Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. संतोष देशमुखांना अनैतिक संबंधाच्या प्रकरणात गोवण्यासाठी उभ्या केलेल्या महिलेची हत्या झाल्याचा दावा...More
जालना -
मोबाईल साठी 13 वर्षाच्या मुलाकडून आईची हत्या...
पाण्यात टाकून मोबाईल खराब केल्याचां राग, 13 वर्षाच्या मुलाकडून आईचा खून..
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या 'अंतरवाली टेंभी' गावची घटना...
25 मार्च रोजी शेतात 13 वर्षाच्या मुलाने आपली आई मयत मीराबाई बोंडारे यांच्या डोक्यात दगड घालून खून केला होता..
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड..
अँकर -पाण्यात टाकून आईने मोबाईल खराब केल्याचा राग मनामध्ये धरून एका तेरा वर्षाच्या मुलाने आईची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे..
घनसावंगी तालुक्यातल्या टेंभी अंतरवाली गावामध्ये 25 मार्च रोजी मिराबाई बोंडारे या 41 वर्षीय महिलेच्या खूनाची घटना उघडकीस आली होती, पोलीस आरोपीचा मागोवा काढन्याचा बराच प्रयत्न करत असताना, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे पोलिसांनी मयत महिलेच्या मुलाची यात चौकशी केली, या चौकशीत या मुलाने खुनाची कबुली दिली.. याप्रकरणी या विधीसंघर्ष मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे
ढगाळ वातावरणामुळे, फळबागांना फटका बसण्याची शक्यता..
जालना जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पासून तीन दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता. याच अंदाजानुसार 4 च्या सुमारास जालना जिल्ह्यातील बदनापूर जाफराबाद तालुक्यातील काही भागात अचानक पावसाने पाठ हजेरी लावली, परिणामी काढणीला आलेली पिक तसेच फळ पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे..
Kolh breaking
गारा.... वारा.... आणि पावसाच्या धारा...
कोल्हापुरातल्या अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी
पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि शाहूवाडी भागात पावसाच्या हलक्या सरी
कोल्हापूर शहरात सुद्धा ढगाळ वातावरण झाल्याने पाऊस पडण्याची शक्यता
मागील तासाभरापासून ढगाळ वातावरण
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने २०२४-२५ आर्थिक वर्षात आजवरचे विक्रमी म्हणजेच ६ हजार १९८ कोटी रुपये मालमत्ता कर संकलित
• अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी रुपयांचेही संकलन
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. मालमत्ता कर संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या ६ हजार २०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत महानगरपालिकेने ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलन केले आहे. तसेच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात अधिकचे १७८ कोटी ३९ लाख रुपये देखील यंदा संकलित करण्यात आले आहेत.
मुंबईकर नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध नागरी सेवासुविधा दिल्या जातात. उत्तमोत्तम नागरी सेवासुविधांची पूर्तता करण्यासाठी विविध आर्थिक स्रोत महत्वपूर्ण ठरत असतात. मालमत्ता करही याच आर्थिक स्रोतांपैकी अत्यंत महत्वपूर्ण स्रोत मानला जातो.
या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार आणि करनिर्धारक व संकलक श्री. गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता कर संकलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. नागरिकांनी वेळेवर मालमत्ता करभरणा करावा, यासाठी जनजागृती करणे; निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा, यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र ठेवणे; करभरणा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देणे; मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करणे तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा करणे, आदी प्रयत्नांचा यामध्ये समावेश होता.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६ हजार २०० कोटी रुपये मालमत्ता कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले होते. करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तसेच मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दिनांक २६ मे २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ या निर्धारित कालावधीदरम्यान ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलित करण्यात आले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ टक्के इतके आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी ५० हजार रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.
प्रशासकीय विभागनिहाय कामगिरीचा विचार करता, दिनांक २६ मे २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षामध्ये जी दक्षिण (६२४ कोटी ५० लाख रुपये), के पूर्व (५६८ कोटी ५६ लाख रुपये), एच पूर्व (५२६ कोटी ६४ लाख रुपये), के पश्चिम (५०५ कोटी रुपये) या विभागांनी सर्वाधिक मालमत्ता कर संकलन नोंदवले आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रशासकीय विभागनिहाय संकलित मालमत्ता-
शहर विभाग -
१) ए विभाग – २१९ कोटी १२ लाख रुपये
२) बी विभाग – ३६ कोटी ३३ लाख रुपये
३) सी विभाग – ८७ कोटी ८३ लाख रुपये
४) डी विभाग – २७३ कोटी ४६ लाख रुपये
५) ई विभाग – १५४ कोटी १६ लाख रुपये
६) एफ दक्षिण विभाग – १३५ कोटी २५ लाख रुपये
७) एफ उत्तर विभाग – १६३ कोटी २२ लाख रुपये
८) जी दक्षिण विभाग – ६२४ कोटी ५० लाख रुपये
९) जी उत्तर विभाग - २३९ कोटी ४० लाख रुपये
एकूण संकलित कर रक्कम – १ हजार ९३३ कोटी २६ लाख रुपये
पश्चिम उपनगरे-
१) एच पूर्व विभाग – ५२६ कोटी ६४ लाख रुपये
२) एच पश्चिम विभाग – ३८२ कोटी ७४ लाख रुपये
३) के पूर्व विभाग – ५६८ कोटी ५६ लाख रुपये
४) के पश्चिम विभाग – ५०५ कोटी रुपये
५) पी दक्षिण विभाग – ३६३ कोटी ८७ लाख रुपये
६) पी उत्तर विभाग – २१४ कोटी ५६ लाख रुपये
७) आर दक्षिण विभाग – १७९ कोटी ३६ लाख रुपये
८) आर मध्य विभाग – २२२ कोटी १० लाख रुपये
९) आर उत्तर विभाग - ७५ कोटी ६५ लाख रुपये
एकूण संकलित कर रक्कम – ३ हजार ०३८ कोटी ४९ लाख रुपये
पूर्व उपनगरे-
१) एल विभाग – २६० कोटी ६२ लाख रुपये
२) एम पूर्व विभाग – ८८ कोटी ४९ लाख रुपये
३) एम पश्चिम विभाग – १४५ कोटी ४० लाख रुपये
४) एन विभाग – २१९ कोटी ३७ लाख रुपये
५) एस विभाग – ३३० कोटी ८० लाख रुपये
६) टी विभाग – १७४ कोटी १२ लाख रुपये
एकूण संकलित कर रक्कम – १ हजार २१८ कोटी ७९ लाख रुपये
ठाण्यातील कोपरी परिसरात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया बेघर झालेल्या नागरिकांना देणार भेट
ठाण्यातील कोपरी परिसरात धोकादायक इमारत ठाणे महापालिका कडून पाडण्यात आल्यानंतर ३६ खोलीमधील काही खोलीमालक पालिका आणि इमारत व्यावसायिक यांच्या विरोधात आवाज उचलला होता.
मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका स्तरावर ४२० ऐवजी जास्त जास्त चौरस फुटामध्ये वाढ करून द्यावी अशी मागणीचा पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते.
मात्र न्यायालयीन प्रविष्ट प्रकरण असल्यानंतर देखील महापालिका यांनी कोर्टाच्या आदेशानुसार धोकादायक इमारत पाडण्यात आली आहे.
त्यामुळे बेघर झालेल्या काही रहिवासी यांना दिलासा आणि न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया बेघर झालेल्या रहिवाशांची आणि पालिका अधिकाऱ्यांची घेणार भेट
या व्यतिरिक्त इतर इमारतीतील तक्रारीचा बाबत रहिवाशांना भेट देणार..
कोपरी परिसरातील सोहळा नंबर इमारत
एकूण 36 खोल्या
पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केले
इमारत व्यवसायिक आणि पालिकेच्या संगणमताने इमारत तोडण्यात आल्याचा दावा स्थानिकाकडून करण्यात आला आहे
मिरा रोड : मिरा रोड रेल्वे स्टेशन आणि परिसर नशेड़्यांचे अड्डे बनले असून, येथे खुलेआम नशा केली जात असल्याचे दिसून येत आहे. स्टेशनच्या फ्लायओव्हरवर युवक उघडपणे नशा करत असल्याचे पाहायला मिळत आहे, तर परिसरात सहजपणे नशिले पदार्थ उपलब्ध होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडेच, मीरा रोड पोलिसांनी एका युवकाला नशा करताना रंगेहाथ पकडले होते आणि त्याच्याकडून सिरिंज जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, अशा घटना वारंवार घडत असल्याने स्थानिक रहिवासी आणि प्रवासी भयभीत झाले आहेत.
