Maharashtra Live Updates : मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करणार, तोपर्यंत समाजाला सर्व सोई कायम ठेवणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Apr 2023 05:05 PM
Karnataka Election: राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात 9 जागांवर निवडणूक लढवणार

Karnataka Election: राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात 9 जागांवर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत घड्याळ हे चिन्ह मिळाले आहे. 

Maratha Reservation : मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करणार, तोपर्यंत समाजाला सर्व सोई कायम ठेवणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेत ते करणार. पूर्वी आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. तोपर्यंत मराठा समाजाला इतर सर्व समाजांना ज्या सोई मिळतात त्या दिल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

Ratnagiri : एबीपी माझाच्या बातमीची रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने घेतली दखल

Ratnagiri : रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीमधून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची बाब एबीपी माझाने समोर आणली होती. त्यानंतर आता रत्नागिरी नगरपरिषद  प्रशासनानं याबाबतची पावलं उचलायला सुरुवात केली आहेत. जोवर पाणी गळतीचं काम थांबत नाही तोवर उर्वरित बिलाची रक्कम अदा केली जाणार नाही अशी नोटीस नगरपरिषद प्रशासनाने संबंधित कंत्राटदराला काढली आहे. वर्षभरापूर्वी बांधकाम केलेल्या टाकीच्या बांधकामाची रक्कम 28 लाख इतकी आहे. कंत्राटदाराला आत्तापर्यंत अठरा लाख रुपये बिल अदा करण्यात आला आहे. तर दहा लाख रुपयाचं बिल अद्यापही बाकी आहे. जोपर्यंत टाकीची गळती थांबत नाही. तोवर  शिल्लक दहा लाख रुपयांचा बिल कंत्राटदाराला दिले जाणार नाही. सोमवारपासून या ठिकाणी कामकाजाला सुरुवात होणार आहे.


 

Chh. Sambhajinagar Election: संभाजीनगर जिह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात 378 उमेदवार

राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 28 एप्रिलला निवडणूक होत आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखील सात बाजार समित्यांसाठी निवडणुका पार पाडणार आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह फुलंब्री, पैठण, लासूर स्टेशन, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड अशा एकूण सात बाजार समित्यांसाठी येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक  इच्छुकांनी  निवडणुकीतून माघार घेतली. तर या  सातही बाजार समितीत आता 378 उमेदवार रिंगणात उरले आहे. ज्यात सर्वाधिक 86 उमेदवार कन्नड बाजार समितीत आपले नशीब आजमावत आहेत. तर सर्वांत कमी 38 उमेदवार पैठणमध्ये रिंगणात आहेत. सोबतच फुलंब्री 42, लासूरस्टेशन 58, वैजापूर 56, छत्रपती संभाजीनगर 47, आणि गंगापूर बाजार समितीमध्ये 51 उमेदवार रिंगणात आहेत.


 

Pune: पुणे: जो पक्ष पाणी देईल त्याला मतदान करणार अन्यथा मतदानावर बहिष्कार, पुरंदरमधील नायगावमधील ग्रामस्थांची भूमिका

Pune News:  सध्या बाजार समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करताना दिसतो आहे. परंतु जो पक्ष जनाई शिरसाईचे पाणी गावाला देईल त्या पक्षाला मतदान करणार असल्याची भूमिका पुरंदर तालुक्यातील नायगावच्या मतदारांनी घेतली आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्या अभावी पिके जळून चालली आहेत. जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी सध्या चालू सुरू आहे. परंतु टेलला नायगाव असल्याने त्याचे पाणी नायगावला पोहोचलेलं नाहीये. त्यामुळे जो कोणता पक्ष पाणी मिळवून देईल त्यांनाच नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करू अन्यथा पाणी न मिळाल्यास नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावर बहिष्कार राहील असा निर्धार नायगाव गावकऱ्यांनी केला आहे. नायगाव येथील ग्रामपंचायतचे मतदार, सोसायटीचे मतदार असे एकूण ३५ मतदार निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नायगावकराणी असा पवित्रा घेतल्याने पुरंदर तालुक्यातील नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

Maratha Reservation: नवे आयोग नेमून मराठा समाजाचे विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करणार: शंभूराज देसाई

Maratha Reservation:  नवे आयोग नेमून मराठा समाजाचे विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. 

