इतर महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर...