Sushma Andhare On RSS: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याकडून राज्यभरात महाप्रबोधन यात्रानिमित्ताने बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतल्या जात आहे. यावेळी अंधारे यांच्याकडून शिंदे गटासह भाजपवर टीका केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वादग्रस्त विधानावरून अंधारे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली आहे. औरंगाबाद येथील सभेत बोलतांना, 'संघाच्या शाखेतचं चुकीचा इतिहास शिकवला जात असल्याचा' आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. 


औरंगाबादच्या टीव्ही सेंटर भागात झालेल्या सभेत बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्यात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणारी आमची पोरं त्यांना प्रश्नच विचारत नाही.'आहो काळ्या टोपीवाल्या गुरुजी, एवढ कसे कपट तुमच्या पोटात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई माँसाहेब जिजाऊ काय कमी सुंदर होत्या. असे का म्हणतील शिवाजी महाराज?...त्यांना वेळीच त्यावेळी आरएसएसच्या शाखेवर शिकवणाऱ्या लोकांना ठेचून काढले असते, तर आज भगतसिंह कोश्यारी यांची बोलण्याची हिम्मत झाली नसती असे सुषमा अंधारे म्हणाल्यात. 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कधी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केली आहे. कधी मराठी माणसाला आळशी आणि कामचोर म्हंटले आहे. वाईट याचं वाटतयं की, हे सर्व सुरु असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) मात्र गुपचूप शांत बसले आहे. आम्हाला तीनचाकी सरकार म्हणायचे पण आता तुमचं कसं आहे. एक भाजप, दुसरं शिंदे गट, तिसरे बच्चू कडू असं तुमचं तीन चाकं झाली असतांना, राज ठाकरे यांना स्टेपनी म्हणून ठेवायचं आहे का? असा खोचक टोला अंधारे यांनी यावेळी लगावला. 


संभाजी भिडेंवर टीका... 


याचवेळी बोलतांना सुषमा अंधारे यांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर देखील टीका केली आहे. संभाजी भिडे माध्यम प्रतिनिधी यांना टिकली लावली नाही म्हणून बोलतात. मग जेव्हा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या होत्या की, मंगळसूत्र घातल्यावर मला गळा दाबल्या सारखं वाटतेय, तेव्हा तुम्हाला अमृता फडणवीस यांना बोलायला काय झालं होते. अमृता वाहिनींना बोलायची हिम्मत नाही का तुमच्यामध्ये, तुम्ही आम्हाला शहाणपण सांगायचं का? असा टोलाही सुषमा अंधारे यांनी यावेळी लगावला. 


Aurangabad: राज्यपालांवर टीका करतांना अंबादास दानवेंची जीभ घसरली, शिवराळ भाषेत केली टीका