Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर... Mahendra Gaikwad Wins Hind Kesari 2026 : हिंद केसरीच्या अंतिम लढतीत ड्रामा! पृथ्वीराज मोहोळ जखमी, महेंद्र गायकवाड ठरला 52व्या...More
Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर... Mahendra Gaikwad Wins Hind Kesari 2026 : हिंद केसरीच्या अंतिम लढतीत ड्रामा! पृथ्वीराज मोहोळ जखमी, महेंद्र गायकवाड ठरला 52व्या हिंद केसरीचा बाहुबली, नेमकं काय घडलं?, पाहा VideoMahendra Gaikwad Wins Hind Kesari 2026 Title : साताऱ्यातील ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर पुरुष गटाची अंतिम लढत महाराष्ट्राच्याच दोन तगड्या मल्लांमध्ये रंगली. सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात प्रतिष्ठेची 'हिंदकेसरी गदा' पटकावण्यासाठी लढत झाली.हिंदकेसरीच्या आखाड्यात पहिल्याच डावात मोठा ट्विस्ट! (Prithviraj Mohol vs Mahendra Gaikwad)मात्र, कुस्तीच्या सुरुवातीलाच एक दुर्दैवी आणि नाट्यमय घडामोड घडली. डाव प्रतिडाव टाकत असताना महेंद्र गायकवाड याने पृथ्वीराज मोहोळचा हात पिळला. याच वेळी पृथ्वीराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हाताची वेदना असह्य झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पृथ्वीराज मोहोळ याने मैदानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्ध्याने माघार घेतल्यामुळे पंचानी महेंद्र गायकवाड याला 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित केले. महेंद्र गायकवाड याला मानाची चांदीची गदा आणि बक्षीस म्हणून तब्बल 'महिंद्रा थार' गाडी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या पृथ्वीराज मोहोळ याला ट्रॅक्टर देण्यात आला.अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देशमराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण (Usha chavan) यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलासा दिला. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या टीडीआर व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच उषा चव्हाण यांनी ठाण्यातील आनंदाश्रमात जाऊन त्यांना मिळालेला व्ही. शांताराम पुरस्कार आपण सरकारला परत करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, त्यांनी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) यासंदर्भात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार, शिंदेंनी याप्रकरणात तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आवाहन करणारा एक व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला होता. यानंतर त्यांचे पती दत्तात्रय कडू देशमुख यांनीही पुण्यातील काही प्रसार माध्यमांकडे त्यांची बाजू मांडली होती. 26 वर्षापासून त्यांचा या जमिनीचा वाद कोर्टात सुरू होता. अखेर न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा या जमिनीवरील दावा मान्य केला होता. मात्र तरीही पुण्यातील गोयल गंगा या खाजगी विकासकाने या जमिनीचा टीडीआर आपल्या नावे केल्याने उषा चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.