Aurangabad News: महाराष्ट्र राज्य राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर (Strike) जाणार आहे. महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेकदा निवेदने, भेटी, बैठका व आंदोलन होऊनसुद्धा शासनाकडून कोणतेही दखल घेतली जात नसल्याने, विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. 


विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी अनकेदा प्रशासनाकडे निवदेन देण्यात आले. याबाबत अनेकदा बैठका झाल्या. प्रत्येकवेळी मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर गेल्या तीन वर्षांपासून या प्रलंबीत मागण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र तरीही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


प्रलंबीत मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला


विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सातव्या आयोगाप्रमाणे वेतन, आश्वासित प्रगती योजनायासह विविध मागण्यांसाठी संप करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिवांना देण्यात आल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली आहे. तर उदासीनतेमुळे व पूर्वग्रहदूषित भावनेमुळे हे प्रश्न सुटलेले नाहीत. प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे देखील यावेळी निवेदनात म्हटले आहे. 


सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार 


राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त समितीने आयोजित केलेल्या 6 जानेवारीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार,या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 फेब्रुवारीपासून राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकून या आंदोलनाची सुरुवात करण्याचा निर्णय झालेला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून आणि सरकारकडून या संपाबाबत काय तोडगा काढला जाणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Haribhau Bagade: भाजप आमदार हरिभाऊ बागडेंच्या मागणीला यश, 22 कोटींच्या मुरूम चोरीची अखेर चौकशी सुरू


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI