Uday Samant : पदवी घेतल्यानंतर विद्यार्थांनी राज्याला विसरू नये, शिक्षण पूर्ण करून आपल्या राज्यात परत येण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप कमी आहे अस वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अमरावतीत बोलताना केले. आणखी काय म्हणाले सामंत?


आपल्या विद्यापीठाची, जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची कायमस्वरूपी आठवण ठेवली पाहिजे - सामंत


ज्या विद्यापीठातून विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात, त्यांनी त्या विद्यापीठाची, आपल्या जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची कायमस्वरूपी आठवण ठेवली पाहिजे. शासन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी पैसे देते, मात्र शिक्षण पूर्ण करून आपल्या राज्यात परत येण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप कमी असल्याची खंत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. ते अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात बोलत होते..


उदय सामंत यांनी व्यक्त केली खंत
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 38 वा दीक्षांत समारोह काल संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी हे अध्यक्ष म्हणून ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते, तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते.


विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी चांदुर बाजार येथील गो.सी.टोम्पे महाविद्यालयाचा विद्यार्थी किरण अजाबराव इंगळे या विद्यार्थ्याला सर्वाधिक 6 सुवर्ण पदक आणि 1 रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी गजानन हागे हिला 5 सुवर्ण पदक, चार रौप्य पदक आणि दोन रोख पारितोषिकं देऊन गौरविण्यात आले.


महत्वाच्या इतर बातम्या


Shivrajyabhishek Din 2022 : यंदा रायगड दुमदुमणार, 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन थाटामाटात साजरा होणार


Pune News : पुण्यात नवजात अर्भकास शौचालयाच्या भांडयात ठेवले कोंबून, पोलिसांमुळे वाचले चिमुकल्याचे प्राण


Thane News : महापालिका आयुक्तांना निवडणूक आयोगाची नोटीस; अंतिम आराखड्यावर सही न केल्याने मागवला खुलासा