मराठा आरक्षण पुनर्विचाराची याचिका न्यायमूर्तींनी चेंबरमध्ये फेटाळली, सरकारला संधी मिळाली नाही: शंभूराज देसाई

Maratha Reservation:  मराठा आरक्षण पुनर्विचाराची याचिका न्यायमूर्तींनी चेंबरमध्ये फेटाळली, सरकारला संधी मिळाली नसल्याचे मंत्री आणि उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी म्हटले. 

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरील राज्य सरकारच्या उपसमितीची बैठक संपली

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरील राज्य सरकारच्या उपसमितीची बैठक संपली

राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतील सभेसाठी मैदान नाकारले

Ratnagiri News : राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदान नाकारले


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतल्या सभेच्या ठरलेल्या मैदानावरुन मनसेची कोंडी

 

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे जवाहर मैदान राजकीय सभेंसाठी देत नसल्याचा संस्थेचा दावा

 

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीवर भाजपचे वर्चस्व

 

गेली 10 वर्ष कुठल्याही राजकीय पक्षाला सभेसाठी मैदान दिले नसल्याचा संस्थेचा दावा

 

6 मे रोजी रत्नागिरीत पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा 

 

मैदानाच्या विषयावरुन मनसेची आज रत्नागिरीत बैठक
धुळे जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध मविआ अशीच लढत
Dhule : धुळे जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चारही बाजार समितीच्या 68 जागांसाठी माघारीअंती 156 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 527 उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर दोंडाईचा आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकांची चुरस आता अधिक वाढणार असून काल माघारीच्या शेवटच्या दिवशी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून 252 उमेदवारांनी माघार घेतली यातील दोन जागा बिनविरोध झाले असून एक जागा भाजप आणि एक जागा महाविकास आघाडीला मिळाली आहे. आता उर्वरित 16 जागांसाठी 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती 18 जागांसाठी 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत जय किसान आणि परिवर्तन पॅनलमध्ये लढत होणार आहे. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील दोन जागा बिनविरोध झाल्या असून, या ठिकाणी आमदार जयकुमार रावल आणि माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे. तर शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विविध गटातून 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. या ठिकाणी 18 जागांसाठी 42 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमदार अमरीश पटेल यांच्याविरोधात महाविकास आघाडीने शेतकरी बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अमरीश पाटील यांनी 18 जागांवर 15 नवीन उमेदवार दिले असून उर्वरित तीन उमेदवारांना आमदार अमरीश पटेल हे पाठिंबा देणार आहेत.

 
कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघड्यावर ठेवलेले धान्य पावसामुळं ओले, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान

Nagpur News छ नागपूरमध्ये आलेल्या अवकाळी पावसाने कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघड्यावर ठेवलेले धान्य ओले झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. वारंवार येणाऱ्या अवकाळी पावसानंतर कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचा गलथानपणा परत एकदा पुढे आला आहे. 

वर्धा जिल्ह्यात सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 259 उमेदवार रिंगणात
Wardha News : वर्धा जिल्ह्यात सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 259 उमेदवार रिंगणात आहेत. सात उमेदवारांची बिनविरोध निवड. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक 45 उमेदवार रिंगणात आहेत. 
नवीन राज्य मागासवर्ग आयोग नेमावा : आबा पाटील

मराठा आरक्षणाची फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर इतर कोणतेही प्रयत्न न करता नवीन राज्य मागासवर्ग आयोग नेमावा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक आबा पाटील यांनी केली आहे. कोणतीही क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करु नये यामध्ये पुन्हा वेळ काढूपणाचे धोरण अवलंबू नये असेही पाटील म्हणाले. पिटीशन  दाखल करून 8-9 महिने वेळ वाया गेला आता पुन्हा एक वर्ष वाया घालवायचे आहे का? नवीन याचिका दाखल करण्यास  मराठा क्रांती ठोक मोर्चाचा विरोध असून सरकारने तत्काळ निर्णय घेऊन राज्य मागासवर्गीय आयोग नेमावा. मराठा समाजाला मागास घोषित करण्याच्या प्रक्रिया सुरू करून मराठा आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया सुरू कराव्यात. 

