एक्स्प्लोर

Marathwada MLC Election: विक्रम काळे चौकार मारणार की, परिवर्तन होणार? मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात

Marathwada MLC Election: गेल्या 18 वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे काळे यावेळी चौकार मारणार की, भाजप परिवर्तन घडवून आणणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  

Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीतील रिअल्टर्स प्रा. लि. कंपनीच्या इमारतीत ही मतमोजणी होत आहे. त्यासाठी 56 टेबल सज्ज केले असून, 700 अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. दरम्यान, पहिल्या पसंतीच्या मतांचा निकाल सायंकाळी 4 वाजेपर्यंत लागण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. तर मतमोजणी केंद्रावर राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आणि भाजप उमेदवार किरण पाटील दोन्ही दाखल झाले असून, त्यांनी एकेमकांना शुभेच्छा देखील दिल्या आहे. त्यामुळे गेल्या 18 वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे काळे यावेळी चौकार मारणार की, भाजप परिवर्तन घडवून आणणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.  

मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात असून, खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात आहे. विभागात 61 हजार 529 शिक्षक मतदारांपैकी 53 हजार 257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत उमेदवार संख्या आणि मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे आजचा येणारा निकाल महत्वाचा समजला जात आहे. 

सकाळी 8 वाजल्यापासून चिकलठाणा एमआयडीसीतील रिअल्टर्स प्रा. लि. कंपनीच्या परिसरात प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी 56 टेबल सज्ज केले आहेत. प्रारंभी स्ट्रॉगरूममधून मतपेट्या मतमोजणी स्थळी आणण्यात आल्या. त्यानंतर मतपेट्यांतील मतांची मोजणी करण्यात येत आहे. मतांच्या प्रारंभिक मोजणीला किमान चार तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही मोजणी किमान 3 ते 4 तासांत पूर्ण होऊन पहिल्या पसंतीच्या मतांचा निकाल जाहीर होईल, अशी शक्यता आहे.

उमेदवारांनी दिल्या एकेमकांना शुभेच्छा....

मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी होणार असल्याने काही उमेदवार मतमोजणी केंद्रावर आधीच दाखल झाले होते. उमेदवारांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र याचवेळी मतमोजणी केंद्रावर आलेले राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आणि किरण पाटील दोघांनी एकमेकांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे गेल्यावेळी किरण पाटील यांनी विक्रम काळे यांचा प्रचार करत त्यांचा विजयात वाटा उचलला होता. मात्र यावेळी तेच किरण पाटील भाजपकडून रिंगणात असून, विक्रम काळे यांना त्यांनी आव्हान दिले आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; 56 टेबलवर होणार मतमोजणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget