Maharashtra Monsoon Update : राज्यासहदेशावर 'अल निनो'च्या (El Nino)संकटाचेढगआहे. अशातचजूनमध्येरुसूनबसलेल्यापावसानेजुलैच्यापहिल्याआठवड्यातदमदारहजेरीलावतबहुतांशजिल्ह्यांनाअक्षरशःझोडपूनकाढलं. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला बरसणाऱ्यापावसाने (Maharashtra Rain)पुन्हाएकदाविश्रांतीघेतलीआहे. राज्यात मान्सूनने दमदार बॅटिंग करत जून महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. तरकुठेजलसंकाटाचेढगकाहीसेनिवळलेहोते. असेअसतानापरतएकचिंतावाढवणारीबातमीसमोरआलीआहे. प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या 'अल निनो'मुळे मान्सूनचा वेग अचानक मंदावलाआहे. (Maharashtra Monsoon News)

Continues below advertisement

हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD) , 10 जुलै ते 15 जुलै दरम्यान उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतासह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण कमालीचे घटणार आहे. सध्या अरबी समुद्रात आणि उत्तर भारतात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा कमकुवत होऊन पुढे निघून गेल्यामुळे ढगांची दाटी विरळ झाली आहे. 19 जुलैपर्यंतही हीच स्थिती कायम राहू शकते. दरम्यान, मुंबई-कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस (Monsoon News), तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Monsoon News : मुंबई-कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

Continues below advertisement

हवामानविभागानेदिलेल्यामाहितीनुसार, मुंबईत जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवसातच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या 31 दिवसांत मिळून पडणाऱ्या पावसाच्या सरासरीहून अधिक पाऊस अवघ्या पाच दिवसांत पडला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून एकाच दमात पडण्याऐवजी तुकड्या-तुकड्यांमध्ये पडतो. म्हणजे काही दिवस अतिवृष्टी होते आणि त्यानंतर सलग अनेक दिवस कडक ऊन किंवा कोरडा दुष्काळ पडतो. जुलैच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा दुसरा सक्रिय टप्पा येण्याची आशा असली, तरी तोपर्यंत शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून बसावे लागणार आहे. तर 19 जुलैपर्यंतही हीच स्थिती कायम राहू शकते. दरम्यान, मुंबई-कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Mumbai Rain: अवघ्या पाच दिवसात सरासरीहून अधिक पावसाची नोंद

दरम्यान, हवामान विभागाच्या सांताक्रुज केंद्रात सरासरीहून 5 टक्के, तर कुलाबा येथे 12 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जून महिन्यातील तूटही भरून निघाली आहे. तर अवघ्या पाच दिवसात नोंदल्या गेलेल्या पावसाने संपूर्ण जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाची सरासरी ओलांडली आहे. सांताक्रुज येथे 899.2 मिमी पाऊस नोंदला गेला, जो सरासरीहून 5.1 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच कुलाबा केंद्राची एकूण सरासरी 734.1 मिमी असून येथे 823. 4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जो सरासरीहून 12.2 टक्के अधिक आहे.

Nagpur Rain IMD: विदर्भावर पावसाअभावी अवर्षणाचे सावट; जुलैमध्ये 18 टक्के पावसाची तूट

विदर्भात यंदाच्या पावसाळ्याची सुरुवात दमदार झाली असली, तरी जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत. 1 जून ते 10 जुलै या कालावधीत विदर्भात सरासरीच्या तुलनेत 18 टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सुरुवातीचे काही दिवस आणि आठवड्याच्या शेवटी पाऊस झाल्यानंतर मधल्या काळात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पावसाची सरासरी घटली आहे.

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार गोंदिया जिल्ह्यात ३४ टक्के अधिक पाऊस, तर बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा किंचित अधिक पाऊस झाला आहे. मात्र, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ४६ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. याशिवाय भंडारा (३३%), चंद्रपूर (२३%), वाशिम (२६%), नागपूर (१०%), अमरावती (१२%), अकोला (१०%) आणि यवतमाळ (७%) जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

नागपूर जिल्ह्यात १ जून ते ९ जुलैदरम्यान २३७.२ मिमी पाऊस झाला असून, या कालावधीतील सरासरी २६३.९ मिमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात १० टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. दरम्यान, हवामानातील सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास आणि पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप पिकांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील पावसाकडे लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या