Maharashtra MLC Election Results 2023 Live: अमरावती पदवीधर मतदारसंघात 8735 अवैध मतांची पुन्हा पडताळणी सुरू; निकाल येण्यास उशीर होण्याची शक्यता

Vidhan Parishad Election Results 2023 LIVE Updates: विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Feb 2023 12:00 AM
Amaravati MLC Election: अमरावती पदवीधर मतदारसंघात अवैध मतदानाची तपासणी; 8735 अवैध मतांची पुन्हा पडताळणी सुरू

अमरावती पदवीधर मतदारसंघात अवैध मतदानाची तपासणी सुरू आहे. 8735 अवैध मतांची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आली आहे. भाजप उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधींनी अवैध मतांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली होती. अंतिम मतमोजणीत मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे हे 2313 मतांनी आघाडीवर आहेत.

Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय, 29  हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी

Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे विजयी


सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मते 


शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते 


सत्यजित तांबे तब्बल 29  हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी

Amaravati MLC Election : अमरावती पदवीधर निवडणूक निकाल, चौथ्या फेरीची आणि अंतिम मतमोजणी पूर्ण, मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे हे 2313 मतांनी आघाडीवर

Amaravati MLC Election :  अमरावती पदवीधर निवडणूक निकाल, चौथ्या फेरीची आणि अंतिम मतमोजणी पूर्ण


डॉ. रणजित पाटील, भाजप : 41027


धीरज लिंगाडे, मविआ : 43340



मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे हे 2313 मतांनी आघाडीवर


8551 अवैध मते


धिरज लिंगाडे यांना कोटा पूर्ण करण्यासाठी हवीत 3587 मते 

Maharashtra MLC Election : मराठवाडा शिक्षक मतदारसंघ मतमोजणी; महाविकास आघाडीचे विक्रम काळे हे 6923 मतांनी आघाडीवर, भाजप उमेदवार तिसऱ्या स्थानावर

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीच्या 11 फेरीनंतर महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांना 21 हजार 105 मते मिळाली.


दुसऱ्या स्थानावर भाजपचे किरण पाटील यांना 14 हजार 182 इतकी झाली आहे.


तिसऱ्या स्थानावर सूर्यकांत विश्वासराव यांना 14 हजार 128 मते मिळाली.  


महाविकास आघाडीचे विक्रम काळे हे 6923 मतांनी आघाडीवर

अमरावती पदवीधर निवडणूक निकाल ; मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे हे 1779 मतांनी आघाडीवर

Amravati Division Graduate Constituency : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या चवथ्या फेरीची आणि अंतिम मतमोजणी पूर्ण झाली असून या फेरीअखेर मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे हे 1779 मतांनी आघाडीवर आहे. आता अवैध मतमोजणी होईल आणि त्यानंतर अंतिम कोटा ठरवल्या जाणार आहे.

Nashik MLC Election : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजयी आघाडी; विजयाचा आनंद साजरा करणार नसल्याचे तांबे यांचे ट्वीट

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजयी आघाडी घेतली आहे. मित्र मानस पगार याचे अपघाती निधन झाल्याने आज विजयाचा आनंद साजरा करणार नसल्याचे सत्यजीत तांबे यांनी म्हटले.





Nashik MLC Election : सत्यजित तांबे यांची विजयाकडे वाटचाल, शुभांगी पाटील तब्बल 20 हजार मतांनी पिछाडीवर 

Nashik MLC Election : नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणीच्या तिसऱ्या फेरी अखेर एकूण 84 हजार मतांची मोजणी करण्यात आली. यात 75 हजार 622 मते वैध ठरविण्यात आली तर 8 हजार 378 अवैध ठरविण्यात आली. यात सत्यजीत तांबे यांना जवळपास 45 हजार 607 मते पडली आहेत तर शुभांगी पाटील यांना 24 हजार 927 मते पडली आहेत. त्यामुळे अद्यापही शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ मतमोजणी: महाविकास आघाडीचे विक्रम काळे हे 6655 मतांनी आघाडीवर

Maharashtra MLC Election :  मराठवाडा शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीच्या नवव्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांना 20 हजार 331 मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकांत विश्वासराव यांना 13 हजार 676 मते मिळाली.  तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपचे किरण पाटील यांना 13 हजार 616 इतकी झाली आहे. महाविकास आघाडीचे विक्रम काळे हे 6655 मतांनी आघाडीवर आहेत. 

Nashik MLC Election : नाशिकमध्ये दुसऱ्या फेरी अखेर सत्यजित तांबे यांनी आघाडी, 14 हजार 693 मतांनी आघाडी 

Nashik MLC Election : नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट दुसरी फेरी अखेर सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली असून १४ हजार ६९३ मतांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरी अखेर 50 हजार 555 मते वैध ठरविण्यात आली. तर 5 हजार 445 अवैध मते ठरविण्यात आली. यात  सत्यजित सुधीर तांबे यांना 31 हजार 009 मते पडली. शुभांगी भास्कर पाटील यांना 16 हजार 316 मते पडली. तर उमेदवार अनुक्रमे रतन कचरु बनसोडे 1157 मते, सुरेश भिमराव पवार  360 मते, अनिल शांताराम तेजा 46 मते, अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर 100 मते, अविनाश महादू माळी 623 मते, इरफान मो इसहाक 28 मते, ईश्वर उखा पाटील : 89 मते, बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 295 मते, ॲड. जुबेर नासिर शेख :  103 मते, ॲड.सुभाष राजाराम जंगले :  104 मते, नितीन नारायण सरोदे : 129 मते, पोपट सिताराम बनकर : 37 मते, सुभाष निवृत्ती चिंधे :  83 मते, संजय एकनाथ माळी : 76 मते अशी मते पडली आहेत. 
 


 

Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक; सत्यजीत तांबे यांना दुसऱ्या फेरी अखेर 14 हजार 693 मतांची आघाडी

Nashik MLC Election News : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक


सत्यजीत तांबे यांना दुसऱ्या फेरी अखेर 14 हजार 693 मतांची आघाडी


दुसऱ्या फेरी अखेर सत्यजीत तांबे याना 31 हजार 9 मते


शुभांगी पाटील यांना 16 हजार 316 मते


आतापर्यंत वैध मते 50 हजार 555


अवैध मते 5 हजार 445

Nashik MLC Election नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक सत्यजीत तांबे यांना दुसऱ्या फेरी अखेर 14 हजार 693 मतांची आघाडी

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक


सत्यजीत तांबे यांना दुसऱ्या फेरी अखेर 14 हजार 693 मतांची आघाडी


दुसऱ्या फेरी अखेर सत्यजीत तांबे याना 31 हजार 9 मते


शुभांगी पाटील यांना 16 हजार 316 मते


आतापर्यंत वैध मते 50 हजार 555


अवैध मते 5 हजार 445

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक : भाजपच्या बालेकिल्यात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले 8489 मतांनी विजयी

Teachers Constituency Election Nagpur : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले सुधाकर अडबाले 8489 मतांनी विजयी झाले असून त्यांनी भाजप समर्थित तसेच बारा वर्षांपासून या जागेचे प्रतिनिधीत्व करणारे नागो गाणार यांच्यावर विजय मिळवला आहे.

Nashik MLC Election : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर पुन्हा गोंधळ, उमेदवार प्रतिनिधींकडे आढळला मोबाईल 

Nashik MLC Election : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर पुन्हा गोंधळ झाला असून उमेदवार प्रतिनिधींकडे मोबाईल फोन आढळला आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुरवातीला मतमोजणी जेव्हा सुरू झाली, त्यावेळेस उमेदवारांची प्रतिनिधी एका बुथवर जास्त होते. तेव्हाही गोंधळ झाला होता. आता पुन्हा एकदा उमेदवार प्रतिनिधींचाच मुद्दा उपस्थित झाला असून उमेदवार प्रतिनिधींकडे मोबाईल फोन आढळल्याने एकच गोंधळ उडाला. मोबाईल फोन निवडणूक केंद्रावर न्यायला मतमोजणी केंद्रावर न्यायला परवानगी नसते. मात्र उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रामध्ये जातात. त्यांच्यापैकी कुणाकडे तरी मोबाईल फोन आढळला. त्यामुळे पुन्हा एकदा मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला. त्यामुळे तात्काळ गमे यांनी या प्रतिनिधीला केंद्रावर बाहेर काढले असून आता गोंधळ निवळला आहे. 

Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदारसंघात पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे 7 हजार 922 मतांनी आघाडीवर

Nashik MLC Election :  नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे  यांना 15 हजार 784 मते मिळाली. तर, मविआ समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांना 7 हजार 862 मते मिळाली. पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे यांना सत्यजीत तांबे याना 7 हजार 922 मतांची आघाडी मिळाली आहे. 

Nashik MLC Election : सत्यजित तांबे आघाडीवर, मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांची आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आघाडीवर असल्याचे कळताच मतदान केंद्र बाहेर तांबेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. सत्यजित तांबे यांच्या समर्थनात युवा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. घोषणाबाजीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी प्रवेशद्वारापासून दोनशे ते अडीचशे मीटर दूर पिटाळून लावले. 



फडणवीस, बावनकुळे यांना गृह जिल्ह्यात धक्का; नागपूर शिक्षक विधान परिषद निवडणुकीत मविआचा विजय, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

Nagpur MLC Election Result :  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले सुधाकर अडबाले यांचा विजय झाला असून त्यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्याच गृह जिल्ह्यात धक्का बसला आहे

Nagpur MLC Election : नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पहिल्या मतमोजणी फेरीअखेर मविआचे सुधाकर अडबाले 7 हजार 703 मतांनी पुढे

Nagpur MLC Election Result : पहिल्या फेरी अखेरीस विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले सुधाकर अडबाले 7,703 मतांनी पुढे आहेत. पहिल्या फेरीअखेर 28 हजार मतांपैकी सुधाकर अडबाले यांना 14069 मते मिळाली, तर भाजप समर्थित नागो गाणार यांना 6366 मते, राजेंद्र झाडे यांना 2742 आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार यांना 60 मते मिळाळी. तसेच 1099 मते अवैध ठरली आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पहिल्या मतमोजणी फेरीअखेर  मविआचे अडबाले 7 हजार 703 मतांनी पुढे

Teachers Constituency Election Nagpur : पहिल्या फेरी अखेरीस विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले सुधाकर अडबाले 7,703 मतांनी पुढे आहेत. पहिल्या फेरीअखेर 28 हजार मतांपैकी सुधाकर अडबाले यांना 14069 मते मिळाली, तर भाजप समर्थित नागो गाणार यांना 6366 मते, राजेंद्र झाडे यांना 2742 आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार यांना 60 मते मिळाळी. तसेच 1099 मते अवैध ठरली आहे.

Nagpur: नागपुरात पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले आघाडीवर

 


नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ पहिली फेरी अधिकृत आकडे ( 28 हजार मतांपैकी )


सुधाकर अडबाले 14069
नागो गाणार 6366
राजेंद्र झाडे 2742
सतीश इटकेलवार 60


अवैध मते 1099


पहिल्या फेरी अखेरीस विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले सुधाकर अडबाले 7,703 मतांनी पुढे

Nagpur MLC Election : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ पहिल्या फेरीतील मते जाहीर, मविआच्या सुधाकर अडबोले यांना निर्णायक आघाडी

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ पहिली फेरी अधिकृत आकडे ( 28 हजार मतांपैकी )


सुधाकर अडबाले 14069
नागो गाणार 6366
राजेंद्र झाडे 2742
सतीश इटकेलवार 60


अवैध मते 1099

Nashik: नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक, पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे आघाडीवर 

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक, पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे आघाडीवर 



नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणीची पहिली फेरी अंतिम टप्यात, मागील दीड तासापासून सुरू आहे पहिली फेरी.


एकूण 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून खरी लढत शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात आहे.


पहिल्या फेरीच्या अंतिम टप्यात सत्यजीत तांबे आघाडीवर.

Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुक मतमोजणीची पहिली फेरी अंतिम टप्यात, अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आघाडीवर

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुक मतमोजणीची पहिली फेरी अंतिम टप्यात


मागील दीड तासापासून सुरू आहे पहिली फेरी


शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात लढत सुरूच


एकूण 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


पहिल्या फेरीच्या अंतिम टप्यात सत्यजीत तांबे आघाडीवर

Nashik MLC : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुक मतमोजणीची पहिली फेरी अजूनही सुरू, मागील एक तासापासून मतमोजणी सुरूच

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुक मतमोजणीची पहिली फेरी अजूनही सुरू


मागील एक तासापासून सुरू आहे पहिली फेरी


शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात लढत सुरूच


काही टेबलवर शुभांगी तर काही टेबलवर सत्यजीत आघाडीवर

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक : कोटा पहिल्या पसंतीततच पूर्ण होणार?

Teachers Constituency Election Nagpur : सुधाकर अडबाले यांना 14 हजार 71 मते मिळाली. कोटा पहिल्या पसंतीतच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतांची गणना करावी लागेल.

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक : आतापर्यंत 750 मते अवैध

Teachers Constituency Election Nagpur : शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीमध्ये आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार 750 मते अवैध ठरली.

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पहिल्या फेरीतील अजून 6000 मतांची मतमोजणी सुरू 

Teachers Constituency Election Nagpur : पहिल्या फेरीतील अजून 6000 मतांची मतमोजणी सुरू आहे.

Nashik Election : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी केंद्रावर गोंधळ 

Nashik Election : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. उमेदवार प्रतिनिधी जास्त झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी उमेदवार प्रतिनिधीमधेच बाचाबाची झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या वेळी टेबल क्रमांक 13 वर गोंधळ झाल्याने महसूल आयुक्तांनी पोलीसांना पाचारण करण्यात आले. 

नागपुरात सुधाकर आडबाले पाच हजार मतांनी आघाडीवर, भाजपचे नागो गाणार पिछाडीवर

 Vidharbha Teacher Constituency Election: विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले पाच हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.  सुधाकर आडबाले यांना आतापर्यंत 28 पैकी 18 टेबलवर 10 हजारांच्या आसपास  मते मिळली आहे. त्या तुलनेत नागो गाणार यांना फार कमी मते आहेत.  नागो गाणार दुसऱ्या तर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

औरंगाबादेतून विक्रम काळे आघाडीवर, भाजपचे किरण पाटील पिछाडीवर

Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील मात्र पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. अजून पहिली फेरीची अधिकृत आकडेवारी समोर आली नसली, तरीही काळे यांच्या बॉक्समध्ये सर्वाधिक मत पत्रिका पडल्याचे पाहायला मिळत आहे. 

Kokan MLC Election : कोकणात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे  यांचा विजय

Kokan MLC Election : कोकणात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे  यांचा विजय झाला आहे. पहिल्या फेरीत त्यांना तब्बल 22 हजार मते मिळाली आहेत, 

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; प्रथम पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात

Teachers Constituency Election Nagpur : प्रारंभिक मतमोजणी दरम्यान एक हजारांच्या गठ्ठ्यांची सरमिसळ प्रक्रिया झाल्यानंतर वैध व अवैध आणि प्रथम पसंतीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; 28 हजारांच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीला सुरुवात

Teachers Constituency Election Nagpur : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी झालेल्या निवडणूकीसाठी एकूण 34,360 मतदान झाले. यापैकी 28,000 मतांची पहिली फेरी दोन तासांनंतर पूर्ण होईल जी निर्णायक ठरणार आहे.

Kokan MLC Election : ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत 22 हजार मते, पहिल्या फेरीत विजयी होण्याची शक्यता

Kokan MLC Election : ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत 22 हजार मते मिळाली आहेत. जवळपास 6 हजार मतांची आघाडी घेतली आहे.  पहिल्या फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. अवैध मतदान मोजले जात आहे

Nashik Graduate Constituency Election : निकालाआधी शुभांगी पाटील कुटुंबियांसोबत त्र्यंबकेश्वराच्या चरणी

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, या निवडणुकीत नेमका कुणाचा विजय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्रंबक राजाचे दर्शन घेतले. यावेळी शुभांगी पाटील यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. त्रंबकेश्वर येथे शुभांगी पाटील यांनी त्रंबक राजाचे मनोभावे दर्शन घेऊन आपलाच विजय होण्याची प्रार्थना केली. तसेच त्यांच्या मातोश्री आणि काकू यांनी देखील त्रंबक राजाला विजयासाठी साकडे घातले.

Sangmner News:  सत्यजित तांबे यांच्या शहरात फ्लेक्स लागण्यास सुरुवात, फ्लेक्सवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही फोटो

Sangmner News:  निकालापूर्वीच संगमनेर शहरातही फ्लेक्स लागले  आहे. सत्यजित तांबे यांच्या शहरात फ्लेक्स लागण्यास सुरुवात झाली आहे.  आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन.. या आशयाचे अनेक फ्लेक्स संगमनेर शहरात लागण्यास सुरुवात झाली आहे. 

Kokan MLC Election :  मला 20 हजारापेक्षा जास्त मतं मिळतील, महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विश्वास

Kokan MLC Election :  कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत असून यामध्ये मला 20 हजारापेक्षा जास्त मतं मिळतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. सोबतच यंदा पहिल्यांदाच पहिल्या पसंतीच्या मतमोजणीतच निर्णय लागेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच म्हात्रे घराण्यात एक तरी आमदार असावा, असं आमचं स्वप्न होतं. आज यानिमित्ताने ते स्वप्न देखील पूर्ण होईल, असं ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.

Nagpur MLC Election : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ मतमोजणीस सुरूवात

Nagpur MLC Election : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ मतमोजणीस सुरूवात झाली आहे. एकूण 34 हजार 360 जणांन मतदान  केले आहे. मतमोजणीत पहिल्या पसंतीसाठीचे 28 टेबलवर, प्रत्येक टेबलवर एक हजार या प्रमाणे 28 हजार मते मोजली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित 8 हजार 360 हजार मते मोजली जातील. ही मोजणी करताना प्रत्येक टेबलवर 22 उमेदवारांचे 22 बॉक्सेस आहेत तर एक बॉक्स अवैध मतांसाठी आहे. पहिल्या पसंतीप्रमाणे त्या त्या उमेदवाराच्या बॉक्स मध्ये मत टाकली जातील. या प्रक्रियेला सुमारे दोन तास लागणार...

 Kokan Election News:  कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अपडेट, दोन फेऱ्या पूर्ण

 Kokan Election News:  कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अपडेट



  •  कोकण मतदार संघासाठी एकूण 98 मतदान केंद्रे होती. 

  • आतापर्यंत मतपेट्या उघडण्याच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. 

  • तिसऱ्या फेरीत मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत.

Nashik Pavidhar Election Result Update:  नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक, टपाली मतदानच्या मतमोजणीला सुरूवात

Nashik Pavidhar Election Result Update:  नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक टपाली मतदानच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे



  • एकूण टपाली मतदान 58

  • वैध मते 46

  • अवैध मते 12

Kokan Election:  कोकण शिक्षक मतदार संघात भाजपा-शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांच्यात लढत

Kokan Election:  कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी  नवी मुंबईतील नेरूळ येथे सुरू  आहे. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॅा महेंद्र कल्याणकर काम पाहणार आहेत. 28 टेबल वर मतमोजणी होणार असून तीन ते चार फेऱ्या होण्याची शक्यता आहे.  पाच जिल्ह्यातील शिक्षकांनी या निवडणुकीत 91 टक्के पर्यंत मतदान केले आहे. भाजपा - शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे तर महाविकास आघाडीकडून बाळाराम पाटील यांच्यात मुख्य लढत आह 

Nagpur Election : नागपूर शिक्षक विभाग मतदार संघाच्या निवडणुकीत 22 उमेदवार रिंगणात

Nagpur Election : नागपूर शिक्षक विभाग मतदार संघाच्या निवडणुकीत 22 उमेदवार रिंगणात आहे.  विद्यमान आमदार नागो गाणार, सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यासह सतीश इटकेलवार यांच्यात लढत आहे.

Nashik Padvidhar Election Result:  नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात

Nashik Padvidhar Election Result:  नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे, सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे.  2 लाख 62 हजार 678 पैकी 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी हक्क बजावला आहेत त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे.  मतमोजणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप आलं असून  अडीचशेहुन अधिक पोलीसांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. 