नारायण राणेंच्या विरोधात मुलुंड न्यायालयात संजय राऊतांनी दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

Sanjay Raut : मी शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मी खर्च केला. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते, अशी विधाने नारायण राणे यांनी भांडुप येथे आयोजित एका कार्यक्रमात केली होती. नारायण राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचे दावे सिद्ध करावेत असे नोटीसीत म्हटले होते. संजय राऊत यांनी याप्रकरणी नारायण राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र नारायण राणे यांनी या नोटीसीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांनी त्यांना आता आपल्या मानहानी प्रकरणी न्यायालयात खेचले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह इथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अडीच वाजता बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरती सह्याद्री अतिथीगृह इथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अडीच वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी आणि कायदे तज्ञ ही उपस्थित राहतील. यापुढे मराठा आरक्षण संदर्भात नेमकी काय वाटचाल करायची यासंदर्भात निर्णय होईल.

गडचिरोलीत चामोर्शी इथे राजकीय नेते अतुल गण्यारपवार यांना पोलीस निरीक्षकाकडून बेदम मारहाण

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील दिग्गज राजकीय नेते अतुल गण्यारपवार यांना स्थानिक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती उघडकीस आली आहे. पहाटेच्या दरम्यान पोलीस निरीक्षक खांडवे यांनी मोबाईलवरुन निरोप देत गण्यारपवार यांना ठाण्यात बोलावले. आल्यावर लगेच काहीही विचारपूस न करता लाथाबुक्क्यांनी सुमारे अर्धा तास मारहाण केली. यात गण्यारपवार यांचा हात फ्रॅक्चर झाला असून मानेवर जखमा झाल्या आहेत. गण्यारपवार यांच्या कंत्राटदार भावाला देखील एन्काऊंटरमध्ये उडवून देण्याची धमकी पोलीस निरीक्षकांनी दिली. यानंतर लगेच गण्यारपवार यांनी या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केली. सध्या अतुल गण्यारपवार गडचिरोली जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुका सुरु असल्याने याच निवडणुकांवरुन वाद झाल्याने पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याची कुजबूज आहे. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून योग्य ती कारवाई केली जात असल्याचे सांगितले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केटिंग फेडरेशन व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दिग्गज राजकीय नेत्याला थेट पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षकांनी केलेली बेदम मारहाण मात्र गडचिरोलीत राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावून गेली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत.

विरार रेल्वे स्थानकातून आज चार एसी लोकलऐवजी नॉन एसी लोकल सोडल्या, प्रवाशांची नाराजी

Virar Local News : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकातून आज चार एसी लोकलऐवजी नॉन एसी लोकल सोडण्यात आल्या. एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने रेल्वेने एसी लोकलऐवजी नॉन एसी लोकल सोडल्या. एसी लोकलचे दरवाजे उघडले गेले. त्यामुळे प्रवाशांना एसी लोकलऐवजी नॉन एसी लोकलमधून प्रवास करावा लागल्याने नाराजी पसरली होती. तर यामुळे चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या तीन एसी लोकलही नॉन एसी लोकल सोडण्यात आल्या. विरारहून चर्चगेटला जाणारी सकाळची 7.15, 10.26, दुपारी 1.18 आणि 4.20 ची एसी लोकलऐवजी रेल्वेने नॉन एसी लोकल सोडली आहे. त्याचबरोबर चर्चगेटहून विरारला जाणारी सकाळची 8.53, दुपारी 11.48 आणि दुपारी 2.53 च्या एसी लोकलऐवजी नॉन एसी लोकल सोडण्यात आल्या आहेत. तांत्रिक बिघाडामुळे एसी लोकलचे दरवाजे उघडून प्रवाशांना प्रवास करावा लागला. एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्याने प्रवाशांना बंद दरवाजे असल्याने कोणताही त्रास होऊ नये म्हणून खबरदारीसाठी एसी लोकलचे दरवाजे उघडून नॉन एसी लोकल केल्या. त्यामुळे प्रवाशांना थोडा त्रास झाला तरी त्याचे मोठ्या प्रमाणात झाले नाही, अशी माहिती रेल्वेने दिली. तर आजच्या या नॉन एसीमुळे गारेगार प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे विरोधात नाराजी व्यक्त केली होती.

अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये वीज पडून 15 जनावरे दगावली

Beed Unseasonal Rain : गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्हा सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून 15 जनावरे दगावली आहेत. बीड जिल्ह्यातील शिरुर, कासार. आष्टी, पाटोदा, माजलगाव, वडवणी या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तर आतापर्यंत वीज पडून 15 जनावर दगावली आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सध्या यलो अलर्ट जारी करण्यात आला असून अवकाळीच संकट अद्यापही हटलेलं नाही तर या अवकाळीमुळे शेती पिकांच्या नुकसानीबरोबरच जनावरांची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.

पुण्यात आज भाजपची  महत्वपूर्ण बैठक

 Pune : पुण्यात आज भाजपची  महत्वपूर्ण बैठक


चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक,


पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखिल बैठकीला राहणार उपस्थित 


बैठकीला माजी नगरसेवक,प्रभाग अध्यक्ष,बुथप्रमुख शक्तीप्रमुख यांची उपस्थिती असणार,


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीची आयोजन,

Washim Fire : वाशिमच्या पोलीस मुख्यालयातील मिटिंग हॉलला लागली आगे

Washim Fire : वाशिमच्या पोलीस मुख्यालयातील मिटिंग हॉल मध्ये विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड झाल्यानं  शॉट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये कार्यालयीन साहित्य जळून  राख झाले आहे. मात्र यामध्ये नेमकं काय नुकसान झालं हे मात्र अद्यापही कळू शकलं नाही. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली असून, वाशिम अग्निशमन विभागाच्या मदतीनं आग आटोक्यात आणली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ST महामंडळाच्या ताफ्यात नव्यानं दाखल होणार ई-शिवनेरी 

एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार ई-शिवनेरी 


1 मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत ठाणे ते पुणे महामार्गावर उतरण्याचा एसटी महामंडळाचा मानस 


एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुरुवातीला ८ ईलेक्ट्रिक शिवनेरी दाखल होणार 


सध्याच्या तिकीट दराच्या तुलनेत ह्या गाड्यांचे भाडे कमी असणार 


ठाणे-पुणे महामार्गावर धावणाऱ्या गाडीचे भाडे ३५० रुपये असणार, सूत्रांची माहिती 


संपूर्ण वातानुकूलित, मोबाईल चार्जिंगसह अत्याधुनिक इन्फोटेन्मेंटची सुविधा 


एकदा बॅटरी चार्ज झाल्यानंतर ४०० किमीचा टप्पा पार करण्याची क्षमता 


मार्च महिन्यापर्यंत १५० ईलेक्ट्रिक गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या, मात्र ईलेक्ट्रिक गाड्यांना असलेल्या प्रचंड मागणीमुळे फक्त आठ गाड्या दाखल होतील 


मागील वर्षी अनिल परब यांच्या हस्ते दोन शिवाई इलेक्ट्रिक गाड्यांचे लोकार्पण, ज्या सध्या पुणे-अहमदनगर महामार्गावर धावत आहेत

मुंबई ते नाशिक महामार्ग चक्का जाम

मुंबई ते नाशिक महामार्ग चक्का जाम


-मुलुंड टोल नाका ते नितीन कंपनी ,नाशिक महामार्ग पर्यंत वाहतूककोंडी 


-नितीन कंपनी पुलावर जड वाहन कंटेनर बंद पडल्या मुळे आणि पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कामा मुळे वाहतूक कोंडी 


-गेल्या तास भरापासून वाहतुकीचा सामना वाहन धारकांना करावा लागत आहे...


-तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे सुरू आहे


-खारेगाव आणि साकेत पुलावर डांबरीकरण ,लोखंडी पट्ट्यांचे काम देखील हाती घेण्यात आलेले आहेत


-त्यापैकी खारेगाव- भिवंडी पुलावर रस्त्याच्या कामामुळे एकच लाईन सुरू ठेवण्यात आलेली आहे ,तसेच मुंब्रा बायपास चे देखील काम सुरू आहे त्याचा फटका देखील या ठिकाणी वाहनधारकांना बसत आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारक करत आहे

Nashik : जीवंत शेतकऱ्याला दाखवलं मृत, PM किसान पोर्टलचा अजब कारभार

Nashik : नाशिकच्या (Nashik) जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील एका शेतकऱ्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi) पोर्टलवर मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  शेतकऱ्याला (Farmers) मृत घोषीत करुन PM किसान योजनेचे मिळणारे अनुदान गोठवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. रमेश केदा बच्छाव असं शेतकऱ्याचे नाव असून ते लखमापूरचे माजी सरपंच आहेत. 

