Railways Canceled : पुढील आठवड्यात रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण मध्य रेल्वेकडून मनमाड ते अंकाई किल्ल्यादरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, 15 रेल्वे गाड्या 23 ते 29 जूनदरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत. ज्यात सर्वाधिक गाड्या जालनाकडे जाणाऱ्या आहेत. 


मार्ग बदलून धावणार रेल्वे 


दुहेरीकरणाची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. 15 रेल्वे पूर्णत: रद्द आहेत. तर 10 रेल्वे अंशत: रद्द करण्यात आल्या आहे. या रेल्वे रोटेगाव मनमाड-रोटेगाव, नगरसोल शिर्डी नगरसोल व नगरसोल- मनमाड - नगरसोलदरम्यान रद्द आहेत. 2 रेल्वे मार्ग बदलून धावतील. यात नांदेड- निझामुद्दीन ही रेल्वे 28 जून रोजी नांदेड- औरंगाबाद मनमाडऐवजी पूर्ण-हिंगोली-अकोला भुसावळ अशी धावेल. तर निझामुद्दीन नांदेड रेल्वे 29 जून रोजी औरंगाबाद जालना - परभणी हा मार्ग वगळून धावेल.


या गाड्या रद्द...


1) 23  जून रोजी विशाखापट्टणम् - श्री साईनगर शिर्डी रेल्वे.


2) 24 जून रोजी श्री साईनगर शिर्डी - विशाखापट्टणम रेल्वे.


3) 25 ते 28 जूनदरम्यान सी.एस.टी. मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस.


4) 26ते 29 जूनदरम्यान जालना - सी.एस.टी. मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस,


5) 27 व 28 जून रोजी सी.एस.टी. मुंबई - आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस.


6) 26 व 27 जून रोजी आदिलाबाद - सी.एस.व मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस.


7) 27 व 28 जून रोजी जालना - श्री साईनगर शिर्डी रेल्वे


8) 27 व 28 जून रोजी श्री साईनगर शिर्डी - जालना रेल्वे.


9) 24 व 26 जून रोजी जालना - नगरसोल रेल्


10) 24 व 26 जून रोजी नगरसोल - जालना रेल्व


प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करावी...


मध्ये रेल्वेकडून दुहेरीकरणाची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे 23 ते 29 जून दरम्यान प्रवास करणाऱ्यांनी गाड्यांची माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. त्यामुळे  ज्या गाड्या रद्द झाल्या त्या प्रवाशांवर आता पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ आली आहे.