एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News : चंद्रपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News : चंद्रपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू 

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. आज दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल. महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू..

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आज दिल्लीत अधिवेशन 

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठवे राष्ट्रीय आधिवेशन आज अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हे आधिवेशन दिल्लीमध्ये होणार असून, या आधिवेशनात 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.  या आधिवेशनात सर्व विरोधी पक्ष एकत्र  येण्याची शक्यता आहे

क्वीन एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा 

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ  यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही. 

JEE Advanced परीक्षेचा आज निकाल

 IIT मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा JEE Advanced चा निकाल 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. JEE Advanced चा निकाल   jeeadv.ac.in  या संकेतस्थळावर पाहता येणार आहे

आशिया कप फायनलमध्ये श्रीलंका-पाकिस्तान आमने सामने

श्रीलंका आणि पाकिस्तान(India vs Pakistan) या दोन संघामधील एक जण आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेच्या चषकावर नाव कोरणार आहे. दोन्ही संघाची स्पर्धेतील सुरुवात खास झाली नसतानाही त्यांनी अंतिम सामन्यापर्यंत धडक घेतली आहे. दरम्यान आता आशिया कप फायनलचा महामुकाबला दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातच (Dubai International Stadium) होणार आहे. उद्या संध्याकाळी 7.30 वाजता हा  सामना सुरू होणार आहे.

मंदिरात दरोडा टाकणाऱ्या 8 दरोडेखोरांना बेड्या, गुन्ह्यात वापरलेल्या गाड्यांसह सोनं केलं हस्तगत

उल्हासनगरच्या डामाराम साहिब मंदिरात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या 4 दरोडेखोरांना विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वी या दरोड्यात सहभागी असलेल्या 4  दरोडेखोरांना ठाणे गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे आता एकूण अटक दरोडेखोरांची संख्या 8 वर गेलीये.

20:28 PM (IST)  •  11 Sep 2022

चंद्रपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू 

चंद्रपूर : वीज पडून चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. आज दुपारपासून चंद्रपूर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथे शेतात काम करताना शरद मुनघाटे ( वय 50) यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. दुसऱ्या घटनेत ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथे शामल लोळे या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या. 

19:48 PM (IST)  •  11 Sep 2022

Pune : मागील पाच तासांपसून पुण्यात मुसळधार पाऊस

Pune : मागील पाच तासांपसून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. चंदननगर पोलिस स्टेशन, वेदभवन, कोथरुड, वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड, लमाण तांडा, पाषाण,सोमेश्वर वाडी, पाषाण,वानवडी, शितल पेट्रोल पंप,  बी टी ईवडे रोड,काञज उद्यान या परिसरासह अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलं आहे.

19:46 PM (IST)  •  11 Sep 2022

मुंबई-अहमदाबाद मार्गावर टेम्पोचा बर्निंग थरार; वाहतूक ठप्प

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात कडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हालोली येथे भीषण आग लागली आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असला तरी अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी न पोहोचल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. या आगीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. 

18:31 PM (IST)  •  11 Sep 2022

Pune : मुसळधार पावसामुळे पुण्यात पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळलं

Pune :  मुसळधार पावसामुळे पुण्यातील धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळले. यात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र सोसायटीत राहणारे अनिल पावसकर आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या दारातच हे भले मोठे झाठ कोसळल्याने बाहेर येऊ शकत नाहीत. अग्निशमन दलाने झाड हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

17:05 PM (IST)  •  11 Sep 2022

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचं निधन

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचं निधन झाले आहे.  हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरु म्हणूनही ओळख. मध्य प्रदेशच्या  नरसिंहपूर जिल्ह्यात  अखेरचा श्वास घेतला. 

16:52 PM (IST)  •  11 Sep 2022

धक्कादायक! औरंगाबादच्या खामगावातील घरांमध्ये घुसले पावसाचे पाणी, जनजीवन विस्कळीत

Aurangabad Rain: औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे झालेल्या जोरदार पावसानंतर गावात पाणी घुसले आहे. गावामध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असून, आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आगे. 

15:17 PM (IST)  •  11 Sep 2022

पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात आणि पुढील 3 दिवसांत विदर्भात मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज

पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात आणि पुढील 3 दिवसांत विदर्भात मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज

पुढील २४ तासात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम वायव्य दिशेनं म्हणजेच दक्षिण छत्तीसगढच्या दिशेनं पुढे सरकणार, आणि त्यानंतर तीव्रता कमी होणार
 
*विदर्भात विजांच्या कडकडाटासह ११, १२ आणि १३ सप्टेंबर दरम्यान सर्वत्र पाऊस, मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा *
 
*मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा तर कोकणात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज *
 
*कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट *
 
मुंबई आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा, संध्याकाळच्या सुमारास मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर उद्यापासून पुढील ३ दिवस मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 
 
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचं धुमशान बघायला मिळण्याची शक्यता, काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा 
 
विदर्भात पुढील ३ दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता तर इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
 
नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता त्यामुळे आज मराठावाड्याकरीता देखील आॅरेंज अलर्ट 
 
*राज्यातील मच्छिमारांना देखील पुढील ५ दिवस अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना *
 
*पुढील ५ दिवसाचा पावसाचा जोर बघता, भारतीय हवामान विभागाकडून इम्पॅक्ट वॉर्निंगचे इशारे *
 
 
 
14:57 PM (IST)  •  11 Sep 2022

राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार बोलले नाहीत

राष्ट्रवादीच्या अधिवेशनात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, फौजिया खान, जयंत पाटील सगळे बोलले...पण अजित पवार बोलले नाहीत... राष्ट्रीय अधिवेशन असल्याने राष्ट्रीय प्रोटोकॉल पाळले गेले असल्याचा अंदाज

14:54 PM (IST)  •  11 Sep 2022

wardha news: लहान आर्वी येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट, सुदैवानं जीवितहानी टळली

वर्ध्याच्या लहान आर्वी येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे एकच खळबळ उडाली असून घरातील चिमुकल्यासह सर्व जण थोडक्यात बचावले..स्फोटामुळे घर हादरलं आणि कुटुंबीयांनी घराबाहेर पळ काढला.. कांताबाई बाबाराव निंघोट यांचे घरी महिला स्वयंपाक करत असताना अचानक सिलेंडर भीषण स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला,परिसरात एकच खळबळ उडाली आणि सर्वांनी घराकडे धाव घेतली.
 
थोडक्यात बचावले कुटुंबीय :: 
 
 लहान आर्वी येथील ले-आऊट मधे असलेल्या कांताबाई बाबाराव निंघोट यांचे घरी त्यांची सुनबाई चैताली शेखर निंघोट  ९.३० च्या दरम्यान  स्वयंपाक करीत होती. तिचे लहान बाळ रडत असल्याने बेडरूम मधे लहान बाळाला पाहण्यासाठी गेली आणि तेवढ्यातच किचनमध्ये अचानक सिलेंडरचा मोठा स्फोट झाला..
 
घरातील वस्तूंचं मोठं नुकसान :
यावेळी त्यांचे सासरे  बाबाराव निंघोट आणि पती शेखर निंघोट हे हाॅल मध्ये होते.सिलेंडर स्फोट होताच सर्व घर हादरले.. तातडीने घरातील सर्वजण आरडाओरड करत घराबाहेर पडले. या स्पोटामधे कांताबाई बाबाराव निंघोट यांच्या घरातील अन्न-धान्य, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रीज ,पंखे,आलमारी, रॅक,आणि जीवनश्यक वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
 
 
14:44 PM (IST)  •  11 Sep 2022

Shivsena : प्रभादेवी राडा: अटक केलेल्या शिवसैनिकांवरील भादंवि 395 नुसार दाखल गुन्हा मागे

Shivsena : अटक केलेल्या पाच शिवसैनिकांची पोलीस स्टेशनमधूनच टेबल जामीन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसैनिकांवर भादंवि कलम ३९५ कलमनुसार दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
RCB Vs KKR Dream11 Prediction:  कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
Sanjay Mandlik : मदत करून पाच वर्षात फोन उचलले नाहीत, मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा
मदत करून पाच वर्षात फोन उचलले नाहीत, मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा
Santosh Bangar : हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhatrapati Sambhaji Nagar:संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत राडा,Manoj Jarangeयांची प्रतिक्रियाTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaMVA Seat Allocation: मविआतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढत, काँग्रेस नेत्यांचा सूरABP Majha Headlines : 3 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
RCB Vs KKR Dream11 Prediction:  कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
Sanjay Mandlik : मदत करून पाच वर्षात फोन उचलले नाहीत, मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा
मदत करून पाच वर्षात फोन उचलले नाहीत, मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा
Santosh Bangar : हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
Kartiki Gaikwad Pregnant Exclusive : कार्तिकी गायकवाडने दिली गुड न्यूज! प्रेग्नंसीनंतर 'सारेगमप' लिटिल चॅम्प्स फेम गायिका गाण्यांचे कार्यक्रम बंद करणार का?
कार्तिकी गायकवाडने दिली गुड न्यूज! प्रेग्नंसीनंतर 'सारेगमप' लिटिल चॅम्प्स फेम गायिका गाण्यांचे कार्यक्रम बंद करणार का?
Chhagan Bhujbal : उमेदवारी आधीच भुजबळांना नाशिकमधून जोरदार विरोध, सकल मराठा समाजाकडून पोस्टरबाजी
उमेदवारी आधीच भुजबळांना नाशिकमधून जोरदार विरोध, सकल मराठा समाजाकडून पोस्टरबाजी
Congress Income Tax Notice : भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!
भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!
RCB vs KKR : फाफ डु प्लेसिसच्या बंगळुरुला श्रेयसच्या कोलकाताचं आव्हान, केकेआर आरसीबीवरील विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार?
आरसीबी अन् कोलकाता आमने सामने येणार, होम ग्राऊंडवरील विजयाचा ट्रेंड केकेआर ब्रेक करणार?
Embed widget