नागपूर :  छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेनंतर महाविकास आघाडीची दुसरी सभा नागपुरात होणार आहे. 16 एप्रिलला ही सभा होणार आहे. नागपुरातील सुधार प्रण्यास मैदानात सभा घेण्याचं निश्चित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर महविकास आघाडी सध्या अॅक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळत आहे. 


महाविकास आघाडीने आपली वज्रमूठ आवळली असून मुंबईत 11 एप्रिलला मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच त्याच आठवड्यात 16 एप्रिलला नागपुरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरच्या सुधार प्रण्यास या मैदानावर ही सभा घेण्यात येणार आहे.  मात्र या मैदानावर सभा घेण्यास भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोध केल आहे.  सदर मैदान खेळासाठी शासकीय निधीतून विकसीत करण्यात आले आहे. हे मैदान राजकीय सभेसाठी का दिले जात आहे असा सवाल करत त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिले आहे.


 भाजप आमदार कृष्णा खोपडे आपल्या पत्रात म्हणाले, नागपुरातील सुधार प्रण्यास मैदानात क्रिकेट, व्हॉलीबॉल. फुटबॉल, बास्केटबॉल आदी खेळांचे आयोजन करण्यात येते. या मैदनावर सकाळ संध्याकाळ कायम गर्दी असते. क्रीडा क्षेत्रासाठी विकसित करण्यात आलेले मैदान कोणत्याही राजकीय पक्षाला देण्यात येऊ नये. राजकीय कार्यक्रमासाठी मैदान दिल्यास त्याचा सत्यानाश होईल.


गडकरी आणि फडणवीसांच्या होमग्राऊंडवर सभा


गेल्या काही वर्षांपासून नागपुरात भाजपचा मागील काही निवडणुकांमध्ये पराभव झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे दोन दिग्गज नेते आहेत. गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र  फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांचं नागपूर होमग्राऊंड आहे आहे.   नागपूर शिक्षक मतदार संघात भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर दुसऱ्या सभेसाठी  महविकास आघाडीने नागपूर निवडले आहे. आता या सभेला मैदान मिळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा 


महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात र महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली.  या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.


इतर महत्त्वाच्या बाातम्या :