Eknath Shinde Maharashtra New CM : एकनाथ शिंदे (Eknath Shinde Maharashtra New CM) महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दरेगावसारख्या छोट्याशा गावातून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास अचंबित करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने साताऱ्याला चौथ्यांदा मुख्यमंत्री मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्याआधी यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण या सातारकरांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. आता एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) रुपाने चौथा मुख्यमंत्री मिळाला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना हाताशी तर बंडखोरी केली. त्यानंतर आता भाजपशी हात मिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. अखेर बुधवारी उद्धव ठाकरे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताली अशी घोषणा केली. त्यानंतर साताऱ्यामध्ये एकच जल्लोष सुरु झाला. कारण सातऱ्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्राला चौथ्यांदा मिळाला. पाहूयात साताऱ्यातील नेत्यांनी याआधी कुणी कुणी कधी मुख्यमंत्रिपद भूषवलेय.
महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांचं वजन राहिलेय. यशवंतराव चव्हाण यामध्ये अग्रभागी आहेत. त्यांच्यानंतर बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले होते त्यांचे मुळगाव कलेढोण (ता. खटाव) असून ते बॅरिस्टर होते. अतुलेंनी राजीनामा दिल्यानंतर अल्पकाळासाठी बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळात कराडचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर आता जावळी तालुक्यातील दरेगावचे कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत.
साताऱ्याचे यशवंतराव चव्हाण यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून 1956 ते 1960 या काळात मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेय. त्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 1960 ते 1962 काळात संधी लाभली. त्यानंतर कलेढोण (ता.खटाव) येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांना संधी मिळाली. अतुलेंनी राजीनामा दिल्यानंतर भोसल्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. त्यांनंतर 2010 ते 2014 पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लाभली. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत.
हे देखील वाचा -
- Eknath Shinde : फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं: एकनाथ शिंदे
- Eknath Shinde CM: मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे पण सरकारचा रिमोट देवेंद्र यांच्या हाती?
- Uddhav Thackeray : सरकार पाडण्याबाबत उद्धव ठाकरे यांना दुर्लक्ष करणं नडलं? शिंदे यांच्या बंडखोरीची पवारांनी दिली होती चार वेळा माहिती