(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News 7 April 2022 : नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे संजय राऊत यांच्या भेटीला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
IOCL, Petrol-Diesel Price Today 7 April 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी गुरुवारसाठी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत. सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरवाढीपासून आज सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
देशात 22 मार्चनंतर आजपर्यंत 14 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. या दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांत 10 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर, 2021 नंतर जवळपास चार महिन्यांपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केली नव्हती. या दरम्यान, ग्लोबल मार्केटमध्ये कच्चं तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलं होतं. त्यावेळी तेल कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला होता.
गुरुवारी दरवाढ न झाल्यानं राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपयांवर स्थिर आहे. दरम्यान, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटर वर पोहोचला आहे. त्यामुळे परभणीत महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल विकलं जात आहे.
Kirit Somaiya : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली.
काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट
कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर करण्यात आला आहे. माजी सौनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जातंय.
Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी उद्या राज्यपालांची भेट घेणार
माजी खासदार राजू शेट्टी उद्या राज्यपालांची भेट घेणार असून सकाळी साडेअकरा वाजता ही भेट होणार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव असेल तर ते वगळावे अशी विनंती राजू शेट्टी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांचे नाव देण्यात आले होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यान आमदारकी ही नको स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
फेसबुक पोस्ट करत माजी मंत्री राम शिंदे यांचा अंबालिका कारखान्यावर आरोप
फेसबुक पोस्ट करत माजी मंत्री राम शिंदे यांनी अंबालिका कारखान्यावर आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीवरून हा आरोप करण्यात आला आहे.
Chandrakant Patil : 'कोथरुडचे आमदार हरवले' अशा आशयाचे पोस्टर्स पुण्यात झळकले
पुण्यातील कोथरुड भागात स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे हरवले आहेत असा मजकूर छापलेले पोस्टर्स अज्ञातांनी लावलेत. चंद्रकांत पाटील सध्या कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीसाठी कोल्हापूरात तळ ठोकून आहेत. त्यामुळे बरेच दिवस ते त्यांच्या मतदारसंघात आलेले नाहीत. त्यामुळे हे पोस्टर्स लावण्यात आल्याची चर्चा आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दोन वर्षानंतर सक्रिय कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर
चंद्रपूर जिल्ह्यात दोन वर्षानंतर सक्रिय कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर गेली आहे. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार - गुणरत्न सदावर्ते
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणाऱ्यांचे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आभार मानले आहेत. यामुळे 18 हजार पेंशन धारकांना दिलासा मिळाला आहे.