एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News Live Updates : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Key Events
maharashtra marathi news breaking news live updates 21 march 2022 today marathi headlines maharashtra political news mumbai news national politics news Maharashtra Breaking News Live Updates : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
Breaking News Live Updates

Background

Maharashtra Budget Session : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा कायम

Maharashtra Budget Session 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू होत आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. गिरीश महाजन यांनी याबाबत हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेतं तेही पाहावं लागणार आहे.  तसंच काल झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या सभागृहात या अखेरच्या आठवड्यात तरी बोलणार का हा प्रश्न आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गेलेल दोन आठवडे सभागृह डोक्यावर घेतलं होतं. त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

Sharad pawar on MIM: एमआयएमच्या आघाडीत येण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया

Sharad pawar on MIM: एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावावरून सध्या अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांना एआयएमआयएमच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया विचारली असता पवार यांनी मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु, ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या संबंधित निर्णय घेऊ शकता हे तो पर्यंत राष्ट्रीय समितीने स्पष्ट केले नाही, तो पर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकत नाही. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत तो पक्ष निर्णय नाही, असं शरद पवारांनी म्हटलंय. 

Girish Mahajan: गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात; सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी

Girish Mahajan : भाजप नेते गिरीश महाजन यांच्या द्वितीय कन्येचा विवाहसोहळा आज थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी लावली होती. जळगावातील जामनेरमध्ये 14 एकर जागेवर हा  विवाहसोहळा संपन्न झाला.  या विवाह सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, कपिल पाटील, भारती पवार यांच्यासह काँग्रेस नेते तथा राज्याचे मंत्री अमित देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते.  गिरीश महाजन यांनी सर्व विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यामंडळींचं स्वागत केलं.

बैलगाडा शर्यत बघणं जीवावर बेतलं, आयोजकांच्या चुकीमुळं गावकऱ्याचा मृत्यू

नेरळ येथे उकृल ग्रामपंचायत हद्दीत आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. दौलत देशमुख असे या मृत व्यक्तीचे नाव असून, आयोजकांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे त्याला आपला प्राण गमवावा लागला आहे, या प्रकरणी आयोजकांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दौलत देशमुख अस मृत व्यक्तीचा नाव आहे, बैलगाडी शर्यत सुरू होताच एक बैलगाडी रिंगण सोडून थेट प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन शिरल्याने उपस्थित असलेले कर्जत येथील चोचीची वाडीत राहणारे दौलत देशमुख या प्रेक्षकाला बैलाचे शिंग लागला, तर उपस्थित प्रेक्षकांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ केल्याने या चेंगराचेंगरीत दौलत देशमुख हे आणखी जखमी झाले. 

22:22 PM (IST)  •  21 Mar 2022

नौदलाची त्रिकट युध्दनौका विजयदूर्गात

सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतीय नौदलाची त्रिकट युध्दनौका विजयदूर्ग बंदरात दाखल

सागरी सुरक्षेचा आढावा व स्थानिक मच्छिमार व शासकीय यंत्रणा समवेत सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा 

समुद्रात होणाऱ्या अनधिकृत हालचालीवर लक्ष ठेवणे तसेच पावसाळ्यात किंवा चक्रीवादळाच्या वेळी नौदलाची मदत कशी घ्यायची या संदर्भात माहिती दिली

उद्या सकाळी ही नौदलाची त्रिकट युध्दनौका मुंबईच्या दिशेने रवाना होणार

19:39 PM (IST)  •  21 Mar 2022

Bhiwandi Fire : भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग

भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. या आगीत संपूर्ण कारखाना आणि तयार कपडे जळून खाक झाले आहेत. या आगीचे नेमके कारण अजूनही समजू शकले नसून आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले असून या आगीची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल, माझ्याकडे त्यांची 22 प्रकरणं; मनोज जरांगेंनी पुन्हा डिवचलं
धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल, माझ्याकडे त्यांची 22 प्रकरणं; मनोज जरांगेंनी पुन्हा डिवचलं
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
Embed widget