फक्त नशिले पदार्थच नव्हे, तर शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पानटपऱ्यांमध्येही खुलेआम प्रतिबंधित गुटखा विकला जात असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
AR: रोहयो योजनेअंतर्गत बांधलेली विहीर महिनाभरातच ढासळल्याचा प्रकार नांदेडच्या रुई गावात घडलीय, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांने सिमेंटच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित करून न्याय देण्याची मागणी केलीय. नायगांव तालुक्यातील रुई इथल्या कामाजी मुकादम या शेतकऱ्याला रोहयो योजने अंतर्गत विहीर मंजूर झाली होती. प्रत्यक्षात या शेतकऱ्याला शासनाच्या अनुदानाचा रुपयाही अद्याप मिळाला नाही. या शेतकऱ्याने जवळच्या पैशातून विहिरीचे काम पूर्ण केले पण अचानकपणे विहीर ढासळल्याने या शेतकऱ्याचे साडे सहा लाख रुपयांचे नुकसान झालेय. या प्रकरणी चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्याने केलीय.
चंद्रपूर : शिवसेना (उबाठा) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल... विक्रांत सहारे याच्यावर चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात 5 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा करण्यात आला दाखल, वेकोली (western coalfields limited) या सरकारी कोळसा कंपनीच्या माईन्समध्ये काम करणाऱ्या एका खाजगी कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर वेंकटेश रमण रेड्डी यांच्याकडे विक्रांत सहारे याने पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आहे आरोप, कंपनीने अल्पवयीन मुलांना कामावर ठेवण्याचा आणि मारहाणीचा आरोप करत विक्रांत ने कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याची दिली होती धमकी, यावर रेड्डी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, त्यानंतर सहारे याच्यावर दाखल करण्यात आला गुन्हा, विक्रांत सहारे सध्या फरार असून पोलीस त्याचा घेत आहेत शोध, विक्रांत सहारे वर याआधी देखील दाखल आहेत अनेक गंभीर गुन्हे, गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात त्याच्या इंदिरानगर येथील घरून 40 जिवंत कारतूस पोलिसांनी केले होते जप्त
लातूर जिल्ह्यातील औसा शहरात एका गोडाऊनला लागली भीषण आग...औसा आणि लातूर येथील तीन अग्निशमन विभागाच्या गाड्या दाखल
लातूर जिल्ह्यातील औसा शहरातील पाईप आणि नळ योजनेचे साहित्य ठेवलेल्या एका गोडाऊनला आज दुपारच्या सुमारास भिषण आग लागली. या आगीच्या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीच्या घटनेत गोडाऊनच्या बाजूला असलेल्या दोन घराचे काही नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. शहरातील केदारनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या भरवस्तीत लागली आग... या घटनेची माहिती मिळताच औसा आणि लातूर येथील अग्निशामक दलाच्या तिन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत...
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बाईट
- ई बाईक धोरण महाराष्ट्रात स्वीकारला जाईल
- बाईक टॅक्सी महाराष्ट्रात सुरू होईल
- महिला सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली बनवली आहे
- पावसात भिजू नयेत म्हणून ई बाईक आणल्या जातील
- सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील
- इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ई बाईक पर्याय आणला जात आहे
- दरांबाबत अद्याप निश्चित केला नाही
- रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दहा हजार अनुदान द्यायचा प्रयत्न करतोय
- दहा हजारांहून अधिक रोजगार मुंबईतच निर्मिती होणार आहे, महाराष्ट्रात 20 हजार राज्यात होईल
- पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे
मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया
बीड जेल मधील मारहाण प्रकरण
गॅंगवर होऊन हे एकमेकांना आत मध्ये संपवतील...
यात पळवट शोधण्याचा प्रयत्न करत आहेत हा खटला फास्ट ट्रॅक वर चालउन लवकर फाशी द्या. म्हणजे एकमेकांना संपवणार नाहीत..
जिल्हा प्रशासनाची सर्वांची बदली करून तिथे नवीन स्टाफ भरायला पाहिजे.... त्यांची पण चौकशी झाली पाहिजे..
कळंब मधील महिलेचे हत्या प्रकरण..
गृहमंत्री जाणून-बुजून हे टाळण्याचा प्रयत्न करत आहेत..
यातील कोण आरोपी आहेत कोण पोलीस आहेत आरोपींना फरार असताना पैसे पुरवणारे कोण आहेत या सर्वांना सहारूपी करा.
करत नाहीयेत गृहमंत्र्यांनाच आरोपींना वाचवायचा आहे..
मुझे एक असच संपवतील मग सरकारच्या हाताला काहीच लागणार नाही..
पकडलेल्या आरोपी खोटे बोलू शकतात. सखोल करायला पाहिजे यांना खून कोणी करायला सांगितला होता या महिलेचा संतोष भैयाच्या हद्य प्रकरणात काय संबंध होता.. याची सखोल चौकशी झाली पाहिजे.. कोणी करायला लावल याची सखोल चौकशी झाली पाहिजे..
ऑन कर्जमाफी..
सरकारला माज आणि मग्रुरी आली आहे..
वर गरीब शेतकऱ्यांना हे खोटं बोलले, करला मस्ती आली आहे,
लाडक्या बहिणीचे देखील आता फॉर्म रिजेक्ट करत आहेत, शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे तुम्ही सरकारला आपलं म्हणून मतदान केलं मात्र ते तुम्हाला आपलं म्हणायला तयार नाहीत ती भावना समजून घ्या...
आपल्या आई बापाची शेतकऱ्यांची सरकारला कदर नाही...
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी मेले शेतकऱ्यांना तुम्हाला हे कळत नाही का?
कापूस तूर आणि सोयाबीन ला कांद्याला द्राक्षाला मोसंबीला भाव का मिळत नाही?
गोड बोलून सगळ्या शेतकऱ्यांचे हे वाटोळ करायला लागले आहेत. शेतकऱ्याला आरक्षण ही पाहिजे आणि मालाला भाव पण पाहिजे..
आरक्षणापासून सरकारला सुट्टी नाही, मात्र मी शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभा राहणार...
उदयनराजे भोसले, खासदार, सातारा -
- पुण्यासारख्या ठीकाणी लॅंड ग्रॅबिंगचे प्रमाण मोठे आहे.
- मुकुंद भवन ट्रस्ट कडुन बेकायदेशीर रित्या जागा ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत
- सातारा राजघराण्याची जागा देखील त्यांनी बेकायदेशीर रित्या बळकावली आहे
- त्या त्या वेळच्या आधिकार्यांनी आणि राजकारण्यांनी त्यांना मदत केली आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे
- याची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी. याची मागणी आम्ही अमित शहांकडे करणार आहोत.
- मागील सहावार्षापासुन आम्ही या प्रकरणी सुनावणी घेण्याची मागणी करत आहोत. मात्र अद्याप सुनावणी लावली जात नाही
- आमच्या बाबतीत असे होत असेल तर सर्वसामान्यांबाबत काय परिस्थिती असेल
- त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. सुनावणी कधी होईल याची आम्ही वाट पहातोय.
- अन्याय होत असेल तर मी गप्प बसणार नाही. तशी माझी ख्याती नाही.
- मुकुंद भवन हा ट्रस्टच नाही. तो रजिस्टर ट्रस्ट नाही.
ऐन उन्हाळ्यात गुहागर मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला....
शृंगारतळी ग्रामपंचायत परिसरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे आठ बोअरवेल झाल्या बाधित.... एका विहिरीचाही समावेश.
दूषित पाण्यामुळे भर उन्हात नदी झाली प्रवाहित.. पाण्याचे झरे बाधित झाल्यामुळे बोरिंगच्या पाण्याला दुर्गंधी.
पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्यामुळे वीस घरांवर पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट.... राजकीय पक्षाकडून वीज घरांना नियमितपणे केला जात आहे पाण्याचा पुरवठा.
प्रशासनाकडून डोळे झाक होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप.
कारवाई संदर्भात प्रशासनाचे एकमेकांवर बोट दाखवत कागदी घोडे नाचवत असल्याचे उघड.
शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील शृंगार तळी ग्रामपंचायत परिसरात दूषित पाण्यामुळे जाणवले गावातील वीस घरांचा पाण्याचा प्रश्न बनला गंभीर.
पाण्याचा प्रश्न न मिटवल्यास ग्रामस्थ 15 तारखेपासून बसणार आमरण उपोषणाला.
अँकर -
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यामध्ये त्यांच्या भाषणात नद्यांचा प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील नद्यांची परिस्थिती किती भीषण आहे याचे उदाहरण देणारे परिस्थिती समोर आली आहे. गुहागरच्या शृंगाळतळी बाजारपेठेतील हॉटेल्स तसेच बांधकामांचे सांडपाणी थेट नैसर्गिक स्त्रोत असलेल्या ओढ्यात सोडल्यामुळे त्या भागातील जवळपास आठ बोरवेल बाधित झाले असून पाण्याला प्रचंड वास येत आहे त्यामुळे जानवळे मधील ओझरवाडीतील ग्रामस्थ प्रचंड संताप आले आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवा नाहीतर संपूर्ण ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसतील असा इशारा देखील देण्यात आला आहे. या भागातील दूषित झालेल्या पाण्याचे नमुने आरोग्य विभाग तसेच पर्यावरण प्रदूषण मंडळाकडून तपासणीसाठी नेण्यात आले असून आरोग्य विभागाकडून हे पाणी पिण्यासच नव्हे तर आंघोळीसाठी देखील घातक असल्याचा अहवाल दिला आहे त्यामुळे भविष्यात पाण्याची व्यवस्था कशी करायची असा सवाल येथील ग्रामस्थ प्रशासनाला करत आहेत.
आदित्य ठाकरे
आमदारांच्या बैठकीत अनेक मुद्दे मांडले
भूमिपूजन निवडणुकीआधी झाले नंतर काम सुरु झाले नाही असे अनेक आमदार बोलले
BMC मध्ये १५ वॉर्ड ऑफिसर नाहीत त्यात ७ वॉर्ड ऑफिसर आले
महायुती सरकारला एप्रिल फुल सरकार नाव दिला पाहिजे
रेडीरेकनर वाढला म्हणजे आता घरं वाढणार
ऑन राज ठाकरे
ज्यांचा भाषण मी पाहिलं नाही त्यावर बोलू शकत नाही हो!
मातृभाषाचा मान राखला गेलाच पाहिजे
आम्हाला लढत राहावं लागला तेंव्हा अभिजात भाषा दर्जा मिळाला
कायदा सुव्यव्यस्था आहे कुठे?
गृहमंत्री आहेत कुठे?
चैत्र नवमी मध्ये आमच्याकडे कोलंबी, मटण नैवेद्य असतो
आता तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादू नका
आमचं मराठमोळ हिंदुत्व आहे
आता आम्हाला काय खायचं? हे सुद्धा तुम्हाला विचारून खायचं का?
पुणे: .....पिंपरी चिंचवड मध्ये शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मावळ लोकसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे हे पुन्हा अजित गटाकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झालीय. शहराला वीस वर्षानंतर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या रुपाने मोठं पद मिळालं. म्हणून त्यांचं अभिनंदन केलं, यापलीकडे त्या उपस्थितीचा अर्थ काढणं चुकीचं राहील. सध्या माझा तसा काही विचार नसल्याचे वाघेरेंनी म्हंटलंय.
ब्रेकिंग
महाराष्ट्र उभारणीच्या लढ्यात शहीद झालेल्या तसेच ६५ वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या हयात व्यक्तीना किंवा त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मानित करणार
शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांना कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात येणार
पक्षाकडून यंदा राज्यातील विविध जिल्ह्यातून शोभा यात्रा काढण्यात येणार असून या यात्रा आप आपल्या जिल्ह्यातील मंगल कलश माती सोबत घेऊन कराडला यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर जातील आणि त्यानंतर या सर्व शोभा यात्रा मुंबईला हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येणार
यंदा पक्षाकडून परळ परिसरात मोठ मैदान बुक करण्यात आलं असून याठिकाणी ३ दिवस खाद्य महोत्सव, क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव राबविण्यात येणार
पक्षाकडून सध्या स्थानिक, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर बैठकांच सत्र सुरू
प्रशांत कोरटकर सुनावणी
असीम सरोदे, फिर्यादीचे वकील
सूर्या दिला धमकी देताना हे आमचं सरकार आहे लक्षात घ्या अशी धमकी दिली आहे
त्यामुळे जामीन मंजूर झाला तर आरोपी काहीही करू शकतो
आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे
हे देखील कोर्टाने लक्षात घ्यायला हवं
आम्ही नेहमी सांगत आहे सावंत यांचा कोणता व्हिडिओ आरोपी यांनी पाहिला ज्याच्यामुळे त्याचा राग अनावर झाला
पण त्याबाबत आरोपी किंवा त्याचे उत्तर देत नाहीत
सुरुवातीच्या काळात कोर्टाकडे जी कागदपत्र सादर केली त्यामध्ये वेगवेगळ्या सह्या आढळून येतात त्यामुळे आरोपीने कोर्टाचे देखील फसवणूक केली आहे
त्यामुळे केवळ लावलेली कलमं आणि त्याला असलेली शिक्षा यावर चर्चा करून जामीन मंजूर करू नये
ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याबद्दल इंद्रजीत सावंत यांच्यावर आरोपीच्या वकिलांनी आरोप केले आहेत त्याबद्दल देखील माफी मागितली पाहिजे
धुळे : एकीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून अनेक नवीन योजना तयार करण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे अनेक खाजगी शाळांमध्ये दरवर्षी फी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि याच फी मुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षा वेळीस नाहक त्रास करावा लागतो. धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे काही विद्यार्थ्यांच्या फी बाकी असल्यामुळे त्यांना ऐन परीक्षा वेळेस शाळा प्रशासनाने परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या पालकांचे पगार हे पुढील काही दिवसात होणार असल्याने फी भरली न गेल्याने ऐन परीक्षेच्या वेळी फी च्या कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याने पालकांनी याबाबत रोष व्यक्त केला आहे... तसेच शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, ज्यावेळेस तुम्ही फी भराल त्यावेळेस तुमची परीक्षा घेण्यात येईल असा अजब फतवा शाळा प्रशासनाने काढला आहे.
उल्हासनगरमध्ये खिडकीच्या ग्रीलमध्ये बसलेली दोन लहान मुलं ग्रील तुटल्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलं जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गांधी रोडवर हरे कृष्णा इमारत असून त्यातील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटच्या ग्रीलमध्ये सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी असे दोन लहानगे बसलेले होते. याच वेळी ग्रील तुटून खाली कोसळली. सुदैवाने बिल्डिंगच्या कंपाउंडला असलेल्या पत्र्यांवर ही ग्रील कोसळल्याने मुलांचा जीव वाचला. मात्र त्यापैकी सात वर्षीय मुलाचे दात पडले असून डोक्यालाही इजा झाली आहे. तर मुलीलाही किरकोळ इजा झाली आहे. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नांदेड : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. पाणी कमी लागत असल्याने शेतकऱ्यांचा उन्हाळी ज्वारी पेरणीकडे कल वाढला आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक भागात उन्हाळी ज्वारी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोन या गावाच्या एका तरुण शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेती पैकी एका एकर शेतीमध्ये हिरव्या मिर्चीची लागवड केलीय. देवाजी भिसे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या ही मिर्ची तोडणीला आलीय. एका एकर मध्ये मिर्ची लागवडीसाठी भिसे यांना केवळ 55 हजार रुपये खर्च आला. 55 हजार रुपये खर्च वगळता अडीच लाखांचे उत्पन्न भिसे यांना मिळाले आहे. मिर्ची तोडणी सुरु असून अजून या मिर्चीतून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्याला आहे.
