मुंबई : महाराष्ट्रातील नगरपरिषद (Municipal Council) आणि नगरपंचायत (Nagar Panchayat Elections) निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा राज्यातील नंबर 1चा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या संघटन कौशल्याला मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येतंय.
या निवडणुकांमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले असून, “तुमची आमची भाजपा सर्वांची” हा प्रचारातील संदेश प्रत्यक्ष मतदानातून खरा ठरल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संघटन आणि रणनीतीचा विजय (BJP Strategy and Organization)
प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिस्तबद्ध आणि प्रभावी पक्षसंघटन उभे केले. संयम आणि आक्रमकतेचा समतोल साधत त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांना भाजपात प्रवेश दिला, ज्याचा थेट फायदा या निवडणुकांत दिसून आला.
फडणवीसांचे नेतृत्व ठरले निर्णायक (Devendra Fadnavis Leadership)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय अनुभवामुळे अनेक ठिकाणी भाजपाने अटीतटीच्या लढती जिंकल्या. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याशी थेट सामना असतानाही भाजपाने आपली ताकद सिद्ध केली. त्याचवेळी महायुतीतील सत्तासमीकरण बिघडू नये, याचीही खबरदारी घेण्यात आली.
दुसऱ्या फळीला स्पष्ट संदेश (Political Message)
या निकालांमुळे सेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना भाजपाने स्पष्ट राजकीय संदेश दिल्याचे दिसते. विशेषतः काही भागांत भाजपाने स्वतंत्र ताकद दाखवत आपली संघटन क्षमता अधोरेखित केली आहे.
महापालिकांकडे लक्ष (Upcoming Municipal Corporation Elections)
जानेवारीत होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल भाजपासाठी आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहेत. देवेंद्र–रवींद्र जोडगोळीची किमया आगामी निवडणुकांतही कायम राहते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी महायुतीतील सहकारी पक्ष पुढील रणनीती कशी आखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपच्या या विजयावर मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "भाजपचा सर्वाधिक स्ट्राईक रेट राहिला आहे. आपण लढवलेल्या पैकी 75% नगराध्यक्ष निवडून आलेत. निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या ही दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. सुमारे 18 नगरपालिका अशा आहेत, जिथे भाजपचे बहुमत आहे, मात्र नगराध्यक्ष निवडून येऊ शकलेले नाही."
ही बातमी वाचा: