Maharashtra Live Updates: ओडिशातील अपघाताची घटना दुर्दैवी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ओडिशातील बालासोर या ठिकाणी झालेल्या अपघातावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ओडिशा प्रकरणाची चौकशी व्हावी, जे गुन्हेगार असतील, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
ओडिशातील बालासोर या ठिकाणी झालेल्या अपघातावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अपघाताची घटना दुर्दैवी असून हा आघात सहन करण्यासाठी ईश्वराने त्यांच्या आप्तस्वकीयांस बळ द्यावे व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना अशी श्रद्धांजली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.
जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपानंतर आता डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केला आहे. या ठिकाणी तात्काळ नवी नियुक्ती करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत.
Odisha Railway Accident: ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटनास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले असून घटनास्थळाची पाहणी करत आहेत. तसेच पंतप्रधान कटकच्या रुग्णालयात जाऊन जखमींची भेट देखील घेणार आहेत.
Odisha Railway Accident: ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये आणि गंभीर जखमींना दोन लाखांची मदत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. अपघातातील किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Nashik News: नाशिक महानगर पालिका आयुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांची आता साखर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा आयुक्त पदाचा पदभार अन्य सहकारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता मनपा आयुक्त पदी कुणाची नियुक्ती होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
समीर वानखेडेंचं कथित खंडणी प्रकरण
या प्रकरणातील आरोपी सॅम डिसोझाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 6 जूनला होणार सुनावणी
या प्रकरणातील आर्यनला सोडण्यासाठी शाहरूख खानकडे खंडणी मागितल्या प्रकरणात CBI नं दाखल केलाय गुन्हा
तत्कालीन NCB विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह सॅम डिसूजा आहे आरोपी
सॅम डिसूजाला CBI नं बजावलंय चौकशीसाठी समन्स
हायकोर्टानं यापूर्वीच सॅमला अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत रितसर अटकपूर्व जामीन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत
Wrestlers Protest News: कुस्तीपटू गंगा नदीत आपली सर्व पदकं विसर्जित करण्यासाठी हरिद्वार येथे पोहोचले आहेत. पदक गंगेत विसर्जित केल्यावर कुस्तीपटू इंडिया गेटवर उपोषण करणार आहेत.
Thackeray Group-Sambhaji Brigade Meeting : शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी बिग्रेड पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनवर बैठक सुरु आहे. या बैठकीला ठाकरे गटाकडून सुभाष देसाई उपस्थित राहिले आहेत. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड मोठी सभा घेणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी आज बैठक बोलवली आहे.
Thackeray Group-Sambhaji Brigade Meeting : शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी बिग्रेड पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनवर बैठक सुरु आहे. या बैठकीला ठाकरे गटाकडून सुभाष देसाई उपस्थित राहिले आहेत. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड मोठी सभा घेणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी आज बैठक बोलवली आहे.
Ahmednagar News : अहिल्यादेवी होळकर जयंती उद्या साजरी होत आहे. या जयंती निमित्ताने रोहित पवार आणि राम शिंदे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. उद्या शासकीय पद्धतीने जयंती साजरी होत असली तरी त्याआधी आमदार रोहित पवार यांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. चौंडी आणि परिसरात रोहित पवार यांनी होर्डिंग लावून भाविकांचे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे स्वागत केले आहे. उद्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. परंतु अहमदनगरच्या नामांतराची घोषणा उद्याच करावी, अशी मागणी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी केली आहे.
Ahmednagar News : उद्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या चौंडी येथे शासकीय जयंतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तत्पूर्वी आज मध्यरात्रीच कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे चौंडीत अभिषेक आणि महापूजा करणार आहेत. त्या अनुषंगाने चौंडीत मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक चौकात बॅनर दिसत आहेत.
Adipurush : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या तिच्या आगामी 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा सिनेमातील लूक आऊट करण्यात आला असून तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आता सिनेमाच्या रिलीजआधी अभिनेत्री नाशकात दाखल झाली आहे. तिने नाशिकमधील प्राचीन सीता गुफा आणि काळाराम मंदिरात जाऊन सीतामातेचं दर्शन घेतलं आहे. सीता गुंफा आणि काळाराम मंदिरातील कृतीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ती 'राम सिया राम' म्हणत आरती करताना दिसत आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये काल रात्री उशिरा झालेल्या खुनाच्या घटनेतील संशयितांना उपनगर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. जेलरोड परिसरात काल रात्री तरुणाचा निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेत संशयित घटनास्थळावरून त्र्यंबकेश्वरकडे फरार झाले होते. त्यानंतर ते आडगावपरिसरात आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तुषार सिद्धार्थ पवार आणि एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. रात्रीच्या पार्टीत वाद होऊन प्रवीण दिवेकर याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. अखेर या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
Nashik News : नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड गावात सध्या आगळ्यावेगळ्या चोरीची चर्चा सुरु आहे. चोरट्यांनी पैसे, सोने चांदीचे दागिने लक्ष्य न करता गावाला वीजपुरवठा करणारे 200 केव्हींचे रोहित्रच लंपास केले आहे. रोहित्र चोरी गेल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले असून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा परिणाम गावाच्या पाणी पुरवठ्यावर देखील झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करुन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. धक्कादायक म्हणजे राहुड गावातून विजेचे रोहित्र चोरी होण्याची ही चौथी घटना असून या अगोदर तीन वेळा रोहित्र चोरीला गेले आहे. अद्यापही त्यांचा तपास लागलेला नाही
Pune News: पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज 144वी कोर्सची पासिंग आउट परेडला सुरुवात
पुण्यातील खडकवासलामध्ये आज खेत्रपाल मैदानात या परेडचं आयोजन करण्यात आले आहे
पदवीदान सोहळ्यासाठी चीफ ऑफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल अनिल चौहान यांची मुख्य उपस्थिती
दीक्षांत संचलन सोहळ्यात सुपर डीमोना या विमानाच्या अवकाशात विविध कसरती
7 मित्र देशांमधील 19 कॅडेटचा या परेड मध्ये समावेश
Buldhana News: खामगाव शहरा जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांचा धुमाकूळ.
राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहनांवर केली तुफान दगडफेक.
दगडफेकीत खाजगी लक्झरी बस , कार , ट्रक अशा 8 ते 10 वाहनांच नुकसान.
बराच वेळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक दहशतीमुळे थांबली.
पोलीस घटनास्थळी आल्यावर वाहतूक सुरळीत.
दगडफेक कुणी केली? का केली? याचा तपास खामगाव पोलीस करत आहेत.
मात्र राष्ट्रीय महामार्गावर वाहन धारकांमध्ये दहशत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -