मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग लागली. या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार असं सांगण्यात येत आहे की, संजय शिंदे यांच्या गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. संजय शिंदे यांच्या गाडीला ज्यावेळी आग लागली त्यावेळी ते मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ होते.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजय शिंदे यांच्या गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. परंतु त्यांच्या गाडीत असलेल्या सॅनिटायझरमुळे आग वाढली आणि तिने भीषण रूप धारण केलं. गाडीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तेव्हा संजय शिंदे गाडीचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी गाडीची खिडकी तोडण्याचाही प्रयत्न केला. परंतु, गाडीला सेंट्रल लॉक लागल्यामुळे ते गाडीतून उतरू शकले नाहीत आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.


नाशिकच्या कार जळीत दुर्घटनेतील संजय शिंदे मी नव्हे... मी सुखरुप : आ. संजयमामा शिंदे


संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग लागल्यानंतर तेथील स्थानिक लोक तत्काळ धाव घेत गाडीजवळ पोहोचले. त्यांनी गाडीत बंद असलेल्या संजय शिंदे यांना वाचवण्याता प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत फार उशिर झाला होता. स्थानिक लोकांनी लगेच अग्निशमन दलाला सदर घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटानस्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ते संजय शिंदे आहेत अशी माहिती मिळाली.