बुलढाणा जिल्ह्यात चक्रीवादळ आणि अवकाळी पावसानं मोठं नुकसान, प्रशासनाचं दुर्लक्ष; नागरिक संतप्त

Buldhana Rain : काल दुपारपासून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद शेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास तीन तास या परिसरात वादळी वाऱ्याने आणि पावसानं धुमाकूळ घातला. यामुळं संग्रामपूर परिसरात हाहाकार माजला आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळानं संग्रामपूर गावातील जवळपास 60 ते 70 घरावरील छपरे उडून गेले. यात मातीचे कवेलूसुद्धा उडून गेली. त्यामुळं या सर्व नागरिकांना रात्रभर उघड्यावर रात्र काढण्याची वेळ आली. मात्र प्रशासनाने अद्यापही याची दखल घेतली नसल्याने नागरिक संतप्त आहेत. नागरिकांना पावसात रात्रभर उघड्यावर रात्र काढावी लागली. 

Thane Traffic: -मुंबई ते नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; मुलुंड टोल नाका ते नितीन कंपनी ,नाशिक महामार्ग पर्यंत वाहतूककोंडी

Thane Traffic:  मुंबईतील मुलुंड टोलनाका आणि ठाणे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झालीये  ऐरोली पुलापासून टोलनाक्यापर्यंत अशी जवळपास दीड किलोमीटरची वाहनांची रांग लागली आहे. तर ठाणे शहरात कोपरीपासून नितीन कंपनी उड्डाणपुलापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झालीये.. यामुळे छोट्या गाड्यांमधील प्रवासी आणि अवजड वाहनांच्या चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. काही ठिकाणी तर कारचालक दुभाजकावरून कार दुसऱ्या लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न करतायेत, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतोय. मुंब्रा बायपास बंद असणे, मेट्रोची कामं आणि लुईसवाडी इथं सर्विस रोडचं काम या कारणांमुळे ठाण्यात वारंवार वाहतूक कोंडी होत असते.. 

हवामान बदल हे सर्वात मोठं आव्हान, जगातील महत्त्वाच्या नेत्यांकडून चिंता व्यक्त

Climate change :  हवामान बदल (Climate change) हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत देशातील महत्त्वाच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिका सरकारनं (US Govt) गुरुवारी (20 एप्रिल) प्रमुख अर्थव्यवस्थांच्या उर्जा आणि हवामान या विषयाशी संबंधित मंचातील नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हवामान बदलाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन (Joseph Biden) यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. यावेळी जगभरातील विविध देशांचे प्रमुख आणि इतर मंत्री या बैठकीला उपस्थित होते. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आजपासून शाळांना सुट्टी जाहीर


सध्या राज्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यात 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (State Govt) दक्ष झाले असून, आजपासून (21 एप्रिल) राज्य मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण व क्रीडा विभागाकडून असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.


Temperature : वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या एप्रिल महिन्यातच
दरम्यान, राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागवला होता. त्यानुसार वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. 


विदर्भातील शाळा या 30 जूनपर्यंत बंद


वाढत्या उष्णतेमुळं मुलांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. राज्यातील ज्या शाळांची परीक्षा संपली आहे त्यांना सुट्टी मिळणार आहे. राज्यातील शाळांना आजपासून सुट्टी सुरु होऊन ती 15 जूनपर्यंत असेल. विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या 30 जूनपर्यंत बंद राहतील असं राज्य शासनाने जाहीर केलं आहे.


राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस


हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यातील बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती, सांगली, जालना या जिल्ह्यात वादळी पाऊस झाला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी नागरीक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.


बुलढाणा जिल्ह्यात वादळी पावसामुळं घरांचं नुकसान 


गुरुवारी (21 एप्रिल) सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं अनेकांच्या घराचं नुकसान झालं आहे. संग्रामपूर येथील अनेक नागरिकांच्या घरावरील छपरे प्रचंड हवेमुळं उडाली आहेत. अनेकांची संसार उघड्यावर पडले आहेत. या परिसरात तीन तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.