Maharashtra Monsoon News : राज्याच्या विविध भागात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अशातच तळकोकणासह मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर राज्यातील इतर भागात देखील मान्सून दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तळकोकणासह मुंबईनंतर मान्सूनने राज्यातील आणखी काही भाग व्यापला मान्सून विदर्भात देखील दाखल झाला आहे. मान्सूनने मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग व्यापल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषत: कोकणसह मुंबई ठाणे पालघर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक आहे. अनेक भागात या पावसामुळं वाहतुकीवर परिण झाला आहे. तसेच शेती पिकांना देखील या पावसाचा मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं घरांचे नुकसान झाले आहे. वीड पडून काही भागात लोक देखील दगावले आहेत. 

मान्सून सोमवारी मुंबई, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत दाखल झाल्याने मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला. मंगळवारीही तो त्याच ठिकाणी मुक्कामी होता. बुधवारी तो राज्याचा उर्वरित भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी जूनपर्यंत उघडीप ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण वगळता राज्याच्या इतर भागांत मुसळधारेचा जोर 30 ते 31 मे पासून कमी होणार असल्याचा ताजा अंदाज समोर आला आहे. उद्या, 28 मे पासूनच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चे पावसाचा जोर कमी होत आहे. या 4 भागांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे घाटांमाथा परिसरामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच बुधवारपासून मुंबई, पालघर भांगातील पाऊस कमी होत आहे. मात्र कोकणातील इतर भागात मुसळधार पाऊस 31 मे पर्यंत राहील. मुंबई, पुण्यासह राज्यातील काही भागात दाखल झालेला मान्सून नसून वाळिवाचा पाऊस असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मोसमी वारे दक्षिण मुंबईपर्यंत दाखल मात्र अद्यापही राज्यातील काही भागात मान्सूनचा पाऊस नाही असा तज्ज्ञांचा आक्षेप आहे. मान्सूनपूर्वीच्या तीव्र वादळी ढगांमुळे राज्यातील काही भागात पाऊस झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Weather Update : कोकण किनारपट्टीवर काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, अरबी समुद्र खवळणार; अतिवृष्टीचा रेड अलर्ट, पुढील दोन दिवस कसं असेल हवामान?