Vidharbha Election:  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना विजयाचा विश्वास

Vidharbha Election:  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या सुधाकर अडबाले यांनाही विजयाचा विश्वास आहे.  जुनी पेन्शन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्या अनुषंगाने शिक्षकांनी मतदान आमच्या बाजूने केल्याचा त्यांचा दावा आहे. 

Maharashtra MLC Election Results 2023 : उमेदवारांची धाकधूक आज वाढली,8 वाजल्यापासून याच्या मतमोजणीला सुरुवात

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या  निवडणुकीत आपलं नशीब आजमावणाऱ्या सर्व उमेदवारांची धाकधूक आज वाढलेली आहे.. कारण आज या निवडणुकीचा निकाल आहे.. आणि अगदी अर्ध्या तासात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून याच्या मतमोजणीला सुरुवात होतेय...

Nashik Padvidhar : नाशिककडे सर्वांचं लक्ष, कोण बाजी मारणार?

30 जानेवारीला मतपेटीत भवितव्य बंद झालेल्यानंतर शिक्षक, पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीचं मैदान कोण मारणार याबाबत अनेक कयास बांधले जात आहेत..नाशिककडे सर्वांचं लक्ष लागलंय कारण या ठिकाणी एकाही राजकीय पक्षानं आपला अधिकृत उमेदवार दिलेला नाही.. त्यामुळे तिथे इतरांच्या पाठिंब्यावर असलेल्या अपक्षांचं भवितव्य काय आहे हे पाण्याची उत्सुकता अनेकांना आहे...

पार्श्वभूमी

मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज. सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात होणार आहे. राज्यातील नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा निकाल काही तासांवर आहे. पण, त्यातल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.


नाशकात गुलाल कुणाचा?


काँग्रेसनं डॉक्टर सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाचा अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा नाशिकतली रगंत आणखी वाढली. काँग्रसेचा एबी फॉर्म असतानाही सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही.तर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज भरला. तिकडे काँग्रेसनं तांबे पितापुत्रांचा निलंबनं केलं आणि भाजपच्या बंडखोर शुभांगी पाटलांनी मातोश्री गाठलं.  पुढे त्यांना मविआनं अधिकृत उमेदवारी दिला आणि नाशिकची  निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली. 


 विक्रम काळे पुन्हा 'विक्रम' करणार?


 राज्यातील नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर चर्चेत होतीच. त्याचबरोबर औरंगाबादच्या निवडणुकीकडेही लक्ष होतं. कारण, भाजपनं नवख्या किरण पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढवणारे किरण पाटील यांच्यासमोर विक्रम काळेंचं तगडं आव्हान उभं होतं आणि म्हणून औरंगाबादच्या निवडणुकीचा चर्चा रंगली..


 रणजीत पाटील पुन्हा गुलाल उधळणार?


 अमरावतीत भाजपचे रणजीत पाटील हे तिसऱ्यादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात मविआचे धीरज लिंगाडे उभे आहेत. तर तिकडे नागपुरात 22 उमेदवार रिंगणात आहे. पण, इथं चौरंगी लढत रंगली. काँग्रेसकडून सुधाकर आडबाले,  भाजप समर्पित विद्यमान आमदार नागो गाणार, 
शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे,  राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून सतीश इटकेलवार मैदानात आहेत. त्यामुळे इथं कुणाचा गुलाल उधळणार.. हे अवघ्या काही तासांमध्ये कळेल...


कोकणातही थेट फाईट 


 कोकण शिक्षक मतदारसंघात मविआचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत आहे. त्यामुळे याठिकाणी होतंय, याकडेही लक्ष असेल. जागा पाच आहे पण, त्यांना विधिमंडळात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पाचही जागांवर आपला उमेदवार जिंकावा. यासाठी दोन्ही आघाड्यांवर प्रयत्न झाले. तशा प्रचारसभा झाल्याआणि आता नेमकं यश कुणाला मिळणार आहे. याकडे सत्ताधाऱ्यासह विरोधकांचं लक्ष लागलंय 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.