Maharashtra Political News: शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना ठाण्यातून (Thane) राजीनामा देऊन वरळीतून (Worli) निवडणूक लढवावी, असं ओपन चॅलेंज दिलं. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आदित्य ठाकरेंच्या खुल्या आव्हानानंतर महाराष्ट्राचे मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यावर बोलताना आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य बालिश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे Immature : दीपक केसरकर
"आदित्य ठाकरे यांनी वरळीतून राजीनामा देऊन ठाण्यातून निवडणूक लढवावी, असं आम्हीही म्हणू शकतो. पण आम्ही असं नाही म्हणणार, कारण ती आमची संस्कृती नाही. आदित्य यांनी वरळीतून निवडणूक कशी जिंकलीये, हे विसरू नये. त्यांच्या विजयासाठी वरळीतील दोन लोकांनी जीवाचं रान केलं होतं, तेव्हाच त्यांना निवडणूक जिंकता आली. त्या दोन्ही व्यक्तींना नंतर एमएलसी बनवावं लागलं.", असं म्हणत दीपक केसरकरांनी थेट ठाकरे गटावर निशाणा साधलाय.
आदित्य ठाकरेंनी दिलेलं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज
काही दिवसांपूर्वी मुंबईत बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान दिलं होतं. मुंबईतल्या चेंबूरमधील कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान दिलं होतं. मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत माझ्यासमोर उभं राहावं आणि निवडणूक लढावी, असं थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे. जेवढे खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलं होतं.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले होते की, "महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीतून उभे राहा, तुम्ही कसे निवडून येताय, ते मी बघतो." तसेच, "जी यंत्रणा लावायचीये लावा, जी ताकद लावायचीये लावा, जेवढे खोके वाटायचेयत वाटा, पण एकही मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही.", असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :