बुलढाणा : राज्यातील CCMP कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या (Homeopathic doctors ) महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यक परिषदेने 30 जून रोजी काढलेला आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांच्या CCI मध्ये नोंदणीला एॅलोपॅथिक डॉक्टरांनी विरोध केला होता. तसेच आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. 

16 जुलैपासून राज्यातील 1 लाख होमिओपॅथिक डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार

होमिओपॅथिक डॉक्टरांच्या (Homeopathic doctors ) नोंदणीला अखेर स्थगिती दिल्याने राज्यातील एक लाख होमिओपॅथिक डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या 16 जुलैपासून राज्यातील 1 लाख होमिओपॅथिक डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची शक्यता आहे. 

ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी (IMA, MSRDA ) आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD)) तीव्र विरोध दर्शवला होता. 8 जुलै रोजी, IMA ने सरकारला पत्र पाठवून, होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्रात सराव करण्याची परवानगी दिल्यास लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत व्यक्त केले होते. या स्थगितीमुळे, सीसीएमपी (CCMP) प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेत (MMC) नोंदणी होणार नाही. 

निर्णयामुळे भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता

चार-पाच वर्ष शिकून, मेहेनत करून, पैसे खर्च करून एमबीबीएस, एमडी, एमएस अशा पदव्या मिळवणाऱ्या डॉक्टरांना या एका निर्णयामुळे भविष्यात धोका निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड बी एम सी, सरकारी डॉक्टरांची संघटना MAGMO आणि ए एम सी अशा सर्वच संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. 

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत लवकरात लवकर निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. नाहीतर सर्वच अॅलोपॅथी डॉक्टर संघटना एकत्रित बंदची हाक देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या आधी अॅलोपॅथी डॉक्टरांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करता येत होती. त्यांच्यासोबत आता होमिओपॅथी डॉक्टरदेखील एक वर्षांचा कोर्स करून आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करू शकतात, असा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. 15 जुलै पासून या नोंदणीला सुरुवात होईल. मात्र यामुळे अॅलोपॅथी डॉक्टरांच्या अस्तित्वाला धोका असल्याचा आरोप केला जातोय. 

महत्वाच्या बातम्या:

होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स करुन 'तो' मोठा फायदा, सरकारच्या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध, म्हणाले, 'आम्ही इतका पैसा खर्च करुन शिकतो अन्....'