(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News 8 April 2022 : दिवसभरातील महत्वाच्या बातम्याचे लाईव्ह अपडेट्स...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Kirit Somaiya : देशद्रोही सोमय्यांना जोडे मारा!, सामना अग्रलेखातून शिवसेनाचा टीकेचा बाण
Kirit Somaiya vs Sanjay Raut : मागील काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि ईडी असा सामना रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर हे प्रकरण आणखीनच तापलं. शिवसेनेकडून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करण्यात आले. सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेले 58 कोटी रुपये हडपल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. आता सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. ‘देशद्रोही सोमय्यांना जोडो मारा’ या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडण्यात आला आहे.
सोमय्या व त्यांच्या मुलाने सैनिकांचे बलिदान भरबाजारात लिलावात काढले -
'विक्रांत' युद्धनौका वाचविण्यासाठी जमा केलेले 58 कोटी हडपले आहेत. देशातल्या लाखो लोकांनी किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र व देशात फिरवलेल्या डब्यांत पैसे टाकले. त्या लाखो लोकांची फसवणूक झाली. हा पैसा भाजपच्या तिजोरीत गेला नसेल तर मग कोठे पोहोचला? किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाने सैनिकांचे बलिदान भरबाजारात लिलावात काढले. भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून 'कमळा'च्या साक्षीने त्यांनी हिंदुत्वाशी हा व्यभिचार केला. कायद्याने कारवाई होईलच, पण अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा. जातील तिथे फाटक्या जोडय़ांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे. सैनिकांच्या बलिदानाचा, हिंदुस्थानी युद्धनौकेचा अपमान देश सहन करणार नाही!
Explained : 9 एप्रिलला इम्रान खान यांचा अविश्वास प्रस्तावात पराभव का निश्चित आहे? जाणून घ्या
Pakistan Political Crisis : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे इम्रान खान (Imran Khan) यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का मानला जातोय. इम्रान खान यांना आता संसदेत अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार आहे. इम्रान यांना या परिस्थितीचा सामना कधीच करायचा नव्हता, आपल्याकडे बहुमत नाही हे त्यांना माहीत होते. 9 एप्रिलला अविश्वास ठरावावर मतदान होत असताना इम्रान खान यांचा पराभव का ठरवला जाईल? जाणून घ्या
इम्रान यांनी बहुमत गमावले
सत्ताधारी आघाडीचा प्रमुख पक्ष MQM-P विरोधी पक्षात सामील होण्याच्या घोषणेने इम्रान खान यांनी बहुमत गमावले. MQM-P चे 7 खासदार आहेत. याआधी सरकारचा आणखी एक मित्र पक्ष आणि पाच खासदार असलेल्या बलुचिस्तान अवामी पार्टीने (बीएपी)ही विरोधकांसोबत जाण्याची घोषणा केली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार अवकळी पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार अवकळी पाऊस पडतो आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू या पिकाचं मोठं नुकसान होत आहे.
लोकशाही मार्गाने आम्ही याचा धिक्कार करतो - जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आहे. आज जनता नाराज झाली आहे. लोकशाही मार्गाने आम्ही याचा धिक्कार करतो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवरचा हा हल्ला आहे - जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवरचा हा हल्ला आहे. एखाद्या चुकीच्या हातात कामगारांचं नेतृत्व गेलं की असा परिणाम होतो. विरोधकांचा सन्मान करायचा असतो, असं पवार साहेब म्हणाले होते. आज त्यांची नात पत्नी घरात होते. पवार यांचा जनतेवर जास्त विश्वास आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Narayan Rane : शिवसेना पक्ष राज्य चालवायला असमर्थ - नारायण राणे
शिवसेना पक्ष राज्य चालवायला असमर्थ आहे. प्रत्येक वेळी वर्गणी काढतात पण हिशोब कोणाला देत नाहीत, असे नारायण राणे म्हणाले.
ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन, जोरदार घोषणाबाजी
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्यामधील एका गटाने आक्रमक भूमिका घेऊन थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरासंमोर आंदोलन करायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे.