Sambhaji Bhide: स्वातंत्र्यदिन आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी

K Chandrashekar Rao Live Updates : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंर सरकोलीत त्यांची जाहीर सभा झाली.

abp majha web team Last Updated: 27 Jun 2023 08:44 PM
Jalgaon News: मोठी बातमी! खान्देशसाठी जळगावला स्वतंत्र विभागीय आयुक्तालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Jalgaon: खान्देशातील विभागीय आयुक्त कार्यालयाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. Read More
Sambhaji Bhide: स्वातंत्र्यदिन आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी
Sambhaji Bhide: भारताचा स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रगीताबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. Read More
Karni Sena: करनी सेना महाराष्ट्र अध्यक्ष अजय सेंगर यांना मारहाण; आंबेडकरी अनुयायांनी मारहाण केल्याचा आरोप
Karni Sena Maharashtra: संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी करनी सेनेचे अजय सेंगर यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. Read More
वाखरीत उद्या संतांचा मेळा! मानाच्या पालख्यांच स्वागत करणार संत नामदेव आणि संत मुक्ताई, जाणून घ्या वारीच्या रंजक गोष्टी
राज्यातील सर्व संताचा मेळा पंढरीत येतो. पंढरीत आलेल्या सर्व संताना भेटण्यासाठी  संत नामदेव महाराज आतुर असतात. आपल्या भावंडाना भेटण्यासाठी ते लवकर उठतात आणि भेटीसाठी वाखरीला येतात. Read More
bhagirath bhalke : मोहोळचा पोपट बराच बोलालय, भगीरथ भालकेंचा उमेश पाटलांना टोला

Bhagirath bhalke : मोहोळचा पोपट बराच बोलालय. उद्यापासून त्यांना भालके काय आहे ते दाखवतो असे म्हणत भगीरथ भालकेंनी राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर टीका केली. 

राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा बीआरएसमध्ये प्रवेश, के.चंद्रशेखर राव यांच्या कामाचं केलं कौतुक

Bhagirath bhalke : मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी भगीरथ भालके यांनी के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केलं.

Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी चिंचोलीला मुक्कामी, आज श्रींचे चंद्रभागेच्या तीरी स्नान; उद्या पंढरपुरात पोहचणार 
Ashadhi Wari : संत मुक्ताबाईंची पालखी काल पंढरपुरात दाखल झाली, त्यांनतर आज निवृत्तीनाथांची पालखी चंद्रभागेच्या तीरी पोहचणार आहे.  Read More
संभाजीनगरच्या पिशोरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, हातात काठी घेऊन घराबाहेर निघण्याची वेळ; आतापर्यंत 15 जणांना चावा
Chhatrapati Sambhaji Nagar : परिसरात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तर या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करत आहे.  Read More
केसीआर यांनी घेतलं दिवंगत भारत भालकेंच्या समाधीचं दर्शन; सभास्थळी भालके समर्थकांची गर्दी

K Chandrashekar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सरकोलीत भगीरथ भालकेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांनी दिवंगत भारत भालके यांच्या समाधीस्थळीचे दर्शन घेतलं. त्यानंतर आता थोड्याच वेळात शेतकरी मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात भगीरथ भालके BRS पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. दरम्यान, सरकोली या सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भालके समर्थक उपस्थित आहेत.

Palghar News: मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या अन् शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार; पालघरमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थी गिरवतायत शिक्षणाचे धडे
Palghar News: पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील बालापूर पाटील पाडा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. या शाळेत 85 विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेची एक इमारत कोसळली आहे. Read More
Dharashiv News: एबीपी माझा इम्पॅक्ट; धाराशिवमधील कंत्राटदाराच्या मजुरांवरील मुजोरीच्या बातमीची राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडून दखल
Maharashtra Dharashiv News: राज्याचे मुख्य सचिवांकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. चार आठवड्यांच्या आत पोलीस महासंचालकांनाही तपशिल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  Read More
Nanded News : व्हॉट्सअॅप चॅटवरून वाद झाला, शिवसैनिकावर सहा जणांनी प्राणघातक हल्ला केला
Nanded News : दरम्यान या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
K Chandrashekar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा ताफा पंढरपुरात दाखल

K Chandrashekar Rao :  तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा ताफा पंढरपुरात दाखल झाला आहे. त्यांचे याठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. 

K Chandrashekar Rao : के चंद्रशेखर राव यांचा ताफा पंढरपूरच्या दिशेनं रवाना

K Chandrashekar Rao :  तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा ताफा पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाला आहे. त्यांच्यासोबत तेलंगणाचे संपूर्ण मंत्रीमंडळ आहे.  आजच्या दिवशी ते श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, त्याचबरोबर शेतकरी मेळावा, तुळजा भवानीचे दर्शन घेणार आहेत. 

आम्ही राजकारणसाठी नाही तर विठ्ठलाच्या भक्तीसाठी इथे आलो : के चंद्रशेखर राव

K Chandrashekar Rao : आम्ही विठ्ठलाच्या भक्तीसाठी इथे आलो आहोत, आम्ही राजकारणसाठी आलो नाहीत. मात्र, केवळ राजकारणासाठी आम्हाला अडवले जात असल्याचे मत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केलं.

पार्श्वभूमी

CM  K Chandrashekar Rao Live Updates :  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज ते आणखी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. ते त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळासह पंढरपूरच्या दिशेनं रवाना झालं आहेत. मात्र, फक्त के. चंद्रशेखर राव यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार असून त्याच्यासोबत आलेल्या इतर मंत्री, आमदार, खासदारांना सोडण्यात येणार नसल्याचं मंदिर प्रशासना स्पष्ट केलं आहे. आषाढी वारी सुरू असल्याने व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. हे सगळेजण मंगळवारी सकाळी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं दर्शन घेणार आहेत. चंद्रशेखर यांच्या सोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, त्यांच्या सर्व आमदार आणि खासदार तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. या सर्वांना व्हिआयपी दर्शन देता येणं शक्य होणार नाही असं मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे. 


पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी हे शेकडो किलोमीटर चालून विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. अशावेळी व्हीआयपी दर्शनामुळे त्यांच्या दर्शनामध्ये खोळंबा होतो. त्यामुळे यंदापासून व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच आता केवळ तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन देण्यात येणार असून आमदार आणि खासदार तसेच मंत्र्यांना सर्वसमान्यांच्या रांगेतून दर्शन घ्यावं लागणार आहे.


राजशिष्टाचारानुसार एखादा राज्याचा मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्री येत असताना त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणे गरजेचे असते, मात्र केवळ राजकारणापोटी केसीआर यांच्या सहकाऱ्यांना व्हीआयपी परवानगी नाकारण्यात आली आहे असा आरोप बीआरएस पक्षाकडून करण्यात येत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.