Maharashtra News Updates 13 December 2022 : सदानंद दाते यांची बदली, विश्वास नांगरे पाटलांना बढती, रितेश कुमार पुण्याचे तर मिलिंद भारंबे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पोलीस भरतीसाठी 2021 च्या संकेतस्थळावर तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करुन दिल्यानंतर पहिल्याच दिवशी सुमारे 10 तृतीयपंथीने फॉर्म भरले आहे. 10 तृतीयपंथी पैकी 8 जणांनी पोलीस शिपाई पदासाठी तर इतरांनी पोलीस शिपाई ड्रायव्हरसाठी फॉर्म भरले आहेत, अशी माहिती पोलीस विभाघातील सूत्रांनी दिली.
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सदानंद दाते यांची बदली झाली आहे, तर विश्वास नांगरे पाटील यांना बढती देण्यात आली आहे. सदानंद दाते आता दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक तर विश्वास नांगरे पाटील आता लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक असतील. तर रितेश कुमार पुण्याचे तर मिलिंद भारंबे आता नवी मुंबईचे पोलिस आयुक्त असतील.
मुख्यमंत्र्यांसोबतची आजची बैठक ही इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्यासंबंधित होती, त्यामध्ये कोणताही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आज एक बैठक झाली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा एक व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झालाय. या व्हिडीओवरून वारकरी संघटना अंधारेंविरोधात आक्रमक झाल्या आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केलीय. राज्यातील वारकऱ्यांना शपथ देऊन सुषमा अंधारे ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ देण्यात येईल असं सांगण्यात आलंय.
अमरावती जिल्ह्यातील जवळा शहापूर येथे लक्ष्य प्रतिष्ठानकडून महिलांसाठी माहेरवासिनी मेळावा पार पडला. यावेळी 500 च्यावर महिलांना साडी-चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी माजी राज्यसभा खासदार पदमश्री डॉ. विकास महात्मे, सुरेखा ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील जवळा शहापूर येथे श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सव सप्ताह आयोजित करण्यात आला. यनिमित्ताने श्रीमद भागवत कथेसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. लक्ष्य प्रतिष्ठान अमरावती आणि महात्मे आय बँक नागपूर यांच्यातर्फे नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सुद्धा यावेळी घेण्यात आले.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील वसमत तालुका आणि परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा, ज्वारी आणि तूर या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झालाय. या अवकाळी पावसामुळे शेतातील रब्बीची हरभरा, गहू, तूर, पेरू, बोरे, सीताफळळाच्या बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसलाय.
परभणी शहरासह परिसरात आज अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. दुपारी जवळपास अर्धा तास पाऊस बरसलाय. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. तर या पावसामुळे तूर, कापूस फळपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अमरावतीत अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. परंतु, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तूर पिकाला फटला बसण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून विरेंद्र सराफ यांची वर्णी लागण्याची शक्यता.
आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर.
येत्या दोन दिवसांत विरेंद्र सराफ यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता.
Mumbai News: माहिम-वांद्रे रेक्लमेशन खाडीलगतच्या भागात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Nagpur News: विदर्भासह राज्यातून सध्या थंडी गायब झाली असली. तरी येणाऱ्या तीन चार दिवसात विदर्भासह सर्वत्र थंडी वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्यापासून विदर्भासह अनेक ठिकाणी किमान तापमान लक्षणीय रित्या कमी होईल. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला चक्रवात आता तामिळनाडू आणि कर्नाटक ओलांडून कमकुवत होऊन अरबी समुद्रात स्थिरावला आहे. दिवसा गणित त्याची ताकद आणखी कमी होत असून येणाऱ्या काही दिवसात हा चक्रवात आणखी कमकुवत होईल. तेव्हा पुन्हा एकदा वाऱ्यांची दिशा बदलेल आणि उत्तरेकडून थंड व कोरडे वारे दक्षिणेकडे वाहायला लागतील. वाऱ्यांची दिशा बदलताच थंडी तीव्रतेने वाढत जाईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या विदर्भासह महाराष्ट्रात सर्वत्र किमान तापमान सामान्य पेक्षा पाच ते सात अंश जास्त आहे. मात्र पुढील तीन चार दिवसात किमान तापमान सामान्य पातळीवर पोहोचून थंडी तीव्रतेने वाढत जाईल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Solapur News: अक्कलकोटच्या स्वामी समर्थ भक्तांना सायबर गुन्हेगारांनी घातला गंडा
भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली मुंबई पुण्याच्या स्वामी भक्तांकडून उकळले जात आहेत पैसे
ऑनलाइन संकेतस्थळावर खोटी माहिती आणि फोन नंबर देऊन अनेक स्वामी भक्तांकडून पैसे लुटल्याची माहिती
देवस्थान समितीतर्फे अक्कलकोट पोलीस आणि सायबर पोलिसांना तक्रार
'वटवृक्ष स्वामी महाराज भक्त निवासचे कोणतेही बुकिंग ऑनलाईन स्वीकारले जात नसून, भक्तांनी सावधगिरी बाळगावी'
मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे स्वामी भक्तांना आवाहन
Umar Khalid: दिल्ली सत्र न्यायालयाकडून उमर खालीद याला सात दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. बहिणीच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यास परवानगी कोर्टाने दिली आहे. मात्र, या दरम्यान उमर खालिद हा सोशल मीडियाचा वापर करू शकणार नाही. त्याशिवाय, माध्यमांशी संवाद साधणे, मुलाखत देणे यासाठीही कोर्टाने मनाई केली आहे. उमर खालिदला 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्ली दंगलीतील सहभागाबाबत उमरला अटक करण्यात आली आहे.
Beed Crime: बीडच्या गेवराई तालुक्यातील निमगाव मायंबा येथील एका महिलेच्या अंगातील भूत काढण्यासाठी एका भोंदूबाबाने तिला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे आणि याप्रकरणी दीक्षा कल्याण कातकडे या महिलेच्या तक्रारीवरून पती आणि सासू विरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Maharashtra Winter Session : नागपुरात होणाऱ्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दहा दिवसांचा असेल. 19 ते 29 डिसेंबरपर्यंत विधीमंडळाचं कामकाज चालणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, आता 10 जानेवारीला सुनावनी, सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची ठाकरे गटाची मागणी
Maharashtra News: महाराष्ट्राच्या अखंडतेबाबत आणि मराठी भाषीक सीमावासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा असल्याचा ठराव अधिवेशनात घेण्याची मागणी
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याकडे पत्र लिहून मागणी
त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होऊन असा ठराव मांडण्याची करणार मागणी
Jalgaon News: राज्यपाल व भाजप नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात आज लोक संघर्ष मोर्चा, उद्धाव ठाकरे गट आणि विविध सामाजिक संस्था तर्फे आंदोलन आयोजित करण्यात येणार होते मात्र आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्यपालांच्यासह भाजपा नेत्यांनी केलेल्या अक्षेपहऱ्या वक्तव्य विरोधात केल्याच्या विरोधात आज लोक संघर्ष मोर्चा सह विविध सामाजिक संघटना चे वतीने आज जळगाव शहरा लगत मुंबई नागपूर हायवे गिरणा नदी पुलावर रस्ता रोको आंदोलन नियोजित करण्यात आले होते
Nanded News: हदगाव तालुक्यातील केदरगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील चौथ्या वर्गातील विद्यार्थिनीने शाळेच्या वसतिगृहाच आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. तिच्या रूममध्ये उंच पलंगाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ती मृतावस्थेत आढळलीय.
