Mumbai Rain : मुंबईकरांसाठी (Mumbai) मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईसाठी उद्या (28 सप्टेंबर) रोजी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईत उद्या अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात सर्वत्र विजांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Continues below advertisement


राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं थैमान 


सध्या राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं (Heavy Rain) थैमान घातलं आहे. विविध भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी भरपाई देण्याची मगणी सरकारकडे करताना दिसत आहे. आम्ही जगावं कसं असा सवाल देखील शेतकरी करत आहेत. 


वाशिम जिल्ह्यात नद्यांना पूर 


गेल्या दोन दिवसापासून वाशिम जिल्ह्यात बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. मानोरा तालुक्यातील आसोला गावालगत असलेल्या नाल्यावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने तीन तासापेक्षा अधिक काळ वाहतूक ठप्प होती. सायंकाळच्या दरम्यान शाळेतील विद्यार्थी शेतकरी आणि जनावर घेऊन शेतात अडकलेल्या नागरिकांनी घरी जाण्यासाठी दोर ट्रॅक्टरला बांधून धोकादायक पद्धतीने  वाहत्या पाण्यातून प्रवास केला आहे. 


हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर


हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने पुराचे पाणी शेवाळा गावातील नागरिकांच्या घरात शिरलेले आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आता तीन ते अडीच फूट इतका पाणी असल्यामुळे घरातील सर्व संसार उपयोगी साहित्याचा नुकसान झालेलं आहे संपूर्ण साहित्य पाण्यामध्ये बुडालेलं आहे. 


जालना जिल्ह्याला पुढील चार तास रेड अलर्ट


जालना जिल्ह्यात पुढील चार तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .पुढील काही तासात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्‍यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे .अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका .जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचा आवाहन जिल्हा प्रशासन करत आहे. सलग आठवडाभर जोरदार पावसाने गाठल्यानंतर काल रात्रीपासून धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला .धाराशिवचा लासोना गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीची भिंत ढासळली असून शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे . 


महत्वाच्या बातम्या:


पाऊस बनलाय वैरी, लातुरात बचाव पथकांना पाचारण,धाराशिव, बीडसह उर्वरित भागात बिकट अवस्था