नाशिक जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा नाही
कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय होऊन ही पूर्णपणे अंमलबजावणी नाही
22 मार्च 2025 रोजी कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा केंद्र सरकारने घेतला होता निर्णय
1 एप्रिल पासून निर्यात शुल्क रद्द करण्याचा घेतला होता निर्णय
परिपत्रक काढून आठ दिवस उलटले तरीही सिस्टीम मध्ये नोटिफिकेशन नुसार अपडेट न झाल्याने शेतकरी व्यापारी संभ्रमात
नोटिफिकेशन अपलोड न झाल्याने कांद्याचा माल jnpt वर दोन तीन दिवसांपासून थांबला
निर्यात शुल्क आज पासून रद्द होईल या अपेक्षेने व्यापाऱ्यांनी पाठवला होता माल
मात्र आठ दिवसांपूर्वी घोषणा होऊन देखील निर्यात शुक्ल रद्द केल्याचे नोटिफिकेशन अपलोड न झाल्याने अडचणी
पुण्यात इंग्रजी वाहतूक नियम पाट्या
वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या पाट्यांमुळे मनसे आक्रमक
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर लावण्यात आले आहेत इंग्रजी पाट्या
"भारतात आहोत की इंग्लंडमध्ये"? असा प्रश्न वाहतूक पोलिसांना मनसेकडून विचारण्यात येत आहे
पुण्यातील नुमवि शाळा परिसरात लक्ष्मी रोडवर लावण्यात आले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी पाट्या
इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात
ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांची बँकेवर धडक
बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य मनसेची मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठी नव वर्षाच्या गुढीपाडवा निमित्त बँकेतील व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत असे सांगितल्यावर मनसे अलर्ट मोड मध्ये....
बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा... असा कानमंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दिला होता...
यंदाचा मार्च महिना पुणेकरांसाठी ठरला अधिक तापदायक
महिनाभर तापमान सरासरीपेक्षा जास्तच
वातावरणातील प्रतिकूल घडामोडीमुळे मार्च महिना यंदा अधिक तापदायी ठरला आहे.
संपूर्ण महिना कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदविण्यात आले आहे
शिवाजीनगर केंद्रावर कमाल तापमान 40 आकडा ओलांडला नसला तरी दोन दिवस 39 अंशाच्या पुढे तर पंधरा दिवस हा पारा 38°c च्या पुढे होता.
महिनाभर सरासरी दोन अंशाने तापमान वाढले.
Buldhana News : संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात प्रकाश पिंजरकर नावाच्या इसमाचे त्याच्या पत्नीशी भांडण झाल्याने जवळपास पंधरा वर्षांपूर्वी पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे अनेकदा त्याने पोलिसात निवेदनही दिलेत. मात्र आज सकाळी प्रकाश पिंजरकर यांनी चक्क शेगाव वानखेडे या बसच्या मागच्या काचा फोडल्या व पोलीस प्रशासनाने माझी पत्नी आणून द्यावी अशी मागणी केली सध्या ही बस वानखेड गावात थांबली असून अद्याप पोलीस पोचलेले नाहीत.
Beed: अभिनेता सयाजी शिंदे आज बीड दौ-यावर आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत. संतोष देशमुख यांना पर्यावरणाच्या कामासंदर्भात सयाजी शिंदे यांनी पुरस्कार दिला होता. त्यानंतर आमदार सुरेश धस यांची ही सयाजी शिंदे भेट घेणार आहेत. सुरेश धस आपल्या मतदारसंघात देवराई तयार करणार आहेत. या संदर्भात ही भेट असणार आहे.
मेट्रो जवळ पार्किंगसाठी महापालिकेचे मॅपिंग; पार्किंग समस्या सोडवण्यासाठी महापालिकेकडून उपाय
पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ; दिवसाला 30000 पेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास
महा मेट्रो कडून वनाचे चांदणे चौक या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम लवकर सुरू होणार; संपूर्ण कामाचा आराखडा महा मेट्रो कडून महापालिकेस सादर
पुण्यातली घरे महागणार; रेडी रेकनर मध्ये पुण्यात 4.16 तर पिंपरी चिंचवड मध्ये 6.69 टक्के वाढ
टू-व्हीलर वापरण्याच्या कारणावरुन मोठ्या भावाने लोखंडी पावडे डोक्यावर मारुन लहान भाऊ दिनेश शिरपुले याची हत्या केली होती. ही घटना यवतमाळच्या शेंबाळपिंप्री येथे घडली होती. तेव्हा पासून आरोपी मोठा भाऊ मनीष शिरपुले हा फरार होता. दरम्यान खंडाळा पोलीस हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे आरोपीना पकडण्यासाठी गेले असता आरोपी मनिष शिरपुले याने झाडाला फाशी घेवून आत्महत्या केल्याची घटना विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या कळमनुरी येथे उघडकीस आली. आरोपी मनिषने घेतलेली दुचाकी दुरुस्त करुन लहान भाऊ दिनेश शिरपुले हा वापरत होता. या दुचाकीवरुन त्याच्यात पैशाचा नेहमीच वाद होत होता. या प्रकरणी पुढील तपास खंडाळा पोलीस ठाणे करीत आहे.
Nashik : महापालिकेने शहरातील धोकादायक घरांना नोटिसा देत विभागीय कार्यालयांकडून दरवर्षी प्रमाणे धोकेदायक घरे, इमारतींच्या मालकांना पावसाळ्याच्या तोंडावर नोटिसा दिल्या जातात.मात्र यंदा पालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन दोन महिने आधीच धोकेदायक तब्बल 1 हजार 192 वाडे, घरांना नोटिसा पाठवण्यास सुरवात केली आहे. शहरातील नाशिकरोड, सातपूर, पंचवटी, सिडको, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम विभागातील धोकेदायक घरे, इमारतींची पाहणी करून त्यांचे मालक आणि भाडेकरू यांना घरे खाली करून घेणेबाबत रीतसर नोटिसा बजावल्या आहेत.मात्र पालिकेच्या नोटिशीला ज्या धोकादायक घरांचे मालक, भाडेकरू सहकार्य करण्यास टाळाटाळ करतील अशा घरमालक, भाडेकरूंवर रीतसर कारवाई केली जाणार अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. मात्र धोकादायक इमारतींमध्ये आजही नागरिक राहत असल्याचे चित्र जुने नाशिक परिसरात दिसून येत आहे.
Beed: बीडच्या मसाजोग गावात मुस्लिम बांधवांनी यंदा रमजान ईद साजरी केली नाही. तर गावातील संपूर्ण मुस्लिम समाज बांधव ईदच्या दिवशी देशमुख कुटुंबियांच्या भेटीला होता. देशभरात रमजान ईदचा उत्साह असताना मसाजोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे देशमुख कुटुंबीय दुःखात आहे. त्यामुळे रमजान ईद साजरी न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता. यावेळी काही मुस्लिम बांधवांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली. यावेळी देशमुखांना अश्रू अनावर झाले.
सोमवारी मुस्लिम समाज बांधवांनी रमजानची ईदची नमाज अदा केली. 200 हून अधिक लोकसंख्या असलेल्या मुस्लिम बांधवांच्या 20 ते 25 कुटुंबात रमजान ईद निमित्त शीरखुर्मा किंवा इतर कोणतेही गोड पदार्थ बनविण्यात आले नव्हते.
जळगाव जिल्ह्यातील धानवड शिवारात सोमवारी रात्री वीज पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून मुलाचे आजोबा हे गंभीर जखमी झाले आहेत अंकुश राठोड असे मृत्यू झालेल्या 15 वर्षीय मुलाचे नाव असून आजोबा शिवाजी राठोड हे गंभीर भाजल्या गेल्याने जखमी झाले आहेत. अंकुश राठोड हा आजोबांसोबत शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला असता विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला व याचवेळी वीज पडल्याने अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला असून आजोबा शिवाजी राठोड हे गंभीर जखमी झाले आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नातवासह आजोबांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून मुलाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले . तर आजोबांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यात ठिकठिकाणी अवकाळीच्या सरी, काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान, बळीराजा चिंतेत, आज आणि उद्या कोकणासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्यात आता घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महागणार, रेडी रेकनरच्या दरात सरासरी ४. ३९ टक्क्यांनी वाढ, आजपासून अंमलबजावणी
संतोष देशमुखांना अनैतिक संबंधाच्या प्रकरणात गोवण्यासाठी उभ्या केलेल्या महिलेची हत्या, अंजली दमानियांचा दावा, पोलीस प्रकरण दडपत असल्याचाही आरोप
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा क्लिकवर...