Sanjay Raut: देशाच्या सीमा असुरक्षित, संसदेत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करणाlर; संजय राऊत यांचा हल्लाबोल
Pune Breaking News: बघतोय रिक्षावाला संघटनेच्या अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक
काल झालेल्या रिक्षा आंदोलना वेळी चक्काजाम केल्याप्रकरणी अटक
काल संध्याकाळी रिक्षा चालकांनी आर टी ओ चौकात रिक्षा रस्त्यात लावल्या होत्या
रात्री उशिरा पोलिसांनी येऊन त्या बाजूला केल्या
यावेळी 30-40 रिक्षा चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते
Ratnagiri News : रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील नागरिकांचे रखडलेले पुनर्वसन आता लवकरच मागणी मार्गी लागणार आहे. या ग्रामस्थांच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सामाजिक बांधिलकी निधी (सीएसआर) 3 कोटी 50 लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून खर्च करण्यात येणार आहे
Jalna News: यंदा ग्रामपंचायत निवडणुका भल्या भल्या नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहेत असच दिसतय,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच जन्मगाव असलेल्या जवखेडा खुर्द गावात 30 वर्षानंतर ग्रामपंचायतीचा धुराळा उडतोय. गेली 30 वर्ष बिनविरोध होणाऱ्या या ग्रामपंचायतींमध्ये आज मात्र सरपंच पदासाठी आणि दोन सदस्यांसाठी निवडणूक लागलीय. 7 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये 4 सदस्य बिनविरोध निवडले असून यावेळी मात्र सरपंच पदासाठी आणि दोन सदस्यासाठी निवडणूक पाहायला मिळणार आहे. त्या त्यामुळे बिनविरोध करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची मध्यस्थी देखील कामाला आली नाही असंच चित्र गावात पाहायला मिळतंय.
Konkan District: सातत्यानं होत असलेल्या वातावरण बदलामुळे कोकणातल्या हापूस आंबा उत्पादनावर परिणाम होताना दिसून येतोय. लांबलेला पाऊस, गायब झालेली थंडी आणि अवकाळी पाऊस यांमुळे हापूस आंब्याची फळ प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. परिणामी लाखो हेक्टरवर असलेले आंबा पीक धोक्यात आले असून शेतकरी दिवसेंदिवस चिंतेत जात आहे. या साऱ्याचा परिणाम आर्थिक उलाढालींवर देखील होताना दिसत आहे.
Shirdi News Updates: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यातील साकुरी ग्रामपंचायतीमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी विखेंना धक्का देत सत्ता मिळवली. 17 पैकी 15 जागांवर विजयही मिळवला होता. मात्र यावेळी थोरात गटाला उमेदवारच भेटत नसल्यानं निवडणुकी पासून दूर राहण्याची वेळ आलीय यावर्षी दोन्ही पॅनल विखे गटाचे असून जनसेवा विरुद्ध लोकसेवा मंडळ अशी निवडणूक होणार आहे. दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील 14 गावात विखेविरुद्ध थोरात गटात निवडणूक रंगणार असल्यानं कोण बाजी मारणार याकडं जिल्ह्याच लक्ष लागलंय.
Tiware Dam: चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील नागरिकांचे रखडलेले पुनर्वसन आता लवकरच मागणी मार्गे लागणार आहे.या ग्रामस्थांच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सामाजिक बांधिलकी निधी (सीएसआर) 3 कोटी 50 लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून खर्च करण्यात येणार आहे.
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव हे सगळ्यात अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखलं जायचं. राजकीय वैमन्यस्यातून अनेक गुन्हेगारी घटना घडल्या होत्या. पण आता तेच पाचगाव शांततेचं गाव म्हणून ओळखलं जावू लागलं आहे. याच गावाच्या निवडणुकीवरुन सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाचगावची सत्ता ज्यांच्याकडे त्याचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व हे गणित असते.
Nandurbar News : नंदुरबारमधील खांडबारा विसरवाडी दरम्यान वडदा गावाजवळ भीषण अपघात झाला. रात्रीच्या अंधारात गुरे घेऊन जाणारे पिकअप वाहन आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहे. शिवाय या अपघातात पाच ते सहा गायींचा देखील मृत्यू झाला आहे. मात्र या अपघातामुळे बेकायदेशीर गोवंश तस्करी उघड झाली आहे.
Mumbai Burning Truck : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री 1:30 च्या सुमारास अंधेरी गुंदवली बस स्टॉपजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकमध्ये मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन एका तासात आगीवर नियंत्रण मिळवलं. कॉस्मेटिक्सचं सामान, चप्पल, बुटं, साड्या, मेकअपच्या साहित्याने भरलेला ट्रक मुंबईहून गुजरातच्या दिशेने मध्यरात्री निघाला होता. मात्र रात्री अंधेरी गुंदावली बस स्टॉपजवळ ट्रॅकमध्ये अचानक मोठी आग लागली. आगीत संपूर्ण ट्रक आणि समान जळून खाक झालं. सुदैवाने या आगीमध्ये ट्रक चालक सुखरुप बचावला आहे. परंतु ट्रकमध्ये आग कशामुळे लागली या संदर्भात अग्निशमन दल आणि अंधेरी पोलीस गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहे.
Nagpur Metro Updates: नागपूर मेट्रोची प्रवासी संख्या पहिल्यांदाच एक लाखांच्यावर... काल सुमारे एक लाख दहा हजार लोकांनी केला मेट्रो ने प्रवास.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेज 1 च्या कामठी रोड आणि सेंट्रल एवेन्यू या दोन नव्या मार्गाचा लोकार्पण केला होता. त्यानंतर आजवर सरासरी 80 हजार पर्यंत असलेली प्रवासी संख्या 1 लाख 10 हजार पर्यंत पोहोचली.
यापूर्वी 15 ऑगस्ट 2022 रोजी मेट्रोची सर्वाधिक प्रवासी संख्या 91 हजार होती.
Vasai News: वसईतील भूईगांव बिच स्वच्छ करताना हंगेरी देशातील राहणा-या दोघा विदेशी नागरीकांना एका बॅगेत 57 हजारांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. त्या त्यांनी तात्काळ वसईच्या भूईगांव पोलीस चौकीत जमा केल्या आहेत.
Twitter Gold Tick: ट्विटरने बिझनेस ब्रँड्ससाठी गोल्ड व्हेरिफिकेशन चेकमार्क लॉन्च केले आहे. सोमवारपासून (12 डिसेंबर) ब्रँड प्रोफाइलला नवीन टिक मार्क देण्यात आले आहेत. ट्विटरचे पेड-फॉर व्हेरिफिकेशन फीचर सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात ते थांबवण्यात आले होते. याची किंमत अजूनही महिन्याला 8 डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु आता Apple डिव्हाइसवर Twitter अॅप वापरणाऱ्यांसाठी 11 डॉलर्स सबस्क्रिप्शन चार्ज घेण्यात येणार आहे.
Pune Bandh: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक दिली आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. शिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंदची हाक दिलीय. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या विविध घडामोडीवर आमचं लक्ष असणार आहेत, याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ....
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी घटनापीठासमोर दुसऱ्या क्रमांकावर आहे. निर्देशांसाठी हे प्रकरण आहे. आज सत्ता संघर्षाच्या प्रकरणात घटनापीठासमोर मुख्य युक्तिवादांची तारीख आज ठरण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्ट काही आदेश देतं का याची उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचे प्रकरण क्रमांक 36 वर आहे.
नवाब मलिकांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी आहे. मलिकांच्या वैद्यकीय प्रकृतीचा दाखल देत वकिलांकडून तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करण्यात आली आहे. हायकोर्टानं सुनावणीची विनंती मान्य केली असून आज ही सुनावणी होईल.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक
आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक सीमावादा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुणे बंदची हाक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंदची हाक दिलीय.
आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात होणार
मुंबईसह देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या जी- 20 परिषेदेसाठी राज्य सरकारने तयारीचा वेग वाढविला आहे. या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून त्यातील आठ बैठका या मुंबईत पार पडणार आहेत. त्याशिवाय पुण्यात 4 तर नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. आजपासून 16 तारखेपर्यंत मुंबईतील बिकेसी सेंटर येथे या बैठकीला सुरुवात होणार आहे.
तृतीयपंथीयांना ऑनलाइन साइटवर आजपासून पर्याय उपलब्ध
आता तृतीयपंथीयांना देखील पोलिस आणि पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म भरतील येईल. आजपासून म्हणजेच 13 डिसेंबरपासून ऑनलाइन साइटवर पर्याय उपलब्ध असणार आहे.
बिल्कीस बानोच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
बिल्कीस बानोच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. बिल्कीस बानो रेप केस प्रकरणी दोषी आरोपींची शिक्षा माफ करण्यात आली होती. याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होईल.
जळगावात रास्ता रोको
महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्यांविरोधात शाहू, फुले आणि आंबेडकरी संघटनांच्या वतीने मुंबई नागपूर हायवेवर रास्ता रोको करण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -