Tanaji Sawant Security News : शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) नेत्यांची सुरक्षा (Security) कपात करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा (Y-grade security) होती. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचाही समावेश आहे. सावंत यांनात मंत्री असताना त्यांनी हट्टाने त्यांच्या सुरक्षेसाठी 48 पोलीस कर्मचारी नियुक्त करुन घेतले होते. मात्र, ते आता मंत्री नसल्यानं त्यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली आहे. त्यांना केवळ एकच सुरक्षारक्षक पुरण्यात आला आहे. 

तानाजी सावंतांनी पोलीस आयुक्तांवर दबाव वाढवली होती सुरक्षा

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते . मंत्रिपदाचा दर्जा असल्याने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. ज्यामध्ये चार कर्मचारी आणि एका वाहनाचा समावेश असणं अपेक्षित होतं . मात्र, तानाजी सावंतांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस दलातील तब्ब्ल 48 पोलीस कर्मचारी आणि तीन वाहने नियुक्त करुन घेतली होती. तानाजी सावंत त्यांचा उपयोग त्यांच्या कार्यालयासमोर बंदोबस्त तैनात करण्यासाठी, त्यांच्या घरासमोर बंदोबस्त तैनात करण्यासाठी आणि ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचा ताफा नेणयासाठी करत होते.  त्याचा ताण पुणे पोलीस दलावर पडत होता. त्यामुळं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तानाजी सावंत यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी कमी करणायचा प्रयत्न केला होता. ही संख्या 15 वर आणली होती. मात्र, तानाजी सावंतांनी एकनाथ शिंदेंमार्फत पोलीस आयुक्तांवर दबाव आणून पुन्हा पाहिल्याएवढे पोलीस कर्मचारी स्वतःच्या सुरक्षेसाठी नियुक्त करुन घेतले होते. मात्र, आता तानाजी सावंत मंत्री नसल्यानं त्यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली आहे. सावंत यांना आता आमदार म्हणून केवळ एक सुरक्षारक्षक पुरवण्यात आला आहे.

पोलीस दलावरचा ताण वाढतोय

महाराष्ट्रात सध्या पोलीस दलाचे मनुष्यबळ 2 लाख 40 हजारांच्या दरम्यान आहे. जागतिक निकषांनुसार एक लाख लोकांमागे 226 पोलीस कर्मचारी उपलब्ध  असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या उपलब्ध मनुष्यबळ पाहता महाराष्ट्रात 1 लाख लोकसंख्येमागे 186 पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यात अनेक मंत्री आणि राजकारणी बडेजाव म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करुन घेत आहेत. त्यामुळं पोलीस दलावरचा ताण आणखी वाढत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्ही आय पी कल्चर मोडीत काढण्यासाठी आग्रही आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी साध्या पद्धतीने रहावे आणि साध्या वाहनांचा उपयोग करावा अशा त्यांना सुचना असतात. राज्यातील मंत्री आणि राजकारण्यांच वागणं मात्र याच्या उलट असल्याचं दिसुन येत आहे. 

शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कपात

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. मात्र आता त्यात कपात केल्यानं शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. 

 

महत्वाच्या बातम्या:

MLA Security : शिंदेंच्या आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ एकच रक्षक; आमदारांमध्ये संताप