एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 21 May 2022 : मोदी सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल डिझेल आता स्वस्त होणार!

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 21 May 2022 : मोदी सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल डिझेल आता स्वस्त होणार!

Background

आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

राज्यातील ब्राह्मण संघटनांना पवारांचं चर्चेचं निमंत्रण
शरद पवारांकडून (Sharad pawar)  राज्यभरातील विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आले आहे. शरद पवार हे ब्राह्मणविरोधी (Brahman) असल्याची मतं सोशल मीडियावर (Social Media) काही जणांकडून व्यक्त केली जातात याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. तर या बैठकीला आनंद दवेंच्या ब्राह्मण महासंघासह काही संघटनांचा विरोध आहे. मात्र इतर संघटना चर्चेसाठी तयार आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलय.

अमित शाह आज अरूणाचल प्रदेश दौरा

गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर हे आठवडाभर दिल्ली दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.

राजीव गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त 'भारत जोडो' अभियान

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'भारत जोडो' अभियान भारतीय युवा कॉंग्रेसतर्फे राबवण्यात येणार आहे.

आज दिल्लीसाठी करो या मरो, समोर मुंबईचं आव्हान

आज आयपीएलमध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) हे संघ आमने-सामने उतरणार आहेत. या दोघांमध्ये दिल्लीसाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या खात्यावर 14 गुण असल्याने आज ते सामना जिंकल्यासच 16 गुणांसह पुढील फेरीत जाण्यासाठी पात्र ठरु शकतात. अन्यथा बंगळुरुचा संघ पुढील फेरीत जाऊ शकतो. बंगळुरुच्या खात्यावरही 16 गुणच असले तरी दिल्लीचा नेट रनरेट चांगला असून आजही एक चांगला विजय मिळवल्यास ते प्लेऑफममध्ये एन्ट्री घेतील. तर मुंबई इंडियन्सचं आव्हान याआधीच संपलं असलं तरी हंगामातील शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्यासाठी ते मैदानात उतरतील. 

21:53 PM (IST)  •  21 May 2022

नंदुरबार: ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्गावर तीन वाहनांची एकमेकांना धडक, विचित्र अपघात एकाचा मृत्यू

नंदुरबारच्या ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रक, बोलरो आणि दुचाकीमध्ये विचित्र अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वराचा जागेवर मृत्यू झाला. या अपघातानंतर गावकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन केलं. सध्या  प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

21:13 PM (IST)  •  21 May 2022

राज ठाकरेंनी घेतली इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात  इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांची सामाजिक ऐतिहासिक  विषयांवर प्रदिर्घ चर्चा झाली.

19:57 PM (IST)  •  21 May 2022

Uddhav Thackeray : बाळासाहेब रोज व्यंगचित्र काढायचे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : मुंबईत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब रोज व्यंगचित्र काढायचे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

 

19:52 PM (IST)  •  21 May 2022

औरंगाबाद बजाजनगर अष्टविनायक रुग्णालयाची तोडफोड

औरंगाबाद बजाजनगर अष्टविनायक रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे. तीन महिने काम करूनही पगार न दिल्याने ही  तोडफोड करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.

19:50 PM (IST)  •  21 May 2022

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या तालेरा रुग्णलयात जनरेटरला लागली आग

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या तालेरा रुग्णलयात जनरेटरला लागली आहे. ही घटना आज सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. सकाळ पासून वीज नसल्याने जनरेटरवर रुग्णालयाच कामकाज सुरू होतं. जनरेटर ची बॅटरी तापल्याने आग लागल्याचं अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

19:40 PM (IST)  •  21 May 2022

केंद्र सरकार केवळ लोकप्रियतेच्या हव्यासापोटी पेट्रोल डिझेल दरात कपात करत आहे : उदय लोध

केंद्र सरकार केवळ लोकप्रियतेच्या हव्यासापोटी पेट्रोल डिझेल दरात कपात करत आहे. याचा फायदा सर्व सामान्यांना होणार आहे. पण डीलरचे काय? दर कपात करताना शासनाने किमान पूर्व कल्पना देणे किंवा चर्चा करणे अपेक्षित आहे.पण तसे झाले नाही. यावरून एखादे आंदोलन देखील होऊ शकतं, असा इशारा फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिला आहे.

19:14 PM (IST)  •  21 May 2022

Sharad Pawar : ब्राम्हण संघटनांच्या 40 जणांसोबत साधला संवाद : शरद पवार

Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथे ब्राम्हण संघटनांची बैठक संपली. यावेळी त्यांनी ब्राम्हण संघटनांच्या 40 जणांसोबत संवाद साधला. या बैठकीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरु आहे.   

19:04 PM (IST)  •  21 May 2022

LPG Cylinder : पेट्रोल-डिझेलचे दर कमी; केंद्र सरकारकडून देशवासियांना मोठा दिलासा

LPG Cylinder : केंद्र सरकारचा देशवासियांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पेट्रोल 9 रू.50 पैशांनी आणि डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार आहे. 

18:51 PM (IST)  •  21 May 2022

पेट्रोल डिझेल आता स्वस्त होणार

पेट्रोल डिझेल आता स्वस्त होणार आहे. पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात येणार आहेत. 

18:47 PM (IST)  •  21 May 2022

ब्राम्हण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचं शरद पवारांनी दिलं आश्वासन

ब्राम्हण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचं शरद पवारांनी आश्वासन दिलं आहे, असे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी म्हणाले. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs LSG : ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
Sharad Pawar : मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक
उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJitendra Awhad Full Speech Raigad : दादागिरी सहन करणार नाही, काय व्हायचं ते होऊन जाऊद्याABP Majha Headlines : 09 PM : 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde On Congress : काँग्रेसने 50 ते 60 वर्षांचा हिशेब द्यावा, मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK vs LSG : ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
Sharad Pawar : मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक
उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
अमित शाहांकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष; अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं
अमित शाहांकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष; अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं
Web Series : 'Aarya' ते 'Criminal Justice'; हॉटस्टारवर नक्की पाहा 'या' थरार, नाट्य असणाऱ्या धमाकेदार वेबसीरिज
'Aarya' ते 'Criminal Justice'; हॉटस्टारवर नक्की पाहा 'या' थरार, नाट्य असणाऱ्या धमाकेदार वेबसीरिज
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे 'हे' आहेत 10 ऑनस्क्रीन आयकॉनिक लूक; 'धक धक गर्ल'चे फोटो पाहून तुमचीही नजर हटणार नाही!
माधुरी दीक्षितचे 'हे' आहेत 10 ऑनस्क्रीन आयकॉनिक लूक; 'धक धक गर्ल'चे फोटो पाहून तुमचीही नजर हटणार नाही!
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
Embed widget